Independence Day Celebration 2026 LIVE : स्वातंत्र्यदिनानिमित्त सीजे फाउंडेशनचा मालाडमध्ये मोठा उपक्रम
Independence Day Celebration 2026 Live Updates in Marathi : देशात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करतील. लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
खासदार ओमराजे यांच्या घरात शिंदेंचे दोन कार्यकर्ते भिडले, फ्री स्टाईल हाणामारी
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरात शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन कार्यकर्ते भिडले असून त्यांच्यातील हा वाद अखेर ओमराजे यांचे बंधू डॉ. जय राजे यांनी मध्यस्थीने मिटवला.
-
नंदूरबार येथील रस्ते अत्यंत खराब, मंत्री हसन मुश्रीफ यांची टीका
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा नंदुरबारच्या रस्त्यांच्या स्थितीबाबत खंत व्यक्त केली आहे. नवापूर तालुक्यातील श्रावणी गावात दूध संघाच्या उद्घाटनाच्यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांच्या स्थितीवर भाष्य करताना रस्त्यांची परिस्थिती पाहता, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी परिस्थिती असती तर अधिकाऱ्यांना सोडले नसते असा इशारा दिला आहे.
-
-
गणेश मुर्तींच्या किंमतीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ
मुंबईतील परळ वर्कशॉप कारखान्यांमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्ती घडवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.पर्यावरण रक्षणाच्या जनजागृतीमुळे शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्यावर आणि खरेदी करण्यावर नागरिकांचा भर आहे.यावर्षी गणेश मूर्तींची किंमत 20 ते 30 टक्क्याने वाढल्याची माहिती मूर्तिकार सुशांत पोळेकर यांनी दिली आहे.
-
रिक्षा चालकांना संधी द्यावी
अनेक ऑटो रिक्षा चालकांनी मराठी शिकून प्रमाणपत्रे मिळवली आहेत. पण ज्या रिक्षाचालकांनी मराठी भाषा शिकलेली नाही, त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. कोणालाही कोणाची रोज़गार हिसकावून घेण्याचा अधिकार नाही. परवानग्या आणि कायद्यांवर पुनर्विचार केला पाहिजे, असे शिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले.
-
परळीमध्ये पशुवैद्य व पशुवैज्ञान महाविद्यालयाचा कोनशीला समारंभ
परळीमध्ये पशुवैद्य व पशुवैज्ञान महाविद्यालयाचा कोनशीला समारंभ व भूमिपूजन सोहळा आज राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय.यावेळी पशुसंवर्धन,पर्यावरणीय व वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे,आमदार नमिता मुंदडा, माजी खासदार डॉ प्रीतम मुंडे यांची देखील उपस्थिती आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आले.
-
-
अत्याचार प्रकरणातील आरोपी उमेश माने गेल्या महिन्याभरापासून फरार, पीडितेने घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
केज तालुक्यातील एका विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून बळजबरी अत्याचार केल्याप्रकरणी गेल्या महिन्याभरापूर्वी उमेश माने याच्यावर गुन्हा दाखल आहे. उमेश माने याच्यावर यापूर्वी देखील बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे, आरोपीच्या पाठीमागे राजकीय पाठबळ आहे, त्याच्यापासून मला आणि माझ्या मुलांना धोका आहे असा दावा पिडीतेने सुनेत्रा पवार यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. तरी आरोपी उमेश मानेला तात्काळ अटक करावी अशी मागणी पिडीतेने उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
-
डोंबिवलीत तिरंगा विश्वविक्रम; भाजपची स्वतंत्र रॅली, महायुतीत पुन्हा ‘घुसफूस’?
३५ हजार चौरस फुटांचा भव्य तिरंगा रॅलीची डोंबिवलीत विश्वविक्रमाची नोंद झाली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत विक्रमाचा गौरव करण्यात आला. २१०० मीटर लांब आणि ५ फूट रुंद तिरंगा घेऊन हजारो विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर आले. देशभक्तीचा जल्लोष दिसला. Asia Book of Records आणि India Book of Recordsमध्ये डोंबिवलीच्या तिरंगा रॅलीची अधिकृत नोंद झाली. शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ आवाहनाला प्रतिसाद देत श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि विविध संस्थांनी पुढाकार घेतला. विश्वविक्रमी तिरंगा रॅलीत भाजपचे स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते अनुपस्थित राहिल्याने महायुतीतील शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा धुसफूसची चर्चा रंगली.
-
-
जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका
“तुम्ही निवडून दिलेला विद्यमान खासदार जिवंत आहे का?” अशा बोचऱ्या शब्दांत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक मतांनी अमोल कोल्हे यांना विजयी केलं, मग आता ते कुठे आहेत, असा सवालही सोनवणे यांनी उपस्थित केला.
