AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi CJP Protest : अधिकाऱ्याने माझ्या प्रायव्हेट पार्टवर…दिल्ली आंदोलनातील तरुणीच्या आरोपांनी एकच खळबळ; हादरवून टाकणारा दावा!

माझे आडनाव शर्मा असे आहे. माझे नाव मुस्कान असल्याने प्रत्येकालाच मी मुस्लीम असल्याचे वाटते. त्यामुळं मला जास्तच शिव्या दिल्या जात आहेत, अशी खंत त्या तरुणीने व्यक्त केली.

Delhi CJP Protest : अधिकाऱ्याने माझ्या प्रायव्हेट पार्टवर...दिल्ली आंदोलनातील तरुणीच्या आरोपांनी एकच खळबळ; हादरवून टाकणारा दावा!
rahul gandhi press conference and cjp protestImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2026 | 6:03 PM
Share

Rahul Gandhi Press COnference : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. सीजेपीच्या नेतृत्त्वात दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलक तरुणांवर अमानुष अत्याचार केला, असा दावा राहुल गांधी यांनी केला. पोलिसांनी निर्घृणपणे तरुणांना मारहाण केली, तरुणांना रोखण्यासाठी पॅलेट गनचा वापर केला गेला,असंही राहुल गांधी पुन्हा एकदा म्हणाले. यावेळी त्यांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या आणि पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्या तरुण-तरुणींना माध्यमांसमोर उभं केलं. या तरुणांनीच माध्यमांना आमच्यासोबत काय घडलं? पोलिसांनी कसा अत्याचार केला, याची हकिकत सांगितली. मुस्कान शर्मा नावाच्या तरुणीने केलेल्या दाव्यानंतर तर देशात एकच खळबळ उडाली आहे.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत अगोदर पोलिसी अत्याचारावर भाष्य केलं. त्यानंतर तिथे आलेल्या तरुणांनी एक-एक करून त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? याची माहिती दिली. यावेळी मुस्कान शर्मा नावाच्या तरुणीनने पुढे येत पोलिसांनी तिच्यावर केलेल्या लाठीचार्जबाबत माहिती दिली. माझं नाव मुस्कान आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांमध्ये मी देखील सहभागी झालेली होती. मी जेव्हा शांततेत चालत होते, तेव्हा पोलिसांनी मला का मारलं? आरएएफ ऑफिसने माझ्यावर लाठीचार्ज का केला? असा सवाल मुस्कान शर्माने केला.

माझ्या प्रायव्हेट पार्टवर…

तसेच, लाठीचार्ज करताना तुम्ही मांड्यांच्या वर मारू शकत नाही. एक पुरुष ऑफिसर महिला आंदोलकांना मारू शकत नाही, असे नियम आहेत. असे असताना एका पुरुष आरएफ ऑफिसरने माझ्या प्रायव्हेट पार्टवर मारण्याचा प्रयत्न केला. हे कृत्य करण्यासाठी संबंधित ऑफिसरला ज्याने आदेश दिले, त्याने येऊन मला माफी मागितली तर मला समाधान वाटेल, असी मागणीही तिने केली.

प्रत्येकालाच मी मुस्लीम असल्याचे वाटते

पुढे बोलताना, माझे आडनाव शर्मा असे आहे. माझे नाव मुस्कान असल्याने प्रत्येकालाच मी मुस्लीम असल्याचे वाटते. त्यामुळं मला जास्तच शिव्या दिल्या जात आहेत, अशी खंत व्यक्त करत सरकारविरोधात बोललं की ही व्यक्ती तर मुस्लीम आहे, असा नेरेटिव्ह देशात सध्या पसवरवले जात आहे, त्याचेच हे एक उदाहरण आहे. एखादी व्यक्ती मुस्लीम असेल तर ती देशद्रोही ठरवू शकतो, असा सवालही संबंधित तरुणीने उपस्थित केला.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं