International Yoga Day : इस योगा डे पे सबका साथ; पंतप्रधान मोदींसोबत आंतरराष्ट्रीय योग दिनात LGBT सदस्यांचीही उपस्थिती, LGBT प्रणती म्हणाली…

| Updated on: Jun 22, 2022 | 7:27 PM

प्रथमच, एलजीबीटी समुदायाच्या सदस्यांनी देखील म्हैसूर पॅलेसच्या बाहेर आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात भाग घेतला. त्यातच प्रणती प्रकाश असेही एक ट्रान्सजेंडर होती. यावेळी प्रणती प्रकाश म्हणाली की, पंतप्रधान मोदींसोबत योगा करण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदीत झाली आहे.

International Yoga Day : इस योगा डे पे सबका साथ; पंतप्रधान मोदींसोबत आंतरराष्ट्रीय योग दिनात LGBT सदस्यांचीही उपस्थिती, LGBT प्रणती म्हणाली...
आंतरराष्ट्रीय योग दिवस
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : 21 जून हा भारतासह जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) म्हणून साजरा केला जातो. या वर्षीचा हा आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस. जो ‘मानवतेसाठी योगा’ या थीमसह साजरा केला जाणार आहे. आयुष मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, यंदाच्या योग दिनासाठी हा विषय बराच विचारविनिमय केल्यानंतर निवडण्यात आला आहे. तर या योग दिवशी आणखी एक विशेष बाब पहायला मिळाली. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सबका साथ ही या टॅग लाईनचा बोलबाला दिसून आला. पार पाडलेल्या या योगा दिनात पंतप्रधान मोदी यांच्यासह म्हैसूर पॅलेस मैदानावर 15,000 हून अधिक लोकांनी योगासने केली. ज्यात एलजीबीटी (LGBT) व्यतिरिक्त, 200 विशेष अपंग आणि 100 अनाथ मुले देखील सहभागी झाली होती. यावेळी प्रणती प्रकाश (LGBT) म्हणाल्या, “आज आमचा उत्साह जास्त आहे. आम्ही पंतप्रधान मोदींसोबत योगा करू असे कधीच वाटले नव्हते.

मानवतेसाठी योग

म्हैसूरमध्ये 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिन अनेक कारणांसाठी खास होता. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ट्रान्सजेंडर समुदायाच्या सदस्यांचा आणि विशेष अपंग व्यक्तींचा सहभाग होता, ज्यांना पंतप्रधानांसोबत योग करण्याची संधी मिळाली. तसेच या वर्षीच्या योग दिनाच्या थीमला अनुसरून हे असल्याचे समोर आले आहे. जी मानवतेसाठी योग अशी आहे. प्रथमच, एलजीबीटी समुदायाच्या सदस्यांनी देखील म्हैसूर पॅलेसच्या बाहेर आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात भाग घेतला. त्यातच प्रणती प्रकाश असेही एक ट्रान्सजेंडर होती. यावेळी प्रणती प्रकाश म्हणाली की, पंतप्रधान मोदींसोबत योगा करण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदीत झाली आहे. प्रणतीने TV9 कन्नडला सांगितले की, “आमच्यापैकी बारा जण योग दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाले होते. आम्ही आनंदी आहोत.” तर आज आमचा उत्साह जास्त आहे. आम्ही पंतप्रधान मोदींसोबत योगा करू असे कधीच वाटले नव्हते.

एलजीबीटी समुदायासाठी दोन आठवड्यांच्या योगपूर्व प्रशिक्षण

याचदरम्यान म्हैसूरच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांपैकी एक असणारे एसए रामदास यांना एलजीबीटी समुदायातील लोकांना योगा समारंभासाठी आमंत्रित करण्याची कल्पना सुचली होती. त्यानुसार त्यावर विचार करण्यात आला. तसेच जी टॅग लाईन आहे त्याला धरून ही असल्याने हा विषय चांगला असल्याने म्हैसूर जिल्हा प्रशासनाने त्वरीत प्रतिसाद दिला. आणि एलजीबीटी समुदायासाठी दोन आठवड्यांच्या योगपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. तसेच सुरुवातीला 20 जणांची निवड करण्यात आली आणि अंतिम निवडलेल्या 12 जणांनी पीएम मोदींसोबत योगा केला.

हे सुद्धा वाचा

आम्ही आयुष्यात कधीही योगाभ्यास केला नाही

यानंतर प्रणती म्हणाली, “आम्ही आयुष्यात कधीही योगाभ्यास केला नाही. DHO कार्यालयाने एक प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आणि आम्हाला दोन आठवड्यांच्या योगपूर्व प्रशिक्षण दिले. खरं तर, त्यांनी आम्हाला पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी पास मिळविण्यासाठी मदत केली.”

आमच्यासाठी हा वेगळा दिवस

या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आणखी एका ट्रान्सजेंडर निशा म्हणाल्या, “आमच्यासाठी हा वेगळा दिवस आहे. कोरोना महामारीच्या काळात आम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यावेळी आम्हाला पीएम मोदींच्या मोफत रेशन योजनेतून रेशन देण्यात आले होते. आम्ही कोरोनाला फ्रीमध्येच पराभूत केले आहे. आम्ही टीकलो. तर आम्हाला अशा प्रतिष्ठीत अशा कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याचा अभिमान वाटतो.”

आम्हाला हार मानायची नाही

दरम्यान आता हा दिवस तर गेला संपला यानंतर योगा करणार का या प्रश्नावर प्रणती आणि निशा म्हणाल्या, योग दिनाच्या सेलिब्रेशनला उपस्थित राहिल्यानंतर आम्हाला आणि आमच्या मैत्रिणींना गांभीर्याने योगा करायचा आहे. तसेच प्रणतीने येथे पण केला की, “आम्हाला हार मानायची नाही. आम्ही रोज योगा करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आम्ही ते पुढे नेऊ.”