-
चाकण MIDCच्या प्रश्नांवर आदित्य ठाकरेंची आज थेट पाहणी
चाकण MIDCमधील वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव आणि उद्योजकांच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे आज चाकण दौऱ्यावर आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत येण्याच्या एक दिवस अगोदर आदित्य ठाकरे चाकणच्या दौऱ्यावर आहेत. हुंडाई चौक, वासुली फाटा, कोरेगाव फाटा, आंबेठाण, बिरदवडी, वाघजाईनगर, अहमदनगर फोर्जिंगसह महाळुंगे कमान आणि पुलाची पाहणी करणार. उद्योगांचे संभाव्य स्थलांतर रोखण्यासाठी उद्योजकांशी थेट संवाद साधणार आहेत.
-
कल्याण रिक्षाचालकांना मराठीची सक्ती; डोंबिवलीत ‘मुदतवाढ द्या’ची मागणी
महाराष्ट्रात रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्यात आली आहे. नियम न पाळणाऱ्यांवर आता थेट कारवाईची तयारी करण्यात येत आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाचालकांशी संवाद साधला असता अनेक चालकांनी मराठी शिकण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली. मराठी बोललीच पाहिजे, मात्र एका महिन्यात अचानक अस्खलित मराठी बोलणे शक्य नाही; किमान दोन-तीन महिन्यांची मुदत द्यावी,’ अशी मागणी लाल बावटा रिक्षा युनियनने केली आहे. ‘मराठी माणसाचे महाराष्ट्रातील अस्तित्व आणि मराठी भाषेचा सन्मान कायम राहिला पाहिजे; संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले,’ अशी युनियनची भूमिका आहे. रिक्षाचालकांसाठी २३ तारखेपासून मराठी प्रशिक्षण सुरू केल्याचा दावा करण्यात आला. आतापर्यंत सुमारे एक हजार चालक प्रशिक्षणात सहभागी झाल्याचे युनियनचे म्हणणे आ
-
कचरा फेकण्याच्या वादातून सांगलीमध्ये जोरदार राडा, पती-पत्नी गंभीर जखमी
सांगलीच्या कुपवाड नजीक कचरा फेकण्याच्या वादातून जोरदार हाणामारी झाली आहे, या घटनेत पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहे, शेजाऱ्याच्या व्यक्तीकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
-
लासलगाव बाजार समितीत डाळिंब लिलावाला सुरुवात
लासलगाव बाजार समितीत डाळिंब लिलावाला सुरुवात
डाळिंबाला जास्तीतजास्त २२०० रुपये कमीतकमी ५०० रुपये भाव
तर सरासरी १७०० ते १८०० रुपये प्रति क्रेट्स दर
आज ४०० क्रेट्स डाळिंबाची आवक
नाशिकसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरमधून डाळींबाची आवक
योग्य प्रतवारी केल्यास चांगला दर मिळणार; व्यापाऱ्यांचे आवाहन
-
स्वातंत्र्यदिनी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस दलातील २५ जणांचा सन्मान
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील २५ अधिकारी व अंमलदारांना पदक प्रदान करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दीर्घकालीन व निष्कलंक सेवेसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘अति उत्कृष्ट’ आणि ‘उत्कृष्ट’ सेवा पदके जाहीर झाली होती. पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२६ रोजी ध्वजरोहण सोहळ्यात हे मानाचे सन्मान वितरित करण्यात आले.
-
सर्व रिक्षा चालकाना मराठी भाषा अनिवार्य आहे, नालासोपारा मधील अनेक रिक्षाचालकाना मराठी भाषा येत नसल्याचं उघड
सर्व अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीची केली आहे. १५ ऑगस्टपर्यंत मराठी भाषा शिकण्याची मुदत देण्यात आली आहे, आज शेवटचा दिवस आहे. मात्र नालासोपारा मधील अनेक रिक्षाचालकाना मराठी भाषा येत नसल्याचे उघड झालंय.
आम्ही मराठी भाषा शिकतोय, आम्ही मराठी शिकण्यासाठी क्लास चालू केले आहेत. तुटक तुटक मराठी भाषा शिकत आहोत. या बसा , कुठे जायचे, आता एवढे शिकले आहे. असं अनेक रिक्षा चालकांनी सांगितलं आहे. अनेक रिक्षाचालक हे १५ ते २० वर्षापासून राहतात मात्र त्यांना आणखी पूर्ण मराठी भाषा येत नसल्याचे उघड झालं आहे.
