AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेत प्रियांका गांधी यांचं पहिलं भाषण, भाषणातील 10 महत्त्वाच्या गोष्टी

प्रियांका गांधी वाड्रा यांनी संसदेत आज पहिल्यांदा भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरलं. संविधानाचे संरक्षण, आर्थिक न्याय आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावरुन त्यांनी सरकारवर टीका केली.

लोकसभेत प्रियांका गांधी यांचं पहिलं भाषण, भाषणातील 10 महत्त्वाच्या गोष्टी
| Updated on: Dec 13, 2024 | 3:27 PM
Share

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आज लोकसभेत पहिल्यांदा भाषण केलं. प्रियांका गांधी यांच्या लोकसभेतील पहिल्या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर सरकारवर जोरदार टीका केली. अदानीच्या मुद्द्यांवरुन देखील त्यांनी सरकारला घेरलं. प्रियांका गांधी यांनी म्हटले की, तुम्ही भूतकाळात किती दिवस जगणार आहात. सर्व जबाबदारी नेहरूंची आहे का? तुम्ही नेहमी जुन्याच गोष्टीवर बोलता, तुमच्याबद्दल कधी बोलणार?

प्रियांका गांधी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्न देखील उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, उद्योगपतींसाठी शेतीविषयक कायदे केले जात आहेत. देशातील शेतकरी रडत आहे. आपत्ती आल्यानंतर शेतकरी अडचणीत येतात. देशातील शेतकऱ्यांचा देवावर विश्वास आहे. पण आज जे कायदे बनवले जात आहेत ते बड्या उद्योगपतींसाठी बनवले जात आहेत.

  • लोकसभेतील आपल्या पहिल्या भाषणात प्रियांका गांधी यांनी संविधानाबाबत बोलताना म्हटले की, भारतीय राज्यघटना हे आरएसएसचे संविधान नाही. ते केवळ कागदपत्र नाही. न्याय आणि आशेची ती ज्योत आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला सरकार बनवण्याचा किंवा पाडण्याचा अधिकार दिला आहे. ही राज्यघटना न्यायाची हमी देते.
  • प्रियांका गांधी म्हणाल्या की, आज जातीय जनगणनेची चर्चा होत आहे. सत्ताधारी पक्षातील सहकाऱ्याने तसा उल्लेख केला. निवडणुकीत जो निकाल आला त्यावर हा उल्लेख करण्यात आला.
  • आजचे राजे वेश बदलतात, पण जनतेत जाण्याची हिंमत त्यांच्यात नाही. टीका ऐकण्याची त्यांच्यात ताकद नाही. आज देशात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पण भीती पसरवणारे स्वत: भीतीच्या सावटात जगत आहेत.
  • लोकसभेत जर असा निकाल आला नसता तर भाजपने संविधान बदलले असते. पण देशातील जनताच संविधान सुरक्षित ठेवेल, हे या निवडणुकीत त्यांना कळून चुकले आहे. संविधान बदलण्याची चर्चा या देशात चालणार नाही, याची त्यांना जाणीव झाली.
  • नेहरूंची देशासाठी मोठी भूमिका आहे. जी नाकारता येणार नाही. नेहरूंनी देशात अनेक सार्वजनिक उपक्रम सुरु केले. पण संपूर्ण जबाबदारी काय नेहरूंची आहे का? तुम्ही नेहमी जुन्या गोष्टींबद्दल बोलता, पण तुमच्याबद्दल कधी बोलणार.
  • उद्योगपतींसाठी शेतीविषयक कायदे केले जात आहेत. पण या देशातील वायनाडपासून ललितपूरपर्यंतचा शेतकरी रडत आहेत. शेतकऱ्यांचा देवावर विश्वास आहे. पण देशात कायदे उद्योगपतींसाठी केले जात आहेत.
  • अदानी प्रकरणावर प्रियंका गांधी म्हणाल्या की, सरकारने सर्व कोल्ड स्टोरेज अदानींना दिले. एका व्यक्तीला वाचवण्यासाठी देशातील 142 कोटी जनतेकडे दुर्लक्ष होत आहे. हे देश पाहत आहे. सर्व व्यवसाय, सर्व संसाधने, सर्व संपत्ती, सर्व संधी एकाच व्यक्तीकडे सोपवल्या जात आहेत.
  • आज सरकार अदानीजींच्या नफ्यावर चालत आहे. गरीब तो अधिक गरीब होत आहे. श्रीमंत तो अधिक श्रीमंत होत आहे.
  • तुम्ही महिला सक्षमीकरणाचा कायदा आणला, पण त्याची अंमलबजावणी का होत नाही. आजची स्त्री 10 वर्षे त्याची वाट पाहत बसणार का?
  • सरकार खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण कमकुवत करण्याचे काम करत आहे.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.