पंतप्रधान मोदीही ठेवतात नवरात्रीचे कडक व्रत; फक्त एक ग्लास पाणी अन्….

नवरात्र सुरु झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील दरवर्षी नवरात्रीचे व्रत करतात. पण ते नवरात्रीत फार कडक व्रत ठेवतात असं म्हटलं जातं. मोदींनी स्वत:च सांगितलं होतं की ते व्रतामध्ये कसा आहार घेतात ते. तुम्हालाही जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल.

पंतप्रधान मोदीही ठेवतात नवरात्रीचे कडक व्रत; फक्त एक ग्लास पाणी अन्....
Prime Minister Modi observes a very strict fast during Navratri, let's know what his diet and routine is like
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2025 | 3:11 PM

22 सप्टेंबर 2025 पासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या 9 दिवसात लोक देवीची उपासना करतात, व्रत ठेवतात. अगदी सामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण नऊ रात्रीत उपवास पकडतात, काहीजण तर फार कडक व्रत करतात. पायात चप्पलही घालत नाही. काही सेलिब्रिटींच्या घरी देवी बसतात. 9 दिवस ते पूर्ण भक्तीभावाने देवीची पूजा करतात. एवढंच नाही तर या नावात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देखील नाव समाविष्ट आहे. होय कारण या नऊ दिवसांत पंतप्रधान मोदी देखील उपवास करतात.ते फार कडक व्रत ठेवतात असं म्हटलं जातं.

आहाराबाबतही काटेकोरपणे पालन

या काळात ते अतिशय कडक आहार आणि जीवनशैलीचे पालन करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते हीच पद्धत पाळत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पंतप्रधान मोदी त्यांच्या परदेश दौऱ्यांमध्येही त्यांचा आहारबाबतचे नियम तुटू देत नाहीत. पंतप्रधान मोदी हे शाकाहारी आहेत. ते त्यांच्या आहाराबाबतही खूप काटेकोरपणे पालन करतात. ज्यात अनेक फिटनेस गुपिते देखील आहेत.पण नवरात्रीत, पंतप्रधान मोदी नऊ दिवसांचे उपवास कसे करतात किंवा ते उपवासादरम्यान कसा आहार घेतात हे जाणून घेऊयात.

व्रतात ते फार कडक आहार घेतात

पंतप्रधान मोदी गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रीचे व्रत पाळत आहेत. ते त्यांच्या परदेश दौऱ्यांमध्येही हे व्रत पाळण्याची विशेष काळजी घेतात. असं म्हटलं जातं की ते या काळात ते खूप कडक आहार घेतात. जसं की, ते त्यांच्या आहारात फक्त पालेभाज्या, फळे असे साधे पदार्थ असतात. नवरात्रीच्या काळात त्यांचा आहार याहूनही अधिक साधा असतो.

पंतप्रधान मोदींचा नवरात्रीत व्रताचा आहार कसा असतो?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवरात्रीच्या उपवासात पंतप्रधान मोदी दिवसभर फक्त लिंबू पाणी पितात. आणि संध्याकाळी ते काही निवडक फळे खातात. नवरात्रीच्या उपवासातही पंतप्रधान मोदी दररोज योगा करतात. या वयातही योगा त्यांना सक्रिय ठेवतो.

पंतप्रधान मोदींनी स्वतः उपवासाचा आहार काय सांगितला?

पंतप्रधान मोदींनी स्वतः एकदा म्हटले होते की, “जेव्हा जेव्हा नवरात्र येते तेव्हा मी नऊ दिवस उपवास करतो. या काळात मी कोणतेही एक फळ निवडतो आणि ते दिवसातून एकदा खातो. उदाहरणार्थ, जर मी पपई खाण्याचा निर्णय घेतला तर मी नऊ दिवस इतर कोणत्याही गोष्टीला स्पर्श करणार नाही. ते फळही मी फक्त एकदाच खातो. ही परंपरा माझ्या आयुष्यात 50 ते 55 वर्षांपासून सुरु आहे.” तर अशापद्धतीने पंतप्रधान मोदी देखील नवरात्रात देवीची पूजा करतात आणि कडक व्रतही ठेवतात. आणि या वयातही ते हे काटेकोरपणे पाळतात हे खरोखरंच आश्चर्यकारक आहे.