-
वंदे मातरमला विरोध म्हणजे दिमागी नक्षलवाद – देवेंद्र फडणवीस
वंदे मातरमला विरोध म्हणजे दिमागी नक्षलवाद , हा मानसिक नक्षलवाद नाहीतर काय ? असा सवाल विचारत मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली.
-
मुंबई – एनसीएमसी अंतर्गत महिलांना एसटी प्रवासाच्या स्मार्ट कार्डचे वाटप सुरू
राज्याचे ऊपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मुंबईत विविध ठिकाणी एनसीएमसी अंतर्गत महिलांना एसटी प्रवासाच्या स्मार्ट कार्डचे वाटप सुरू झालं. सर्वसामान्य महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सूट मिळणार तर वयोवृद्धांनाही मोठा फायदा होणार . मुंबईतील कुर्ला विधानसभेत शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्याकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त या महिलांना स्मार्ट कार्डचे वाटप सुरू झालं असून जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असंही आवाहन केलं आहे.
-
डोंबिवली – श्रीकांत शिंदेंच्या रॅलीत भाजपची ‘गैरहजेरी’, महायुतीत पुन्हा धुसफूस ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘हर घर तिरंगा’ आवाहनाला प्रतिसाद देत डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि विविध संस्थांच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये विश्वविक्रम भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. तब्बल 35 हजार स्क्वेअर फुटांचा तिरंगा घेऊन 15 हजार विद्यार्थी आणि 20 हजारांहून अधिक नागरिक या विश्वविक्रमी रॅलीत सहभागी झाले. मात्र श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीत भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. महायुतीत सगळं काही आलबेल नाही का अशा चर्चा आता पुन्हा सुरू झाल्या आहेत.
-
मुंबईतीलऑटो रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा शिक्षणाचा आज शेवटचा दिवस , 18 तारखेनंतर होणार कारवाई
मुंबईतील ऑटो रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा शिक्षणाचा आज शेवटचा दिवस आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर 18 तारखेनंतर RTO कडून कारवाई करण्यात येणार आहे.
आज शेवटचा दिवस असून, ओशिवरा येथे मनसे पदाधिकारी संदेश देसाई यांच्या वतीने सुरू असलेल्या मोफत मराठी भाषा वर्गासाठी ऑटो चालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने घेतली मोठी उसळी
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. 24 तासात सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात चार हजारांची वाढ झाली. त्यामुळे जीएसटीसह सोन्याचे दर 1 लाख 57 हजार रुपये झाले असून एक किलो चांदीचे दर 2 लाख 46 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
-
नांदेड – स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांकडून अनोखा निषेध, फलकांद्वारे शाळेच्या समस्यांकडे वेधलं लक्ष
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात अनोख्या पद्धतीने आपल्या शाळेच्या समस्या गावाकऱ्यापुढे मांडल्या. शाळेच्या आवारात घाण करू नका, दारूच्या बाटल्या टाकू नका, व्यसन करू नका, शाळेची दारं-खिडक्या फोडू नका, अशा विविध मागण्या असलेले फलक विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते.
-
‘ऑपरेशन टायगर’ हे काही सांगून होत नाही – उदय सामंत
‘ऑपरेशन टायगर’ हे काही सांगून होत नाही. शिंदे साहेब काय करू शकतात, हेच 4 वर्षांपूर्वी पाहिलं, परवा खासदारांच्या बाबतीतही दिसून आलं, सचिन अहीर यांच्याबबातही पाहिलं. आमचं ऑपरेयशन टायगर, पक्ष प्रवेश रोज सुरू आहेत. ही एकनाथ शिंदे यांची किमया आहे, असं म्हणत उदय सामंत यांनी ‘ऑपरेशन टायगर’वर प्रतिक्रिया दिली.
-
स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधनानिमित्त सीजे फाउंडेशनचा मालाडमध्ये मोठा उपक्रम
स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधनानिमित्त सीजे फाउंडेशनचा मालाडमध्ये मोठा उपक्रम. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या हस्ते 10 हजार महिलांना साडीचं वाटप करण्यात आलं. मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमाला उपस्थित होते. महिलांच्या सन्मानासाठी आणि सामाजिक बांधिलकीतून उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं.
-
रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा उपसले आंदोलनाचे हत्यार
रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा उपसले आंदोलनाचे हत्यार. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन. शासकीय अधिकारी व शेतकरी शिष्टमंडळ यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. रिंग रोड करत असताना भूसंपादनातील शेत जमिनींना योग्य भाव देण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी
-
एल्गार कष्टकरी संघटनेने मुंबई नाशिक व नाशिक मुंबई महामार्ग अडवला
एल्गार कष्टकरी संघटनेने मुंबई नाशिक व नाशिक मुंबई महामार्ग अडवला. वनजमिन पट्टे, रेशनकार्ड, तसे आदिवासी भागातील प्रलंबित मागण्यांसाठी रास्ता रोको. आदिवासी बांधवांनी रस्त्यावर मांडला ठिय्या. महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोवर न हटण्याचा पवित्र. तहसीलदार आंदोलन करते यांच्यात शाब्दिक चकमक.
