‘देशात लोक मरतायत, पण परदेशातून येणारी वैद्यकीय साधनसामुग्री विमानतळांवरच धूळ खात पडलेय’

गेल्या आठवडाभरात अनेक देशांनी वैद्यकीय मदत घेऊन आपली विमाने भारतात पाठवली होती. | medical aid foregin countries

'देशात लोक मरतायत, पण परदेशातून येणारी वैद्यकीय साधनसामुग्री विमानतळांवरच धूळ खात पडलेय'
असदुद्दीन ओवेसी, खासदार

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जगातील अनेक देशांनी भारतात ऑक्सिजन (Oxygen) आणि वैद्यकीय साधनसामुग्रीचा पाठवायला सुरुवात केली होती. मदतीचा हा ओघ प्रचंड असल्याने साधारण प्रत्येक दिवशी भारतात वैद्यकीय साधनसामुग्री (Medical Aid) असलेली विमाने उतरत आहेत. मात्र, ही सर्व मदत नक्की जात कुठे आहे, असा सवाल आता अनेकजण उपस्थित करत आहे. (Questions raised over disbursment of covid related foregin aid to India)

सुरुवातीला केवळ विरोधकच हा प्रश्न विचारत होते. मात्र, आता यामध्ये अमेरिकी प्रसारमाध्यमांनीही उडी घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना एका पत्रकारपरिषदेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. अमेरिकी करदात्यांच्या पैशातून भारताला पाठवली जात असलेली मदत नेमकी कुठे पोहोचत आहे? या मदतीचे वितरण कशाप्रकारे होत आहे, याची माहिती आपल्याला मिळू शकत नाही का, असा सवाल एका पत्रकाराने विचारला.

गेल्या काही दिवसांत अनेक देशांनी भारतात ऑक्सिजन सिलेंडर्स, कॉन्सट्रेटर्स, रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि अन्य औषधांचा साठा भारतात पाठवला होता. आतापर्यंत जवळपास तीन हजार टन वैद्यकीय सामुग्री भारतात दाखल झाली आहे.

असदुद्दीन ओवेसी मोदी सरकारवर संतापले

देशात लोक कोरोनामुळे मरत आहेत आणि परदेशातून आलेली वैद्यकीय साधनसामुग्री विमानतळांवर धूळ खात पडली आहे, असा आरोप एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी केला. सीएनएन वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरात अनेक देशांनी वैद्यकीय मदत घेऊन आपली विमाने भारतात पाठवली होती. मात्र, ही सामुग्री रुग्णालयांमध्ये न जाता विमानतळावरच पडून आहे.

केंद्र सरकार काय म्हणाले?

केंद्र सरकारने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. परदेशातून आलेल्या मदतीचे केंद्राच्या अखत्यारित असलेल्या 38 रुग्णालयांमध्ये वाटप केले जात आहे. आतापर्यंत 40 लाख वैद्यकीय सामुग्री भारतामध्ये आल्या आहेत. यामध्ये औषधे, ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. भाजपशासित राज्यांनी आपल्याला ही मदत मिळाल्याचे म्हटले आहे. याउलट राजस्थान, पंजाब आणि झारखंड या राज्यांनी केंद्र सरकारने आपल्याला कोणतीही वैद्यकीय मदत न पुरवल्याचा आरोप केला आहे.

संबंधित बातम्या:

Steroids मुळे कोरोना रुग्णांना गंभीर आजाराची भीती, डॉ. रणदीप गुलेरियांचा इशारा

उत्तर प्रदेशात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण जखमी

कोरोनाविरुद्धच्या लढाईची जबाबदारी गडकरींकडे देण्याची पुन्हा पुन्हा मागणी का? वाचा सविस्तर

(Questions raised over disbursment of covid related foregin aid to India)

Published On - 7:42 am, Thu, 6 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI