प्रशांत किशोर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे नवे सल्लागार; एक रुपया पगार घेऊन देणार सल्ला

| Updated on: Mar 01, 2021 | 6:43 PM

अनेक राजकारण्यांची राजकीय घडी नीट बसवून देणारे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर आता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नवे सल्लागार बनले आहेत. (Prashant Kishor has joined as principal advisor of Punjab CM Amarinder Singh)

प्रशांत किशोर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे नवे सल्लागार; एक रुपया पगार घेऊन देणार सल्ला
प्रशांत किशोर, कॅप्टन अमरिंदर सिंग
Follow us on

नवी दिल्ली: अनेक राजकारण्यांची राजकीय घडी नीट बसवून देणारे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर आता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नवे सल्लागार बनले आहेत. विशेष म्हणजे केवळ दरमहा एक रुपया पगार घेऊन ते अमरिंदर सिंग यांना सल्ला देणार आहेत. (Prashant Kishor has joined as principal advisor of Punjab CM Amarinder Singh)

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे. प्रशांत किशोर माझे मुख्य सल्लागार म्हणून काम करणार आहेत. पंजाबच्या भल्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे, असं अमरिंदर सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पुढील वर्षी निवडणुका

पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अमरिंदर सिंग यांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच सिंग यांनी प्रशांत किशोर यांना आपले मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. यापूर्वी 2017च्या पंजाबच्या निवडणुकीवेळीही प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला निवडणुकीचा कार्यक्रम आखून दिला होता. त्यामुळे काँग्रेसला 117 पैकी 77 जागा जिंकता आल्या होत्या. आगामी 2022ची विधानसभा निवडणूक अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वातच लढवली जाणार आहे. कांग्रेसचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी तशी घोषणा केली आहे. मात्र, असं असलं तरी काँग्रेसमधील एक गट सिंग यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यास इच्छूक नाही. त्यामुळे निवडणूक येईपर्यंत सिंग पक्षातील नाराजांना कसे समजावतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आपची टीका

प्रशांत किशोर यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आल्याने आपचे नेते खासदार भगवंत मान यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना सरकार चालवता येत नाही. आता एका बिहारच्या व्यक्तीला सल्लागार केल्याने सरकार चालेल काय? आठवा, चार वर्षांपूर्वी याच सरकारने खोटी आश्वासने दिली होती, आता पंजाबी माणूस वारंवार फसवला जाणार नाही, असं भगवंत मान यांनी म्हटलं आहे.

मोदींसाठीही काम केलं

प्रशांत किशोर यांच्या टीमने सध्या पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि तामिळनाडूत डीएमकेसाठी निवडणूक रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहे. या पूर्वी प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्यासाठी निवडणूक कार्यक्रम आखून दिला होता. (Prashant Kishor has joined as principal advisor of Punjab CM Amarinder Singh)

 

संबंधित बातम्या:

‘राजकारणी जाड कातडीचे, जनावरांची सुई वापरणार आहात का?’ मोदींना लस टोचता टोचता नर्स खुदूखुदू हसली

कायदे मंत्री मराठा आरक्षणाच्या बैठकीला गैरहजर का राहिले?, या मागे फडणवीस तर नाहीत?: काँग्रेस

West Bengal Election 2021 : लालूंचा आदेश, भाजपला रोखण्यासाठी तेजस्वी यादव पश्चिम बंगालच्या मैदानात!

(Prashant Kishor has joined as principal advisor of Punjab CM Amarinder Singh)