-
आदित्य ठाकरेच्या चाकण दौऱ्यावर सामंतांची टीका
आदित्य ठाकरेच्या चाकण दौऱ्यावर सामंतांनी आता टीका केली आहे. म्हणाले की, ” चाकणच्या मुद्यावरुन उद्योजकांना भेटावं असं वाटलं हे चांगलंच, तर ऑपरेशन टायगर हे काही सांगून होत नाही,”
-
शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी पोलीस आणि नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण
शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी पोलीस आणि नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले. यानंतर रिक्षा चालकांवर म्हणाले की, “फार मला आनंद आहे… कारण उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये तीस हजार लोकांना मराठी शिकवण्यात यशस्वी ठरले आहेत..हे सगळे उत्तर भारतीय मराठी शिकतात याचा मला आनंद आहे.. आता हे खरोखर मराठी झाले याचा मला आनंद आहे. आणि त्यांना सर्टिफिकेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते देण्याच्या कार्यक्रम घेणार आहेत.
-
कोळी समाजाच्या भूमिपुत्रांनी 80 वा स्वातंत्र्य दिन
कोळी समाजाच्या भूमिपुत्रांनी 80 वा स्वातंत्र्य दिन खाडीत ध्वज फडकून राष्ट्रगीत गाऊन साजरा करण्यात आला… कोळी समाजाच्या विविध मागण्या तसेच आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाची मागणी करणारे फलक बोटीत झळकवले….
-
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता सुधारतायेत
पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली होती, छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णायलात ते सध्या दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. टायफॉईडची लक्षणे असल्याचे समोर आले आहे, तर प्रकृती आता सुधारत आहे.
-
बीड जिल्हा रुग्णालयातील शिंदेंच्या शिवसेनेकडून मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिर
बीड जिल्हा रुग्णालयातील शिंदेंच्या शिवसेनेकडून मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री प्रताप सरनाईक या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान मंगेश शेवटी आणि युवा सेनेचे बाजीराव चव्हाण यांच्या उपस्थितीत सध्या हे शिबिर सुरू आहे. या शिबिरासाठी हजारोच्या संख्येने रुग्ण दाखल झाले आहेत. ज्या बालकांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया आहेत त्या देखील मोफत करून दिल्या जाणार आहेत.
-
राज्यमंत्री पंकज भोयर यांची अभिजीत दिपके यांच्या स्कूल ठीक करो मोहिमेवर प्रतिक्रिया
राज्यमंत्री पंकज भोयर यांची अभिजीत दिपके यांच्या स्कूल ठीक करो मोहिमेवर प्रतिक्रिया. या अभियानाचे आम्ही निश्चितपणे स्वागत करतो. सरकार किंवा शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नागरिक, सामाजिक संस्था तसेच संबंधित घटकांच्या वतीने ऑडिट झाले पाहिजे. शासनाच्या कोणत्या कामांमध्ये चांगल्या बाबी आहेत, तसेच कोणत्या कामांमध्ये सुधारणा किंवा सूचना आवश्यक आहेत, याबाबतचे मत सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून समोर आले पाहिजे. मात्र, या अभियानाचा उद्देश केवळ टीका करणे एवढाच नसावा. शासनाचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडून करण्यात आलेल्या सकारात्मक व उत्कृष्ट कामांचीदेखील दखल घेतली पाहिजे. महाराष्ट्रात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कार्यरत असलेल्या शाळादेखील आहेत. त्यांनी अशा शाळांनाही भेट देऊन तेथील चांगल्या कामांची पाहणी करावी, असे मत पालकमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केले.
