Rahul Gandhi : काँग्रेस ट्रेनिंग कॅम्पमध्ये 2 मिनिटं उशिराने पोहोचल्याबद्दल राहुल गांधी यांना अशी शिक्षा

Rahul Gandhi : सचिन राव यांनी सांगितलं की, 'शिबिरात अजून काही गोष्टी झाल्या. पण त्या बद्दल बोलण्याचं स्वातंत्र्य नाहीय'. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राहुल गांधी यांचा पाच महिन्यातील हा दुसरा दौरा होता.

Rahul Gandhi : काँग्रेस ट्रेनिंग कॅम्पमध्ये 2 मिनिटं उशिराने पोहोचल्याबद्दल राहुल गांधी यांना अशी शिक्षा
Rahul Gandhi
| Updated on: Nov 10, 2025 | 11:00 AM

काँग्रेस नेते राहुल गांधी मध्य प्रदेशात पचमढी येथील काँग्रेस प्रशिक्षण शिबिरत दोन मिनिटं उशिराने पोहोचले. इथे उशिराने येण्यासाठी त्यांना शिक्षा दिली गेली. त्यांनी ही शिक्षा मान्य केली. राहुल गांधी यांनी पुश-अप्सची शिक्षा पूर्ण केली. या बद्दल पक्षाच्याच एका कार्यकर्त्याने माहिती दिली. काँग्रेसकडून संघटन सृजन अभियान शिबिर सुरु आहे. तिथे दोन मिनिटं उशिराने पोहोचल्याबद्दल राहुल यांना ही शिक्षा देण्यात आली. शिबिराला उशिराने पोहोचणाऱ्यांसाठी एआयसीसी प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव यांनी दहा पुश अप्सची शिक्षा ठेवली आहे. हे अभियान 11 नोव्हेंबरला संपणार आहे.

आमचे नेते राहुल गांधी यांच्यासाठी असं करणं ही काही नवीन आणि हैराण करणारी गोष्ट नाहीय. आम्ही आमच्या शिबिरात नियमांच कठोरतेने पालन करतो असं काँग्रेसचे मिडिया समन्वयक अभिनव बरोलिया म्हणाले. पक्षात लोकशाही असून तिथे सर्व सदस्यांसाठी नियम समान आहेत. सर्वांसोबत समान व्यवहार केला जातो. आमच्या पक्षात भाजपसारखी हुकूमशाही नाहीय असं अभिनव बरोलिया म्हणाले. त्यानंतर राहुल गांधी निवडणूक प्रचारासाठी बिहारला निघून गेलेत.

पाच महिन्यातील हा दुसरा दौरा

सचिन राव यांनी सांगितलं की, शिबिरात अजून काही गोष्टी झाल्या. पण त्या बद्दल बोलण्याचं स्वातंत्र्य नाहीय‘. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राहुल गांधी यांचा पाच महिन्यातील हा दुसरा दौरा होता. मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत सर्व शिक्षा अभियानाची घोषणा करण्यात आलेली. भोपाळमधून या अभियानाची 3 जूनला सुरुवात झालेली. आम्ही दीर्घकाळापासून मध्य प्रदेशात सत्तेत नाहीय असं काँग्रेस नेत्याने सांगितलं. मिशन 2028 अंतर्गत आम्ही राज्यात पुन्हा एकदा सरकार बनवण्याच्या दृष्टीने काम करतोय असं ते म्हणाले.