पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली युवकांसाठी अत्यंत मोठी घोषणा, आता खासगी कोचिंग क्लासेस..

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांसाठी मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी खासगी कोचिंग क्लासेसच्या मुद्द्यावर भाष्य केले. खाजगी कोचिंग क्लासेसमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठी आर्थिक बोजा वाढत असल्याचे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली युवकांसाठी अत्यंत मोठी घोषणा, आता खासगी कोचिंग क्लासेस..
Prime Minister Narendra Modi
| Updated on: Aug 15, 2026 | 10:12 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देशवायियांना दिल्या. दिल्लीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत ध्वजारोहण झाले. नरेंद्र मोदी नक्की काय घोषणा करणार याकडे सर्वांच्यान नजरा होत्या. देशात जंतर मंतरवर मोठे आंदोलन युवकांनी केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनरेशन झेड आणि जनरेशन अल्फा यांच्यासाठी मोठी घोषणा केली. यासोबतच भारत कशापद्धतीने महाशक्ती होणार, यावरही बोलताना ते दिसले. नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, स्वप्ने मोठी पाहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वर्षाच्या आत एक कोटी तरुणांना एआय कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. यासोबतच त्यांनी खासगी कोचिंग क्लासेसबद्दलही मोठे भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले, खाजगी कोचिंग क्लासेसमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठी आर्थिक बोजा पडत आहे. याकरिताच हे टाळण्यासाठी विविध परीक्षांचे मोफत ऑनलाईन कोचिंच क्लासेस उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी केली. म्हणजेच खासगी कोचिंग क्लासेसमध्ये जाणार पैसा आता वाचणार असल्याचे स्पष्ट आहे. सरकारतर्फे फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना क्लासेस करता येतील.

नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, विकसित भारताच्या प्रवासात युवाशक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आज मी लाल किल्ल्याहून देशातील तरुणांसाठी एक घोषणा करू इच्छितो. आम्ही येणाऱ्या 1 वर्षात 1 कोटी तरुणांना एआय काैशल्यांचे प्रशिक्षण देण्याचा संकल्प आहे. जेणेकरून एआयच्या क्षेत्रातही जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्याकडे असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत 2026 च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी एक प्रबळ दावेदार आहे.

2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपदही भारताकडे आहे. 2026 च्या ऑलिम्पिकसाठी मुलांमधील क्रीडा गुणवत्तेचा शोध घेण्याच्या उद्देशाने एक विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रीडा प्रकारांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतावरही भाष्य केले. यावेळी त्यांनी भारत कोणत्याही देशावर आधारित राहणार नसल्याच्या दिशेने पाऊसे उचलली जातील, असेही त्यांनी म्हटले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us