-
वर्ध्यात भटक्या कुत्र्याची दहशत
वर्ध्यात भटक्या कुत्र्याची दहशत. भटक्या कुत्र्याने तब्बल 19 जणांना चावा घेतला. भटक्या कुत्र्याने चावा घेतलेल्या जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार. बसस्थानकासमोरील परिसरात कुत्र्याने काही जणांना चावा घेतला. कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. कुत्र्याने चावा घेतलेल्या नागरिकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार. 18 जणांवर उपचार करून देण्यात आली सुट्टी. एका वृद्ध महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांकडून बंदोबस्ताची मागणी. कुत्र्यांची दहशत रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
-
स्वातंत्र्यदिनीच KDMCची धडक कारवाई
स्वातंत्र्यदिनीच KDMCची धडक कारवाई; डोंबिवलीतील नामांकित जीमी हॉटेलच्या टेरेसवरील शेडवर हातोडा. देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्सव सुरू असताना डोंबिवलीत कल्याण-डोंबिवली महापालिकेची धडक कारवाई. डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरातील नामांकित जीमी हॉटेलच्या टेरेसवर उभारलेल्या शेडवर पालिकेची कारवाई सुरू. कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात पालिका अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच कारवाई सुरू झाल्याने परिसरात नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा कारवाईचा बडगा कायम असल्याचा संदेश प्रशासनाकडून. या संपूर्ण कारवाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील जाधव यांनी
-
डेक्कन येथील ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास राडा
डेक्कन येथील ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास राडा. रिल्सला लाईक आणि कमेंट करण्यावरून झालेल्या वादात एकावर कोयत्याने वार. ८ ते १० जणांच्या ग्रुपमध्ये दोन मुलींचाही समावेश. कॅफेमध्ये तोडफोड आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी PSI संदीप कदम यांना २९ जून २०२६ रोजी करण्यात आले होते निलंबित. घटनेची सत्यता तपासल्यानंतर PSI संदीप कदम यांचे निलंबन घेण्यात आले होते मागे. याच ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू असलेल्या पार्टीत कोयता गँगने घातला धुमाकूळ. कॅफेमध्ये झालेल्या कोयत्याच्या हल्ल्यामुळे पुन्हा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
-
अमरावतीत आज ग्रामपंचायतने ग्रामसभा घेतली नसल्याने गावातील नागरिक आक्रमक
अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे आज ग्रामपंचायतने ग्रामसभा घेतली नसल्याने गावातील नागरिक आक्रमक दरवर्षी 15 ऑगस्ट ला ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा होत असते.मात्र आज ग्रामसभा न झाल्याने ग्राम पंचायत मध्ये नागरिक गोळा होऊनही ग्रामसेवक सरपंच कोणीच न आल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतला लावले कुलूप…नागरिकांनी ग्रामपंचायतच्या बाहेर काढल्या टेबल खुर्च्या. गेल्या तीन ते चार महिन्यापासून ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा झाली नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप. ग्रामपंचायत मध्ये अनेक भ्रष्टाचार झाल्यामुळे ग्रामसेवक ग्रामसभा घेत नाही व गावकऱ्यांना हिशोब देत नसल्याचा नागरिकांनी केला आरोप
-
मेळघाट मधील डोमा आश्रमशाळेतील भूतबाधेच्या अफवेचे गूढ उलगडले
अफवावर विश्वास ठेवू नका सर्व विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये जावं -आदिवासी विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन. अमरावतीच्या मेळघाटातील डोमा आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरल्यानंतर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य पथकाने तपासणी केली. सहा विद्यार्थिनींमध्ये सतत रडणे, भीती, उदासपणा, विस्मरण व शारीरिक तक्रारी अशी लक्षणे आढळून आली. वैद्यकीय तपासणीत या विद्यार्थिनींमध्ये Dissociative Conversion Disorder असल्याचे निदान करण्यात आले. मानसिक तणाव, अभ्यासाचा ताण आणि घटनांचा परिणाम यामागे कारणीभूत असण्याची शक्यता अहवालात नमूद आहे. विद्यार्थिनींना स्वतंत्र ठेवून उपचार तसेच पालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. या संदर्भात आदिवासी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी प्रतिक्रिया दिली.विद्यार्थांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी शाळा प्रशासन, मुख्याद्यापक आणि अनिस मार्फत विद्यार्थीना आठ दिवसात शालेत आणेल जाईल आणि विद्यार्थीनि आणि पालकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन आदिवासी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी केले
-
तिरंगा रॅलीनंतर खासदार श्रीकांत शिंदेंचा संवेदनशील पुढाकार
तिरंगा रॅलीनंतर खासदार श्रीकांत शिंदेंचा संवेदनशील पुढाकार; अडकलेल्या विद्यार्थी-शिक्षकांना ताफ्यातील वाहनांतून पोहोचवले घरी. स्वातंत्र्यदिनानिमित्त डोंबिवलीत आयोजित भव्य तिरंगा रॅलीला हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. रॅली संपल्यानंतर काही विद्यार्थी आणि शिक्षकांना घरी परतण्यासाठी वाहनांची अडचण निर्माण झाली. परिस्थितीची दखल घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ पुढाकार घेतला. आपल्या ताफ्यातील वाहनांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना बसवून त्यांची प्रवासाची सोय केली. पावसाच्या वातावरणात विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी खासदारांनी विशेष काळजी घेतली. भव्य तिरंगा रॅलीनंतर समोर आलेल्या या संवेदनशील कृतीमुळे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन घडले.
