दोन कुख्यात दहशतवाद्यांसह राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकाऱ्याला अटक

दक्षिण काश्मीरच्या कुलगाम येथे पोलिसांनी टाकलेल्या छापेमारीत हिजबूल मुजाहिदीन (Hizbul Mujahideen) या दहशतवादी संघटनेच्या दोन कुख्यात अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे.

दोन कुख्यात दहशतवाद्यांसह राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकाऱ्याला अटक
चेतन पाटील

|

Jan 12, 2020 | 4:07 PM

जम्मू-काश्मीर : काश्मीरमध्ये हिजबूल मुजाहिदीन संघटनेच्या दोन कुख्यात दहशतवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं (Hizbul Mujahideen). दक्षिण काश्मीरच्या कुलगाम येथे ही कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांसोबत पोलिसांनी एका राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकाऱ्याला देखील ताब्यात घेतलं आहे. देविंदर सिंह असं अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. देविंदर सिंह अतिरेक्यांसोबत एकाच गाडीमध्ये होते. देविंदर सिंह ती गाडी चालवत होते, अशी माहिती उपमहानिरीक्षक अतुल गोयल यांनी दिली.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी देविंदर सिंह यांच्या घरी देखील धाड टाकली. या धाडीत पोलिसांना एक AK 47, दोन पिस्तूल आणि तीन हॅण्ड ग्रेनेड मिळाले. देविंदर सिंह गुप्तचर यंत्रणांच्या काही मिशनसाठी काम करत होते का? की दहशतवाद्यांसोबत त्यांचे वेगळे संबंध आहेत, याबात पोलीस चौकशी करत आहेत.

पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंह यांना गेल्यावर्षी 15 ऑगस्टला दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईबाबत राष्ट्रपती पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलीस निरिक्षक या पदवरुन त्यांची पोलीस उपअधीक्षकपदावर पदोन्नती करण्यात आली होती.

2001 साली संसद भवनावर हल्ला झाल्ला होता. या हल्ल्याचा आरोपी अफजल गुरु याला 2013 साली फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यावेळी याप्रकरणाशी देविंदर सिंह यांचा देखील काहीतरी संबंध आहे, अशी चर्चा सुरु झाली होती. अफजल गुरुला फाशीची शिक्षा देण्यात आली, त्यावेळी देविंदर सिंह स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे घटक होते. अफजल गुरुने तिहार जेलमध्ये आपल्या वकीलांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की, “बडगामच्या हमहमा येथे तैनात असलेले डीएसपी देविंदर सिंह यांनी एका मोहम्मद नावाच्या हल्लेखोराला दिल्ली घेऊन जाण्याचा, तिथे त्याला भाड्याने घर खरेदी करुन देण्याचा आणि त्याच्यासाठी कार खरेदी करण्याचा दबाव आणला होता.” 9 फेब्रुवारी 2019 ला अफजल गुरुला फाशी झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी ते पत्र सार्वजनिक केले होते.

पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंह हे जम्मू-काश्मीर पोलीसच्या अॅण्टी हायजॅकिंग स्कॉडमध्ये होते. याअगोदर खंडणीप्रकरणी त्यांना स्पेशल ऑपरेशन ग्रुपमधून बाहेर काढण्यात आले होते. त्यांना काही काळासाठी निलंबित देखील करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना श्रीनगर पीसीआरमध्ये तैनात करण्यात आले होते.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें