उत्तर प्रदेशात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण जखमी

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरात ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट झाल्याची दुर्घटना समोर आली आहे (Liquid medical oxygen cylinder explosion in Lucknow).

उत्तर प्रदेशात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण जखमी
उत्तर प्रदेशात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 5:44 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरात ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट झाल्याची दुर्घटना समोर आली आहे. लखनऊच्या केटी ऑक्सिजन प्लांटमध्ये ही दुर्घटना घडली. ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये एक ऑक्सिजन प्लांटचा कर्मचारी आणि दुसरा गॅस भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा समावेश आहे. सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरत असताना अचानक स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे (Liquid medical oxygen cylinder explosion in Lucknow).

जखमी लोहिया रुग्णालयात दाखल

संबंधित घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऑक्सिजन सिलेंडर फुटल्यामुळे अनेक कामगार भाजले आहेत. केटी ऑक्सिजन प्लांट हा चिन्हाट पोलीस ठाणे हद्दीतील देवा रोडवर आहे (Liquid medical oxygen cylinder explosion in Lucknow).

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे चौकशीचे निर्देश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेप्रती दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत कार्य करण्याते आदेश दिले. त्यांनी या अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे निर्देशही दिले आहेत.

ऑक्सिजनची मागणी वाढली

उत्तर प्रदेशात कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या कोरोनाबाधितांसह ऑक्सिजनची मागणी देखील वाढली आहे. रुग्णालयात सिलेंडन नसल्याने लोक स्वत: प्लांटवर जाऊन सिलेंडर भरुन आणत आहेत.

उत्तर प्रदेशात कोरोनाबाधितांची संख्या वाढली

उत्तर प्रदेशात काल (4 मे) एकाच दिवसात 25,770 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील बाधितांची संख्या साडे तेरा लाखांच्या घरात गेली आहे. याशिवाय 13,798 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : कोरोना लस मोफत द्या, ममता बॅनर्जींची पंतप्रधान मोदींकडे मागणी, अडचणीच्या काळात एकत्र काम करण्याचं आश्वासन

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.