Capt Amrinder Singh New Party: नवीन पक्ष भाजपासोबत जागावाटप करेल, पंजाबमधील सर्व 117 जागा लढवणार

आपला नवाीन पक्ष भाजपासोबत जागावाटप करेल, परंतु अकाली दलासोबत युती करणार नाही, असं कॅप्टन यांनी स्पष्ट केलं.

Capt Amrinder Singh New Party: नवीन पक्ष भाजपासोबत जागावाटप करेल, पंजाबमधील सर्व 117 जागा लढवणार
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 2:43 PM

चंदीगड: आखेर आज पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्ष स्थापनेची घोषणा केली. पक्षाचे नाव आणि चिन्ह लवकरच जाहिर करण्यात येईल असं ते म्हणाले. कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये राहणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं होतं. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा स्वतः केली. आपला नवाीन पक्ष भाजपासोबत जागावाटप करेल, परंतु अकाली दलासोबत युती करणार नाही, असं कॅप्टन यांनी स्पष्ट केलं. (punjabs ex cm amrinder singh new party will not tie with bjp to share seats and fight election)

ते पुढे म्हणाले की, योग्य वेळ आल्यावर त्यांचा पक्ष पंजाबमधील सर्व 117 जागांवर लढेल. “वेळ येईल तेव्हा आम्ही सर्व 117 जागा लढवू, मग ते जागा वाटपातून असो किंवा स्वबळावर,” अमरिंदर सिंग म्हणाले.

भाजपाशी युती नाही

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी थेट दिल्लीची वारी करुन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. याच कारणामुळे ते भाजपत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. आज त्यांनी स्पष्ट केलं की त्यांचा नवीन पक्ष भाजपासोबत युती करणार नाही पण, भाजपासोबत जागावाटप करेल.

नवज्योत सिंग सिद्धूंचा टोला

दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धूंनी अमरिंदर सिंग यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “मागच्या वेळी तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि तेव्हा तुम्ही तुमचे मतदार गमावले. तुम्हाला केवळ 856 मतं मिळाली होती. पंजाबच्या हिताशी तडजोड केल्याबद्दल पंजाबचे लोक पुन्हा तुम्हाला शिक्षा देण्याची वाट पाहत आहेत,” अशी टीका सिद्धू यांनी केली आहे.

इतर बातम्या 

एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू; दिवाळीपूर्वी पगार करण्यासह अनेक मागण्यांसाठी उपसले आंदोलनाचे हत्यार

22 वर्षांनंतर ठाकरेंचं पुन्हा ‘सीमोल्लंघन’, बाळासाहेबांनंतर नातू आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत

‘तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला’, वानखेडे प्रकरणात चित्रा वाघ यांचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर

punjabs ex cm amrinder singh new party will not tie with bjp to share seats and fight election