AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Shewale : उद्धव ठाकरेंची मोदींसोबत युतीसाठी तासभर चर्चा, पत्रकार परिषद शिंदेंची पण गौप्यस्फोट राहुल शेवाळेंचे…

माझ्या परीने मी युतीचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही प्रयत्न करा, असं उद्धव ठाकरे आम्हाला म्हणाले, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर दुसरीकडे संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या, असे शेवाळे म्हणाले.

Rahul Shewale : उद्धव ठाकरेंची मोदींसोबत युतीसाठी तासभर चर्चा, पत्रकार परिषद शिंदेंची पण गौप्यस्फोट राहुल शेवाळेंचे...
नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना राहुल शेवाळेImage Credit source: tv9
| Updated on: Jul 19, 2022 | 6:47 PM
Share

नवी दिल्ली : शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल शेवाळे यांनी केला आहे. ते नवी दिल्लीत बोलत होते. याची सविस्तर माहिती देताना राहुल शेवाळे (Rahul Shewale) म्हणाले, की 1 जून रोजी आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं पक्षासोबत राहू. पण तेव्हा आम्ही सांगितलं भाजपासोबत निवडणूक लढवली आहे. आम्हाला त्रास होतोय. शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी त्या भूमिकेचं स्वागत करेल, असे ते म्हणाले. त्यावेळी संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत उपस्थित होते. त्या सर्वांच्या समोर उद्धव ठाकरे म्हणाले, की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले. भाजपाने तो निर्णय घेतला, तर मी स्वागत करेल असे सांगितले. त्याचे आम्ही स्वागत केले, असे शेवाळे म्हणाले.

‘त्यामुळे भाजपा नेतृत्व नाराज’

पुढे बोलताना शेवाळे यांनी सांगितले, की पुन्हा बैठका झाल्या. तेव्हा पुढच्या निवडणुकीत भाजपासोबत युती करण्याचा आम्ही आग्रह धरला. पण उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून निवडणूक लढू म्हणून सांगितलं. आम्ही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिला तर त्यांच्यासोबत युती करण्याचा मार्ग मोकळा होईल, असं आम्ही सांगितलं. तेव्हा मलाही युती करायची आहे. मी माझ्या परीने युती करायचा खूप प्रयत्न केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मोदींना भेटायला आले. तेव्हा या भेटीत मोदींकडे उल्लेख केला. त्यावेळी युतीबाबत मोदींसोबत एक तास चर्चा झाली. जूनमध्ये बैठक झाली. जुलैमध्ये अधिवेशन होतं. त्यावेळी भाजपाच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. त्यामुळे भाजपा नेतृत्व नाराज झालं. एकीकडे युतीचं बोलणं होतंय आणि दुसरीकडे आमदारांवर कारवाई होतेय. त्याबद्दल भाजपe श्रेष्ठीत नाराजी पसरली.

‘रिस्पॉन्स मिळाला नाही’

कित्येक वेळा उद्धव ठाकरेंनी युतीची चर्चा केली. पण रिस्पॉन्स मिळाल नाही. या सर्व गोष्टी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितल्या. माझ्या परीने मी युतीचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही प्रयत्न करा, असं ते आम्हाला म्हणाले. मी स्वत: चार-पाच खासदारांना भेटलो. फडणवीस आणि शिंदेंना भेटलो. पण ज्या गोष्टींची पूर्तता करायची होती ती केली नाही. आमच्या चार पाच बैठका झाल्या. शेवटच्या बैठकीतही आम्ही युती करायला तयार आहोत. पण मला सहकार्य मिळत नाही. आम्ही सर्व त्यावेळी प्रयत्न करत होतो.

काय म्हणाले राहुल शेवाळे?

‘संजय राऊतांच्या महाविकास आघाडीसोबत बैठका’

एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे संजय राऊत हे महाविकास आघाडीसोबत बैठका आणि उपराष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देणं सुरू होतं. त्यामुळे आमच्या मनात शंका निर्माण झाल्या. आम्ही युतीचे प्रयत्न करत असताना मार्गारेट अल्वांना पाठिंबा दिला गेला. दोन बैठका झाल्या होत्या. मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी पत्रं दिलं. मार्गारेट अल्वा महाराष्ट्राच्या प्रभारी असताना त्या चार वर्षात त्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला.त्यामुळे त्यांना पाठिंबा देणं उचित वाटलं नाही. उद्धव ठाकरेंकडून युतीसाठी रिस्पॉन्स आला नाही आणि राऊतांनी महाविकास आघाडीच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो, असे राहुल शेवाळे म्हणाले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.