-
जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा
जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. पोलीस दलातील सशस्त्र जवानांनी राष्ट्रध्वजाला दिमाखदार सलामी देत मानवंदना दिली. निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्या वतीने उपस्थितांना मृदा जलसंधारणाबाबत शपथ देण्यात आली.
-
राज्यातील सर्व आश्रम शाळांच्या चौकशीचे आदेश देणार- इंद्रनील नाईक
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे आदिवासी आश्रम शाळेमध्ये सर्पदंशाने 3 चिमुकलींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी मुंबईला जाताच सर्व आश्रम शाळांच्या चौकशीचे आदेश देणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसोबत कुठली हयगय खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे. चौकशीचे आदेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
-
20 पोलीस अधिकारी व हमालदार यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक
गडचिरोली पोलीस दलातील 20 पोलीस अधिकारी व हमालदार यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व एक अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. 27 अधिकारी व हमालदारांना अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर केले आहे.
-
कैलास पाटलांसोबतची मैत्री कायम आहे- ओमराजे निंबाळकर
पक्षांतराच्या बाबतीत त्यांना जो योग्य निर्णय वाटेल तो निर्णय त्यांनी घ्यावा. शिवसेना पक्ष प्रवेशानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कैलास पाटील मित्र आहेत. मैत्री मैत्रीच्या जागेवर आहे असे मत ओमराजे निंबाळकर व्यक्त केले आहे.
-
हिंगोलीत डीपी टीसीची बैठक सुरू असताना शेतकऱ्यांची घोषणाबाजी
हिंगोलीत डीपी टीसीची बैठक सुरू असताना शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा म्हणत डीपीटीसी हॉललमध्ये शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी केली. पालकमंत्री नरहरी झिरवळ, दोन खासदार, तीन आमदार देखील तेथे उपस्थित होते.
-
पुण्यातील ध्वजारोहण कार्यक्रमात आसन व्यवस्थेवरून नीलम गोऱ्हे नाराज
पुण्यातील ध्वजारोहण कार्यक्रमात आसन व्यवस्थेवरून नीलम गोऱ्हे नाराज झाल्या आहेत. लोकप्रतिनिधींना सन्मान दिला जात नाही, असा आरोप गोऱ्हे यांनी केला.
-
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला उमेद प्रकल्पामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महिलेने केला. त्यांचं गेल्या सहा दिवसांपासून सुरू बिराड आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न महिलेने केला.
-
तिरंग्याच्या जल्लोषात डोंबिवलीत विश्वविक्रमी रॅलीला प्रारंभ
डोंबिवलीत विश्वविक्रमी रॅलीला प्रारंभ झाला. या रॅलीत ३५ हजार स्क्वेअर फूट ध्वजाने लक्ष वेधले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत तिरंगा फुगे आकाशात सोडून डोंबिवलीतील विश्वविक्रमी तिरंगा रॅलीला उत्साहात प्रारंभ झाला. ३५ हजार स्क्वेअर फूटांचा भव्य तिरंगा १५ हजार विद्यार्थ्यांनी खांद्यावर घेत रॅलीत सहभाग नोंदवला. आमदार राजेश मोरे, महापौर हर्षाली थविल, माजी सैनिक, कलाकार आणि विविध मान्यवरांची उपस्थिती दर्शवली.
-
धाराशिवमध्ये ध्वजारोहणावेळी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
अनुसूचित जातीचे उपर्गीकरण झालं पाहिजे, यासाठी ध्वजारोहणावेळी तरुणाने केला आत्मदहनाचा प्रयत्न केला. अभिजीत देडे या तरुणाने धाराशिव च्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहणावेळी अंगावर पेट्रोल ओतून घेत आंदोलन केले. पोलिसांनी वेळीच वेळीच तरुणाला अडवून ताब्यात घेतले यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात एकच गोंधळ उडाला.
-
महाराष्ट्र विकास होतोय, 13 जिल्ह्याचा चांगला विकास – देवेंद्र फडणवीस
मंत्रालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस संबोधित करताना म्हटले की, छत्रपती शिवरायांनी शिकवण दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला अनुसरून महाराष्ट्र विकास करत आहे. देशातील अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राला पाहिजे जाते. पहिल्या सहामाईत महाराष्ट्राचा विकासाचा दर हा 8.8 टक्के आहे. प्रत्येक जिल्ह्याचा विकास झाला आहे. तेरा जिल्ह्याने लक्ष्य पूर्ण केलं आहे’.
