AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदी आजच करणार सरकार स्थापनेचा दावा, TDP आणि JDU ने दिलं समर्थन पत्र

एनडीएची आज दिल्लीत बैठक सुरु आहे. या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू भाजपला समर्थन देणारे पत्र दिले आहे अशी माहिती मिळत आहे. हे समर्थन असलेले पत्र राष्ट्रपतींना आज दिलं जाऊ शकतं. त्यानंतर आजच सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.

पंतप्रधान मोदी आजच करणार सरकार स्थापनेचा दावा, TDP आणि JDU ने दिलं समर्थन पत्र
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jun 05, 2024 | 6:09 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. एनडीएकडून आजच सरकार स्थापनेसाठी एनडीएमधील घटक पक्षांचं समर्थन पत्र दिलं जाणार आहे. राष्ट्रपतींकडून 17 वी लोकसभा विसर्जित करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार 17 वी लोकसभा विसर्जित करण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनाने प्रसिद्धीपत्रक जारी केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले आहेत. भाजप बहुमतापासून लांब राहिल्याने त्यांना आता इतर मित्रपक्षाच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार आहे. गेल्या दोन वेळा सत्तेत असलेल्या भाजपला यावेळी पूर्ण बहुमत न मिळाल्याने त्यांना आता जेडीयू आणि टीडीपीची मदत घ्यावी लागणार आहे. भाजपला यंदा 240 जागा मिळाल्या आहेत. आज संध्याकाळी ७.३० वाजता सरकार स्थापनेचा दावा केला जाणार असल्याची माहिती आहे. ८ जूनला मोदींचा शपथविधी सोहला पार पडणार असल्याची माहिती आहे.

एनडीएची बैठक

आज पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी एनडीएची बैठक होत आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत. नितीश कुमार हे निवडणुकीच्या आधीच इंडिया आघाडी सोडून एनडीएमध्ये सहभागी झाले होते. आता आम्ही एनडीएमध्येच राहू असे जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी म्हटले आहे.

एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी कोणताही वेळ न गमवता लगेचच सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. कारण नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना इंडिया आघाडीकडून ऑफर देण्यात आली आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर यंदाची निवडणूक विरोधकांसाठी संजीवनी ठरली आहे.

इंडिया आघाडीची बैठक

दुसरीकडे आज दिल्लीत इंडिया आघाडीची देखील बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांना देखील या बैठकीला येण्याची विंंनती करण्यात आली आहे. बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकाच फ्लाइटने पाटण्याहून दिल्लीला आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता कोणाचे सरकार स्थापन होणार आणि कोणाला काय हवे आहे, हे हळूहळू समोर येईल.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा