AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदी यांनी लहानग्यांसोबत साजरे केले रक्षाबंधन, छोट्यांशी केल्या गप्पा-टप्पा

रक्षाबंधनाच्या दिवशी पंतप्रधान मोदी एका वेगळ्याच अंदाजात दिसले. त्यांनी 7 लोक कल्याण मार्गावर मुलांसोबत हाय-फाईव्ह, प्रश्नोत्तरे आणि हास्यविनोद, गप्पा टप्पा करत हा सण साजरा केला.

पंतप्रधान मोदी यांनी लहानग्यांसोबत साजरे केले रक्षाबंधन, छोट्यांशी केल्या गप्पा-टप्पा
pm modi
| Updated on: Aug 28, 2026 | 5:44 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: रक्षा बंधनाचे काही फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमावर शेअर केले आहे. त्यात ते लहान मुलांशी हाय -फाईव्ह करताना आणि गप्पागोष्टी करताना, हसताना आणि सहज संवाद करताना दिसत आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली. या सोहळ्यात समोर आलेले काही क्षण सोशल मीडियावर चर्चेचे ठरले आहेत.

हाय-फाईव्ह आणि लहानग्यांशी गप्पा टप्पा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रक्षा बंधन सोहळ्याचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. “High fives, smiles and more during today’s Raksha Bandhan celebrations at 7, LKM.” अशी कॅप्शन या पोस्टला मोदी यांनी दिली आहे. या व्हिडीओ लहान मुले पंतप्रधानांशी बोलताना उत्साहित दिसत आहेत.कोणी पंतप्रधानांशी शेकहँड करत आहे. तर कोणी त्यांच्या सोबत सेल्फी फोटो काढत आहेत. तर कोणी त्यांना प्रश्न विचारत आहेत. तर पंतप्रधान देखील लहान मुलांमध्ये सरमिसळ होत गप्पा मारताना दिसत आहेत.

येथे पोस्ट वाचा –

एका अन्य पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनला प्रेम,स्नेह आणि सौहार्दाचा सण म्हणत हा सण समाजातील आपलेपणा आणि सद्भावाच्या भावनेला आणखी मजबूत करत आहे. मोदी यांनी या संदेशात रक्षा बंधनाच्या सणाच्या शुभेच्छा देताना सर्व देशवासियांनी सुख, समृद्धि आणि आनंद मिळो अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. तसेच या पवित्र सण लोकांमधील विश्वास आणि आत्मियतेच्या नात्यांना आणखी समृद्ध करो असे म्हटले.

येथे पोस्ट वाचा –

जेव्हा मुलांनी विचारले, की तुमचे बालपणीचे स्वप्न कोणते ?

समारंभादरम्यान मुले आणि पंतप्रधान मोदी यांच्या दरम्यान काही हलक्या फुलक्या गप्पा देखील झाल्या. या वेळी एका मुलाने त्यांना विचारले की त्यांचे बालपणीचे स्वप्न काय होते ? त्यावर पंतप्रधान हसले आणि उत्तर दिले की ‘तुम्हाला भेटण्याचे’ त्यांच्या या उत्तराने तेथे बसलेली अन्य मुले देखील हसू लागली आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या. याआधी पंतप्रधान रक्षाबंधनच्या निमित्ताने देशवासियांनी शुभेच्छा देत सांगितले की हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धि आणि यश घेऊन येवो. त्यांनी प्रेम, स्नेह आणि परंस्पर विश्वासाचे बंधन नेहमी अतूट राहोत.

राष्ट्रपती मुर्मू यांनी देखील मुलांसोबत रक्षाबंधन केले साजरे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्र विविध शाळा आणि संस्थांच्या मुलासोबत रक्षाबंधन साजरे केले. राष्ट्रपती म्हणाले की रक्षाबंधनाचे महत्व केवळ भावा-बहिणीच्या नात्यांपर्यंत मर्यादित नाही. ते म्हणाले की राखी कुटुंबाचे सदस्य, मित्र आणि एवढेच काय तर झाडांना देखील बांधली जाते. कारण हे प्रेम आणि देखभालीचे प्रतिक आहे. राष्ट्रपतींनी मुलांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश देखील दिला आहे. त्यांनी मुलांना झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या की निसर्गाप्रती जबाबदारी आणि संवेदनशीलता आपल्या सामाजिक संस्कारांचा महत्वपू्र्ण भाग आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान