
काही दिवसांपूर्वीच आध्यात्मिक गुरू आणि प्रसिद्ध संत स्वामी प्रेमानंद महाराज यांच्या एका प्रवचनावरून वाद निर्माण झाला होता. खरंतर, प्रेमानंद महाराजांनी महिलांच्या पवित्रतेवर टिप्पणी केली होती. त्यांनी त्यांच्या प्रवचनात सांगितलं होतं की, 100 महिलांपैकी फक्त चार महिला अशा आहेत ज्या एका पुरूषासोबत राहू शकतात आणि शुद्ध जीवन जगू शकतात. जेव्हा त्यांच्या प्रवचनाचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला. काही लोकांनी त्यांचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले, तर अनेक लोकं त्यांच्या समर्थनार्थही बाहेर पडले.
आता प्रेमानंद महाराजांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी म्हणते की, ती सध्या 18 वर्षांची आहे आणि ती दारू पिते आणि सिगारेट ओढते. तिने सांगितलंकी एके दिवशी तिने तिच्या आजीला बेशुद्धीचं औषध पाजलं आणि तिच्या प्रियकराला घरी झोपायला बोलावले. तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने घरात ठेवलेले सोन्याचे दागिने विकले. जेव्हा तिच्या पालकांना हे कळले तेव्हा त्यांनी तिच्यावर निर्बंध लादले आणि आता ती तिचं वागणं सुधारू इच्छिते.
काय म्हणाले प्रेमानंद महाराज ?
यानंतर प्रेमानंद महाराज यांनी त्या मुलीला समजावून सांगितलं की, तिने स्वतःला सुधारले पाहिजे. जर तिचे पालक तिला टोमणे मारत असतील आणि तिच्यावर बंधने लादत असतील, तर हे लक्षात ठेवलं पाहिजे, आणि ती सुधारेल अशी प्रतिज्ञा तिने केली पाहिजे, असं ते म्हणाले. जर तुला लहानपणापासूनच तुमच्या चुकांसाठी फटकारले गेलं असतं,ओरडा मिळाला असता तर अशी परिस्थिती आली नसती. पण, अजूनही वेळ आहे आणि तू स्वतःला शिस्त लावून स्वतःमध्ये सुधारणा करायला सुरुवात करावी,असंही त्यांनी तिल सुनावलं.
मात्र प्रेमानंद महाराजांचे म्हणणे मध्येच तोडत ती मुलगी म्हणाली की, ती सुधरू शकत नाहीये. तिच्यात सुधारणा करण्याची ताकद नाही आणि ती स्वतःचा जीव घेण्याचा विचार करतेय,असं तिने सांगितलं. मात्र तिचं बोलणं ऐकून प्रेमानंद महाराज भडकलेच,आणि म्हणाले ‘ तू दारू पितेस, सिगारेट ओढतेस, आजीला ड्रग्ज देतेस आणि बॉयफ्रेंडला घरी बोलावतेस, तुझी हिम्मतच कशी झाली ? तू कशी सुधारणार नाही, तुझ्या मनुष्य जन्माचा धिक्कार आहे. पहिली चूक केल्यानंतरच तुला शिस्त लावायला हवी होती. आत्महत्या करणे हा समस्येचा उपाय नाही. स्वतःला सुधारा आणि तुझ्या पालकांनाही तुला एक संधी देण्यास सांग.’ असं त्यांनी तिला सुनावलं.