KGF चित्रपट पाहूनच सायको किलरने केल्या 4 सुरक्षारक्षकांच्या हत्या; मोबाईलसाठी दगडाने ठेचायचा वॉचमनचं डोकं

| Updated on: Sep 02, 2022 | 11:55 AM

हत्या केल्यानंतर सायको किलरला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याने सांगितले की, KGF चित्रपटातील हत्याकांड पाहून आपल्याला माणसांची हत्या करावी असं वाटलं असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. या माहितीबरोबरच त्याने अन्य काही ठिकाणीही खून केल्याची कबूल केले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात याच सायको किलरने सागरमधील चार सुरक्षा रक्षकांची हत्या केल्याचेही उघड झाले आहे.

KGF चित्रपट पाहूनच सायको किलरने केल्या 4 सुरक्षारक्षकांच्या हत्या; मोबाईलसाठी दगडाने ठेचायचा वॉचमनचं डोकं
Follow us on

सागरः मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh)  सागर जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांची (Security Guard) हत्या करणाऱ्या सायको किलरला पोलिसांनी अटक केली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून हत्या (Murder) करणाऱ्या सायको किलरला ताब्यात घेण्यात आले आहे. भोपाळमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक खून करण्यात आला होता. त्याच्या तपासासाठी संशयित आरोपीला अटक करून सागरला नेण्यात आले आहे. या हत्याप्रकरणी पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती देणार आहेत. ज्या सायको किलरकडून हत्या करण्यात आली आहे, तो सायको किलर हा बाहेर झोपलेल्या सुरक्षा रक्षकांची हत्या करत होता. तो असं का करत होता याचा पोलिसांनी केल्यानंतर केजीएफ चित्रपटातील हत्याकांड पाहून हे हत्या करण्याची कल्पना सुचली असंही त्याने पोलिसांना सांगितले.

प्रसिद्धसाठी करायचा हत्या

हत्या केल्यानंतर सायको किलरला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याने सांगितले की, KGF चित्रपटातील हत्याकांड पाहून आपल्याला माणसांची हत्या करावी असं वाटलं असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. या माहितीबरोबरच त्याने अन्य काही ठिकाणीही खून केल्याची कबूल केले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात याच सायको किलरने सागरमधील चार सुरक्षा रक्षकांची हत्या केल्याचेही उघड झाले आहे.

भोपाळमधील हत्याही सायको किलरकडूनच

ज्या सायको किलरने सुरक्षा रक्षकांची हत्या केली आहे, त्याचा तपास करत असताना पोलिसांनी सांगितले की, हा सायको किलर मोबाईल चोरी आणि पैशासाठी सुरक्षा रक्षकांची हत्या करत होता असंही स्पष्ट झाले आहे. हा संशयित आरोपी हा मानसिकदृष्ट्या खचल्याचे सांगितले जात असून त्याने सागर जिल्ह्यात आणि भोपाळमध्ये खून केले असल्याचे सांगितले जात असून सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाईल लोकेशनवरून अटक

या प्रकरणातील संशयित आरोपीने आपले नाव शिवप्रसाद असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी हत्या केलेल्या सायको किलरचा तपास सुरु केल्यानंतर त्याच्याकडून सहकार्य करण्यात येत असून त्याने आपणच हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. तपास सुरू केल्यानंतर सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन आणि सार्वजनिक ठिकाणी चौकशी केल्यानंतर त्याचे भोपाळमधील लोकेशन सापडले होते. त्यानंतर त्याला सागरमधून त्याला अटक करण्यात आली.

सुरक्षारक्षकाचा मोबाईलही गायब

15 दिवसांपूर्वी भैंसा येथील दुकानाजवळ एका सुरक्षारक्षकाची डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली होती. तर त्यावेळी सुरक्षारक्षकाचा मोबाईलही गायब झाला होता. त्यानंतर मंगळवारीही सिव्हिल लाइन्स पोलिसांना कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्येही एका सुरक्षारक्षकाची हत्या करण्यात आली होती. त्याचे डोकेही दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली होती. तसेच या वॉचमनचा मोबाईलही घटनास्थळावरून गायब करण्यात आला होता.