-
आमदार संदिप क्षीरसागर नाराज
उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीडमध्ये ध्वजारोहण होणार आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाला आमदार विजयसिंह पंडित आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. परंतु आमदार संदिप क्षीरसागर हे कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्याने नाराज झाल्याची चर्चा आहे.
-
मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण
मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्रातील विकासकामे सांगितले.
-
आयुष्मान भारत योजनेचा हजारो कुटुंबियांना फायदा- नरेंद्र मोदी
आयुष्मान भारत योजनेचा हजारो कुटुंबियांना फायदा झाला, असे मोठे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
-
महिलांना 33 टक्के आरक्षण मिळावे- नरेंद्र मोदी
नुकताच नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, महिलांना 33 टक्के आरक्षण मिळावे, असे त्यांनी मोठे आवाहन केले.
-
3 कोटी महिलांना लखपती दिदी बनवले- नरेंद्र मोदी
3 कोटी महिलांना लखपती दिदी बनवले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मोठे विधान. यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
-
युद्ध सीमेवरही होते आणि आतही- नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, युद्ध सीमेवर होते आणि आतही होते.
-
युवकांसाठी नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, तरूणांची क्रिडा क्षमता ओळखण्यासाठी टॅलेंट हंट ओळखण्यासाठी सुरू करणार.
-
तरुणांसाठी क्रीडा क्षेत्रात मोठी संधी- मोदी
नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, तरुणांसाठी क्रीडा क्षेत्रात मोठी संधी आहेत…
-
तरुणांसाठी आनलाईन शिक्षण सुरू करणार- नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांबद्दल मोठे विधान केले. त्यांनी म्हटले की, तरुणांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करू.
-
तरूण वर्ग आपला आपली पहिली प्राथमिकता- नरेंद्र मोदी
लाल किल्ल्याच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरूणांबद्दल मोठे विधान केले. त्यांनी म्हटले की, तरूण वर्ग ही आपली पहिली प्राथमिकता असेल.
-
देश म्हणजे फक्त सरकार नव्हे तर प्रत्येक नागरिक आहे- नरेंद्र मोदी
देश म्हणजे फक्त सरकार नव्हे तर प्रत्येक नागरिक आहे. एआयबद्दलही बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसले.
-
संरक्षण क्षेत्रात भारताला ग्लोबल सप्लायर बनायचे- नरेंद्र मोदी
संरक्षण क्षेत्रात भारताला ग्लोबल सप्लायर बनायचे असल्याचे मोठे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
-
भारताकडे ग्लोबल लिडरशिप असायला हवी- नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, भारताकडे ग्लोबल लिडरशिप असली पाहिजे. टॉप 5 फार्मा कंपन्या भारतात असाव्यात.
-
देशात विदेशी पर्यटकांची संख्या वाढवायची आहे- नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, देशात विदेशी पर्यटकांची संख्या वाढवायची आहे.
-
भारताला ग्लोबल सप्लायर व्हायचंय- नरेंद्र मोदी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, भारताला दुसरा ग्लोबल सप्लायर व्हायचे आहे. सप्तधारी सातवी शक्ती भारताला व्हायचे आहे.
-
आपले विचार बललले पाहिजेत- नरेंद्र मोदी
लाल किल्ल्याहून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, आपण आपले विचार बदलले पाहिजेत.
-
भारतात स्थिर सरकार- नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले. भारतात स्थिर सरकार असून भक्कम लोकशाही असल्याचे मोठे विधान नरेंद्र मोदी यांनी केले.
-
विकसित भारतासाठी नवीन कायदा पाहिजे- नरेंद्र मोदी
15 ऑगस्ट 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याहून भाषण करताना म्हटले की, विकसित भारतासाठी नवीन कायदा पाहिजे आहे.
-
भारत तयार होता- नरेंद्र मोदी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, भारत तयार होता, प्रत्येक संकटासाठी. 10 वर्षात मोठे संकट आले.
-
दिशा दाखवण्यासाठी आपल्याकडे संविधान आहे- मोदी
आपल्याकडे दिशा दाखवण्यासाठी संविधान असल्याचे मोठे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
-
10 वर्षात देशाने अनेक संकटांचा सामना केला- नरेंद्र मोदी
10 वर्षात देशांने अनेक संकटाचा सामना केला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केली अखेर मोठी गोष्ट..
-
युद्धाचा परिणाम नागरिकांना जाणू दिला नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी इराण आणि अमेरिका युद्धाबद्दल बोलताना दिसले. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, युद्धाचा परिणाम नागरिकांना जाणून दिला नाही.
