Share Market : राहुल गांधीच्या आवडत्या शेअरची, बाजारात डरकाळी; एकाच उडीत कमावले 17 हजार कोटी
Rahul Gandhi Favourite Stock : राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओत अनेक बड्या कंपन्यांचे शेअर्स आहेत. एक शेअर तर असा आहे जो मार्केट कॅपच्या हिशोबाने देशातील टॉप 5 फर्ममध्ये सहभागी आहे. या शेअरमध्ये शुक्रवारी चांगली तेजी दिसली. त्यामुळे या फर्मला 17 हजार कोटींपेक्षा अधिकचा फायदा झाला.

Stock Market Rahul Gandhi : शेअर बाजारात अनेक चढउतार दिसत असले तरी देशातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला. राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओत अनेक बड्या कंपन्या आहेत. पण या आवडत्या शेअरने अवघ्या काही तासांमध्ये जवळपास 17 हजार कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली. या शेअरमध्ये 2 टक्क्यांची तेजी दिसली. आयसीआयसीआय बँकेच्या शेअरने ही कमाई केली. शुक्रवारी या शेअरमध्ये मोठी उसळी दिसली. राहुल गांधींकडे आयसीआयसीआय बँकेचे जवळपास 2,300 शेअर आहेत. याविषयीची माहिती राहुल गांधी यांनी 2024 मधील लोकसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्र दिली होती. कसा वधारला हा शेअर जाणून घ्या…
ICICI Bank च्या शेअरमध्ये मोठी तेजी
मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसली. आकडेवारीनुसार, शुक्रवारी बँकेचा शेअर दुपारी 2 वाजून 55 मिनिटावर 1.76 टक्क्यांच्या तेजीसह 1,343.65 रुपयांवर व्यापार करत होता. तर व्यापारी सत्रा दरम्यान हा शेअर 1,344.20 रुपयांसह व्यापारी दिवसाच्या सर्वाधिक उच्चांकावर होता. किरकोळ घसरणीसह हा शेअर सकाळच्या सत्रात 1,318.55 रुपयांवर उघडला होता. तर एक दिवसांपूर्वी बँकेचा शेअर 1,320.40 रुपयांवर बंद झाला होता. बँकेचा 52 आठवड्यातील उच्चांक 1,494.10 रुपये इतका आहे. ही उच्चांकी कामगिरी बँकेने 31 जुलै रोजी केली होती. याचा अर्थ गेल्या जवळपास 100 दिवसात हा शेअर 11 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे.
अवघ्या काही तासात कमावले 17 हजार कोटी
आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये मोठी तेजी आली. बँकेने नफा कमावल्याच्या वृत्ताने ही तेजी दिसली. परिणामी बँकेच्या मूल्यांकनात 17 हजार कोटींपेक्षा अधिकची वाढ दिसली. एक दिवसाअगोदर बँकेच्या शेअर्सचे मूल्यांकन 9,43,568.59 कोटी रुपये होते. ते शुक्रवारी व्यापारी सत्रात वाढून 9,60,576.26 रुपये झाले. याचा अर्थ बँकेच्या मूल्यांकनात 17,007.67 कोटी रुपयांची वाढ झाली.
राहुल गांधींना जवळपास 4.65 लाखांचा फायदा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे ICICI Bank चे अनेक शेअर आहेत. वर्ष 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात आयसीआयसीआय बँकेचे 2,299 शेअर्सचा उल्लेख करत त्यांचे मूल्य 30.90 लाख असल्याचे सांगण्यात आले होते. 3 मे रोजी त्यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. तेव्हा बँकेच्या शेअरची किंमत 1,142 रुपये इतकी होती. तेव्हा एकूण शेअर्सचे मूल्य 26,25,458 रुपये होते. तर आताच्या भावानुसार, त्यांना दीड वर्षात जवळपास 4.65 लाख रुपयांचा फायदा झाल्याचे दिसून आले. काल या शेअरने मोठी झेप घेतल्याने गुंतवणूकदारांना त्याचा फायदा झाला.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही क्रिप्टो करन्सीत स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.
