घरात खोदताच नोटांनी भरलेले अनेक ड्रम सापडले… करोडोचा खजिना पाहून सर्वच थक्क, थेट पुण्याशी कनेक्शन

प्रयागराजमध्ये एका घरात जमीन खोदताच नोटांनी भरलेले करोडो रुपयांचे ड्रम सापडले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार झालेल्या कारवाईत हा गुप्त खजिना उघड झाला. हे प्रकरण पुणे कनेक्शनशी जोडले गेले आहे, जिथे आरोपी नोटाबंदीदरम्यान पैसे घेऊन फरार झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांची संख्या 60 कोटींहून अधिक असू शकते असा अंदाज आहे.

घरात खोदताच नोटांनी भरलेले अनेक ड्रम सापडले... करोडोचा खजिना पाहून सर्वच थक्क, थेट पुण्याशी कनेक्शन
buried cash discovery UP
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 31, 2026 | 12:25 AM

घरातील जमीन खोदली आणि मातीच्या खाली नोटांनी भरलेले एक दोन नव्हे असंख्य ड्रम सापडले तर काय होईल? थोडा विचार करा. एवढा मोठा कुबेराचा खजिना पाहूनच तुम्ही थक्क व्हाल ना? उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या बरईपूर रामनगरमध्ये असाच प्रकार पाहायला मिळाला आहे. या ठिकाणी पोलिसांनी एका घरात जमीन खोदली आणि नोटांचा खजिनाच सापडला. ड्रम भरून भरून नोटा जमिनीत पुरल्या होत्या. एवढ्या मोठ्या नोटा एकसाथ पाहून पोलीसही आवाक झाले. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील असलं तरी पुण्याशी त्याचं कनेक्शन निघालं आहे.

बुधवारी रात्री पोलिसांना हा खजिना सापडला. बरईपूर रामनगर येथे रात्री पोलीस पोहोचले. त्यांनी एका संशयित व्यक्तीच्या घराला चोहोबाजूने घेरले. एकसाथ एवढे पोलीस आल्याने गावकरीही हैराण झाले. काय होतंय हे त्यांच्याही लक्षात येईना. पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी सुरू झाली. त्यानंतर पोलिसी खाक्या पडताच या व्यक्तीने मोठ्या खजिन्याची टिपच पोलिसांना दिली. त्याने सांगितलेल्या ठिकाणी पोलिसांनी खोदायला सुरुवात केली. थोडं खोदल्यानंतर एकमागोमाग एक ड्रम सापडू लागले. त्यानंतर पोलिसांनी हे सर्व ड्रम बाहेर काढून ते खोल्ले तर आतमध्ये नोटांच्या गड्ड्या सापडल्या. जमिनीखाली लपवलेल्या नोटा पोलिसांना सापडल्या. त्यानंतर या नोटांची गणती करण्यासाठी संबंधित विभागाला पाचारण करण्यात आलं.

Loading...

60 कोटीहून अधिक

रात्री उशिरापर्यंत या नोटांची गणती सुरू होती. या ड्रममध्ये एकूण चार कोटी रुपये असल्याचं सांगितलं गेलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम 60 कोटीपेक्षा अधिक आहे. दरम्यान, नेमकी किती रक्कम सापडली याची माहिती देण्यात आलेली नाही. नोटांची गणती सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. ही रक्कम कुठून आणली आणि कशासाठी वापरण्यात येणार होती? रक्कम लपवून ठेवण्याची गरज काय होती? याची चौकशी पोलीस करत आहे.

पुण्याशी कनेक्शन

या घटनेचं पुणे कनेक्शन निघालं आहे. बरईपूर रामनगरमध्ये राहणारा हा व्यक्ती काही वर्षापूर्वी पुण्याच्या एका फार्म हाऊसमध्ये काम करत होता. नोटाबंदीच्या काळात तो पोत्यात नोटा भरून फरार झाला होता, असं सांगितलं जातं. गावात आल्यावर त्याने प्रचंड जमीन खरेदी केली. तसेच उरलेले पैसे त्याने ड्रमात भरून खोलीच्या आत लपवून ठेवले. मात्र, नेमकं असंच घडलं होतं की या नोटा वेगळ्या मार्गाने आणल्या याचा तपास अजून सुरू आहे.

शेजाऱ्याशी वाद झाला अन्…

आरोपीचं त्याच्या शेजाऱ्यासोबत काही तरी कारणाने वाजलं होतं. त्यामुळे जमिनीच्या आत पैसे लपवून ठेवल्याची बातमी पोलिसांपर्यंत गेली. त्यानंतर पोलिसांनी थेट घरी येऊन जमिनीच्या खाली खोदकाम सुरू केलं. पोलिसांनी घराला वेढा दिल्याचं वृत्त येताच गावात एकच खळबळ उडाली. जमिनीच्या आतून नोटाच नोटा निघत असल्याचं कळताच ते पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली. ड्रममध्ये किती पैसे निघाले? याची माहिती घेण्यासाठी सर्वच धडपडत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us