राजस्थानात खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्णांवर मोफत उपचार होणार, राजस्थान सरकारचा मोठा निर्णय

| Updated on: May 09, 2021 | 4:21 PM

गेहलोत सरकारने मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थानात खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्णांवर मोफत उपचार होणार, राजस्थान सरकारचा मोठा निर्णय
अशोक गेहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान
Follow us on

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा निर्णय घेतलाय. गेहलोत सरकारने मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा फायदा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जोडल्या गेलेल्या सर्व परिवारांना मिळणार आहे. (Corona patients will get free treatment in private hospitals in Rajasthan)

राजस्थान राज्य आरोग्य विमा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणा राजोरिया यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजनेशी जोडले गेलेल्या कोरोना रुग्णांना सर्व खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळेल याकडे लक्ष द्यावं अशी सूचना करण्यात आली आहे. या योजनेशी जोडले गेलेल्या कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी एखाद्या रुग्णालयाने नकार दिला तर त्या रुग्णालयाविरोधात कठोर पाऊल उचलावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.

योजनेचा लाभ न देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई

राज्य सरकारच्या आदेशानंतर कोरोना संक्रमित रुग्णांच्या उपचारासाठी मान्यता प्राप्त रुग्णालयांमध्ये चिरंजीवी योजनेशी जोडले गेलेल्या कुटुंबाला कोरोनावरील उपचारासाठी नवं पॅकेज मंजूर केलं आहे. या आदेशाचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांविरोधात कठोर पाऊल उचललं जाईल, असा इशाराही राजस्थान सरकारने दिला आहे.

‘चिरंजीवी योजने’ अंतर्गत प्रत्येक परिवाराला 5 लाखापर्यंत कॅशलेश विमा कव्हर

राजस्थान सरकारने 1 मे 2021 पासून चिरंजीवी योजनेची सुरुवात केली आहे. सरकारच्या या विमा योजनेशी आतापर्यंत 22 लाखापेक्षा अधिक कुटुंब जोडले गेले आहेत. 3 हजार 500 कोटी रुपयांच्या या योजनेत राज्यातील प्रत्येक परिवाराला 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक विमा कव्हर मिळणार आहे. या योजनेशी जोडले जाण्यासाठी सरकारने 31 मे 2021 ची वेळमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. राजस्थानच्या गेहलोत सरकारने टाकलेलं हे पाऊल ऐतिहासिक मानलं जातंय.

संबंधित बातम्या :

पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर्स 50 टक्केच कार्यक्षम; शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप

भारतात 1 ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे 10 लाख लोकांचा मृत्यू; लॅन्सेटचा गंभीर इशारा

Corona patients will get free treatment in private hospitals in Rajasthan