-
नागरिकांना काळजीत टाकण्याचे काम विरोधकांनी केले- नरेंद्र मोदी
लाल किल्ल्याहून भाषणादरम्या नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, नागरिकांना काळजीत टाकण्याचे काम विरोधकांनी केले.
-
छोटे स्वप्न न पाहात मोठे स्वप्न पाहा- नरेंद्र मोदी
नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे भाष्य केले. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, छोटे स्वप्न न पाहात मोठे स्वप्न पाहा.
-
10 वर्षात देशाने अनेक संकटांचा सामना केला- पंतप्रधान मोदी
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे भाष्य केले. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, 10 वर्षात भारताने अनेक संकटांचा सामना केला.
-
आपण शेकडो जुने कायदे रद्द केले- नरेंद्र मोदी
लाल किल्ल्याहून भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी आपण शेकडो वर्ष जुने कायदे रद्द केल्याचे मोठे विधान केले.
-
विकसित भारताचे स्वप्न कधीच अपूर्ण राहू शकत नाही- नरेंद्र मोदी
लाल किल्ल्याहून भाषणात बोलताना नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, विकसित भारताचे स्वप्न कधीच अपूर्ण राहू शकत नाही.
-
वीजेशिवाय नवीन तंत्रज्ञान चालवणे कठीण आहे- नरेंद्र मोदी
वीजेशिवाय नवीन तंत्रज्ञान चालवणे कठीण आहे, 12 वर्षात भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरत आहे.
-
भारत दुसऱ्या देशांवर आधारित राहणार नाही- नरेंद्र मोदी
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानिमित्त बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे भाष्य केले. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, भारत दुसऱ्या देशांवर आधारित राहणार नाही.
-
2047 मध्ये भारत विकसित होणार- नरेंद्र मोदी
लाल किल्ल्याहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत करण्याबाबत ही घोषणा केली.
-
नव्या संकल्पांसह देश पुढे जात आहे- नरेंद्र मोदी
देशाचा 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत, नव्या संकल्पांसह देश पुढे जात आहे. नरेंद्र मोदी सलग 13 व्यांदा जनतेला संबोधित करत आहेत.
-
नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरूवात..
मेरे प्यारे देशवासियो म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, आज देशभरात मोठे उत्साहाचे वातावरण आहे. तुमच्या सर्वांना स्वातंत्र्यदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. आता थोड्याच वेळात नरेंद्र मोदी देशातील जनतेला संबोधित करतील..
-
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले मोदींचे स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदीलाल किल्ल्यावर पोहोचले आहेत. त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
Prime Minister Narendra Modi arrives at Red Fort to lead the nation’s 80th Independence Day celebrations
The PM is received by Raksha Mantri Rajnath Singh, Raksha Rajya Mantri Sanjay Seth and Defence Secretary Rajesh Kumar Singh
The Defence Secretary introduces the General… pic.twitter.com/Ri4n8nb9pc
— ANI (@ANI) August 15, 2026
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर
ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर पोहोचले. येथे ते महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करतील. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
Prime Minister Narendra Modi pays floral tributes to the Father of the Nation, Mahatma Gandhi, at Rajghat on the 80th Independence Day
Photos: PM Modi/YouTube pic.twitter.com/KU4botzCKv
— ANI (@ANI) August 15, 2026
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकवणार
15 ऑगस्ट 2026 रोजी आपला 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकवतील आणि सकाळी 7.30 वाजता देशाला संबोधित करतील. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला सुमारे 27,000 लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
-
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही दिल्लीतील आपल्या निवासस्थानी तिरंगा फडकवला
देशभरातील लाखो लोक स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. त्याच वेळी, भारताचे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले, त्या महान स्वातंत्र्यसैनिकांप्रती ते कृतज्ञता व्यक्त करत आहेत. देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही दिल्लीतील आपल्या निवासस्थानी तिरंगा फडकवला.
200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. देशात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सर्व शाळा, महाविद्यालय, शासकीय, निम शासकीय, खासगी कंपन्या, सोसायट्या येथे तिरंगा फडकतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत ध्वजारोहण केले जाते. यावेळी लष्कराकडून काही प्रात्याक्षिके दाखवली जातात. दिल्लीत कार्यक्रमाकडे सर्वांच्या नजरा असतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशावासियांना संबोधित करतात. आजही दिल्लीत नरेंद्र मोदी देशावासियांना संबोधिक करणार आहेत. देशातील विविध भागांमध्ये आज 15 ऑगस्टनिमित्त खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजावंदन केले जाते. मोठा उत्साह लोकांमध्ये 15 ऑगस्टनिमित्त बघायला मिळतोय.
Published On - Aug 15,2026 6:58 AM
