मोठ्या राजकीय घडामोडी, ममता बॅनर्जींच्या संपर्कात राहुल गांधी; पडद्यामागे काय घडतंय?

राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाढत्या संपर्काने पश्चिम बंगालमधील राजकारण तापले आहे. नंदीग्राम पोटनिवडणुकीत टीएमसीने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिल्याने ‘इंडिया’ आघाडीत जवळीक वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राहुल गांधी ममतांच्या संपर्कात असल्याची माहिती टीएमसी खासदाराने दिली.

मोठ्या राजकीय घडामोडी, ममता बॅनर्जींच्या संपर्कात राहुल गांधी; पडद्यामागे काय घडतंय?
rahul gandhi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2026 | 11:54 AM

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने मोठा झटका दिल्यानंतर आता दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. नंदीग्राम पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. यावरून काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यात जवळीक वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच आता काँग्रेस-टीएमसीच्या आघाडीवर टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं मोठं विधान आलं आहे.

टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी हुगलीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना काँग्रेसबरोबरच्या आघाडीवर भाष्य केलं. आम्ही इंडिया आघाडी काम करत आहेत, असं सांगतानाच राहुल गांधी हे ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात आहेत. तसेच नंदीग्रामची सीट आम्ही काँग्रेसला सोडली आहे. नंदीग्राममधून टीएमसीच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं कल्याण बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसचा उमेदवार प्रचार करणार नाही

काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना 3 ऑक्टोबर पर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यांच्यावर बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे आणि हत्येशी संबंधित एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या इतर अनेक गंभीर आरोपही आहेत. त्यामुळे मिलन प्रधान हे तुरुंगात असल्याने ते निवडणूक प्रचार करू शकणार नाहीत. कारण 4 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा प्रचार संपत आहे. तसेच 6 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अधीर रंजन यांच्यावर टीका

यावेळी कल्याण बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर टीका केली आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्यात मुख्य अडचण अधीर रंजन चौधरी आहेत. अधीर रंजन फक्त आणि फक्त ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आहेत. ते सीपीएमच्या विरोधात नाहीत, असा आरोप बॅनर्जी यांनी केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते अब्दुल मन्नान यांचंही नाव घेतलं. असे नेते आघाडीत समस्या निर्माण करत आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये आघाडी करायची की नाही याबाबत काँग्रेसलाच आता निर्णय घ्यायचा आहे, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us