AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेकांना 15 दिवसांमध्ये पुन्हा लागण, Immunity Escape म्हणजे काय ?

एकदा कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा 15 दिवसांच्या आत कोरोनाची लागण झाल्याचे अनेक उदाहरणं समोर येत आहेत. (coronavirus new strain immunity escape)

कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेकांना 15 दिवसांमध्ये पुन्हा लागण, Immunity Escape म्हणजे काय ?
कोरोना लसीकरणाने घेतला वेग.
| Updated on: May 05, 2021 | 5:17 PM
Share

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे सगळीकडे हाहा:कार उडाला आहे. देशात रोज लाखो नव्या रुग्णांची नोंद होत आहे. सध्याच्या कोरोना विषाणूने (Corona virus) आपले रुप बदलल्यामुळे देशाला एवढ्या विध्वंसाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कोरोनाला थोपवण्यासाठी काय करता येईल, याचा युद्धापातळीवर अभ्यास सुरु आहे. त्यासाठी संशोधक जीवाचं रान करत आहेत. या संशोधनातून आता अनेक गोष्टी समोर येत आहेत. एकदा कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा 15 दिवसांच्या आत कोरोनाची लागण झाल्याची अनेक उदाहरणं समोर येत आहेत. याच कारणामुळे सध्या इम्यूनिटी इस्केप Immunity escape बद्दल बोललं जात आहे. (new strain of Corona virus and information of infection after Covid 19 recoveries due to immunity escape)

म्यूटंट कोरोनामुळे ठोकताळे बदलले

पहिल्या लाटेतील कोरोना आणि सध्याच्या कोरोना विषाणूनध्ये अनेक अंतर आहे. मागील लाटेतील कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या शरीरामध्ये कमीत कमी 3 महिन्यांसाठी अँटिबॉडी तयार होतील आणि रुग्ण नंतर कमीत कमी तीन महिन्यांसाठी पुन्हा संक्रमित होणार नाही, असां अंदाज बांधला जायचा. मात्र, सध्याच्या म्यूटंट कोरोना विषाणूने हे सगळे निष्कर्ष फोल ठरत आहेत. सध्या एकदा कोरोनाची लागण झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची उदाहरणं समोर आली आहेत. कोरोनाने आपले रुप बदलल्यामुळे म्हणजेच सध्याचा कोरोना विषाणू हा म्यूटंट विषाणू असल्यामुळे हा बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्याच्या कोरोनामध्ये कोणते बादल ?

दुसऱ्या लाटेतील कोरोना विषाणूमध्ये अनेक बदल झाले आहेत. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार संशोधकांना मागच्या वेळी बांधलेले निष्कर्ष यावेळी लागू होतीलच असे नाही. यावेळी विषाणूमध्ये अनेक अंगांनी बदल झाला आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार असे अनेक रुग्ण आहेत, ज्यांचा तीन दिवसांच्या आत मृत्यू झाला आहे. तसेच सीटी स्कॅन आणि इतर चाचण्या करण्यापूर्वीच अनेक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. आजकाल कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर सुरुवातीच्या दोनच दिवसांत कोरोनाविषयक गंभीर लक्षणं दिसू लागली आहेत. कोरोनाचे रुप बदलल्यामुळे सध्या मृतांचे प्रमाणही वाढले आहे.

अँटिबॉडीजचा नियम काय आहे ?

ढोबळपणे सांगायचं झाल्यास कोणत्याही आजाराविरोधात लढण्याच्या शरीरातील शक्तीला अँटिबॉडीज म्हणतात. समजा एखाद्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर तो पुन्हा कोरोनामुक्त झाला, तर त्याच्या शरीरामध्ये कोरोना विषाणूविरोधात लढण्याची शक्ती निर्माण होते. त्याला अँटिबॉडी म्हणता येईल. शरीरात जोपर्यंत अँटिबॉडी असतील तोपर्यंत कोरोनापासून त्या रुग्णाचे संरक्षण होऊ शकते. शरीरात अँटिबॉडी राहण्याचा काळ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. कोणासाठी हा काळ 3 महिन्यांचा असतो. तर काहींसाठी हा काळ 1 वर्षाचासुद्धा असू शकतो.

तज्ज्ञ काय म्हणतात ?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. काही ठिकाणी कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा 15 दिवसांच्या आत लोकांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याची उदाहरणं समोर आली आहेत. पुन्हा कोरोना चाचणी केल्यानंतर या रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. याविषयी बोलता नोएडा येथील डॉ. वलेचा यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. त्यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते, असे सांगितलं आहे. एकदा कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या विषाणूला आपले शरीर ओळखते. त्या विषाणूची आपल्याला लागण होत नाही. मात्र, विषाणूने आपले रुप बदलले म्हणजेच आपल्या शरीरात म्यूटंट कोरोना शिरला तर कोरोनाची पुन्हा लागण होऊ शकते, असे डॉ. वलेचा यांनी सांगितलंय.

Immunity escape म्हणजे काय ?

डॉ. वलेचा यांनी सांगितल्याप्रमाणे कोरोना आपले रुप रोज बदलत आहे. त्यामुळे रुप बदलेल्या विषाणूची आपल्याला पुन्हा लागण होऊ शकते. या रुप बदलेल्या कोरोनाला आपण कोरोनाचा नवा स्ट्रेन म्हणतो. एखादा नवा स्ट्रेन आपल्या शरीरात शिरला आणि आपल्या शरीरातील अँटिबॉडिज त्याच्याशी दोन हात करु न शकणे याला Immunity escape म्हणता येईल. म्हणजे आपली प्रतिकार शक्ती नाहीशी होणे, असेसुद्धा त्याला साध्या भाषेत म्हणता येईल.

दरम्यान, कोरोनाने आपले रुप बदललेले असले आणि त्याची लागण झाली तर काळजी करण्यासारखं काहीही नाही, असे डॉ. वलेचा म्हणतात. मात्र, कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनची लागण होऊच नये याची आपण पुरेपूर काळजी घेण्याचे ते आवर्जून सांगतात. लक्षण आढळल्यास लवकरात लवकर चाचणी आणि उपचार घेणे गरजेचे आहे, असेसुद्धा त्यांनी सांगितले आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपुरात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक, अकलूज पोलिसांची मोठी कारवाई

कोरोना लस मोफत द्या, ममता बॅनर्जींची पंतप्रधान मोदींकडे मागणी, अडचणीच्या काळात एकत्र काम करण्याचं आश्वासन

(new strain of Corona virus and information of infection after Covid 19 recoveries due to immunity escape)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.