AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर्स 50 टक्केच कार्यक्षम; शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप

तर रुग्णांच्या जीवितास धोका आहे. हे व्हेंटीलेटर 100 टक्के क्षमेतने चालणारे हवेत. | PM cares fund Ventilators

पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर्स 50 टक्केच कार्यक्षम; शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप
व्हेंटिलेटर्स
| Updated on: May 09, 2021 | 2:53 PM
Share

ठाणे: पंतप्रधान निधीतून कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी उपलब्ध झालेले व्हेटींलेटर (ventilators) केवळ 50 टक्के क्षमतेनेच काम करत असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून चौकशी केली जावी, अशी मागणीही श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये नवा वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत. (Ventilators supplied under PM cares fund are working only on 50 percent capacity says shiv sena MP Shrikant Shinde)

पीएम केयर फंडातून वाटप करण्यात आलेले व्हेंटिलेटर्स 50 टक्के क्षमतेनेच चालतात, असा निष्कर्ष डॉक्टरांच्या चर्चेतून पुढे आला आहे. ही बाब खरी असेल तर रुग्णांच्या जीवितास धोका आहे. हे व्हेंटीलेटर 100 टक्के क्षमेतने चालणारे हवेत. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य खात्याच्या निदर्शनास आणून दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे खासदार शिंदे यांना सांगितले.

केंद्राचा सावळागोंधळ, PM केअर फंडातून नाशिकला 60 व्हेंटिलेटर, पण कनेक्टरच नसल्यानं बंद

ही बाब ठाणे जिल्ह्यातील डॉक्टरांच्या माध्यमातून उघड झाली आहे. केवळ ठाणे जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेनुसार चालणारे व्हेटींलेटर प्राप्त झाले आहे की, संपूर्ण राज्यात आणि देशात अशा प्रकारच्या व्हेटींलेटरचा पुरवठा केला गेला आहे, याची शहानिशा केली जावी असे शिंदे यांनी मागणी केली आहे. ज्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. नेमके किती व्हेंटिलेटर्स पंतप्रधान निधीतून पुरविले गेले आहेत, याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध होऊ शकते असेही शिंदे यांनी सांगितले.

नाशिकमध्ये 60 व्हेंटिलेटर धूळखात

नाशिकला पीएम केअर फंडातून 60 व्हेंटिलिटर मिळूनही ते जोडणी अभावी अजून ही बिटको रुग्णलयात धूळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. एकीकडे राज्यात प्राणरक्षक प्रणालीअभावी (व्हेंटिलेटर्स) रुग्ण मरत असताना नाशिकमध्ये प्रशासन इतक्या हलगर्जीपणाने कसे वागू शकते, असा प्रश्न विचारला जात आहे.

याबाबत मनपा आयुक्तांना जाब विचारला असता त्यांनी या सगळ्याचे खापर संबंधित कंपनीवर फोडले. त्यानंतर प्रथेप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारणही रंगले. मात्र, या सगळ्यात या व्हेंटिलेटर्सची जोडणी करुन रुग्णांचे जीव वाचवता येतील, असा विचार अद्याप प्रशासनाच्या मनात आलेला नाही.

संबंधित बातम्या:

‘देशात लोक मरतायत, पण परदेशातून येणारी वैद्यकीय साधनसामुग्री विमानतळांवरच धूळ खात पडलेय’

भारतात 1 ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे 10 लाख लोकांचा मृत्यू; लॅन्सेटचा गंभीर इशारा

सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक, कोरोना रोखणारं मुंबई मॉडेल काय? BMC ची War Room कसं काम करते?

(Ventilators supplied under PM cares fund are working only on 50 percent capacity says shiv sena MP Shrikant Shinde)

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.