ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यानंतर मोर्चा थेट.., महारॅलीमधून राहुल गांधींचा मोठा इशारा, पंतप्रधान मोदींबद्दल नेमकं काय म्हणाले?

गेल्या काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं, या रॅलीमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यानंतर मोर्चा थेट.., महारॅलीमधून राहुल गांधींचा मोठा इशारा, पंतप्रधान मोदींबद्दल नेमकं काय म्हणाले?
Rahul Gandhi
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 01, 2026 | 4:59 PM

गेल्या काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. इंडिया आघाडीमधील नेत्यांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राहुल गांधींसह इंडिया आघाडीमधील सर्वच नेत्यांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीकडून दिल्लीमधील रामलीला मैदानात पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभारण्यात आलं. इंडिया आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या या महारॅलीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, यांच्यासह इंडिया आघाडीमधील सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान या सभेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल गाधी?

Loading...

इंडिया आघाडीच्या महारॅलीमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘लोकांच्या यंत्रणा हायजॅक करण्यात आल्या आहेत. परंतु आम्ही देशातील लोकशाही संपवू देणार नाही,  आम्ही संविधानाला संपवू देणार नाही.  मतचोरी ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे.  ज्ञानेश कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून हटाव लागणारच.  ज्ञानेश कुमारांशिवाय मोदी पंतप्रधान झालेच नसते,  देशाच्या 15 टक्के मतदारांना मतदान यादीतून काढून टाकलं.  2024 ची निवडणूक बेकायदेशीर होती, असा हल्लाबोल यावेळी राहुल गाधी यांनी केला आहे.

दरम्यान  पुढे बोलताना ते म्हणाले की,  2024 नंतर साडेतेरा कोटी मतदारांना मतदान यादीतून काढून टाकण्यात आलं.  मोठ्या उद्योगपतींचं कोट्यवधिचं कर्ज माफ केलं जातं, पण शेतकरी कर्ज फेडू शकला नाही की त्याला जेलमध्ये टाकलं जातं. ही महारॅली भारताच्या जेनतेचा आवाज आहे. तुम्ही विसरू नका, आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अमित शाह यांच्याविरोधात लिगल कारवाई होईल.  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यानंतर मोर्चा मोदींकडे वळणार आहे, असा थेट इशाराच या महारॅलीमधून राहुल गांधी यांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us