AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक, कोरोना रोखणारं मुंबई मॉडेल काय? BMC ची War Room कसं काम करते?

सर्वोच्च न्यायालयाने मुंबईच्या कोरोना नियंत्रण कामाचं कौतुक केल्यानंतर सध्या देशभरात मुंबई महानगरपालिकेच्या या मॉडेलची जोरदार चर्चा सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक, कोरोना रोखणारं मुंबई मॉडेल काय? BMC ची War Room कसं काम करते?
| Updated on: May 09, 2021 | 5:57 AM
Share

Coronavirus Control Mumbai Model मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मुंबईच्या कोरोना नियंत्रण कामाचं कौतुक केल्यानंतर सध्या देशभरात मुंबई महानगरपालिकेच्या या मॉडेलची जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबई देशातील सर्वाधिक कोरोना संसर्ग असणाऱ्या शहरांपैकी एक होते. मात्र, मागील काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गाचा वेग मुंबईत मंदावलाय. बीएमसीच्या (BMC) आकडेवारीनुसार, मुंबईचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांपेक्षा अधिक झालाय. तर डेथ रेट 0.04 टक्क्यापेक्षा कमी झालाय (Mumbai BMC Coronavirus Control Model Control room Chaise the virus).

चला तर मग समजून घेऊ की काय आहे मुंबईचं कोराना नियंत्रण मॉडेल (Corona Control Model), यात कोणती रणनीती आहे आणि आरोग्य विभाग कसं काम करत असून बीएमसीची त्यातली भूमिका काय याविषयी जाणून घेऊयात.

घरोघरी जाऊन तपासणी आणि उपचार

मुंबईत कोरोना नियंत्रित करण्याचे बीएमसीचे प्रयत्न आकडेवारीवरुन यशस्वी झाल्याचं दिसत आहे. केवळ एअरपोर्ट नाही तर मुंबईतील सर्व बसस्थानकं, रेल्वे स्टेशनवर स्‍क्रीनिंग वाढवण्यात आलीय. यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करुन संशयितांना शोधलं जातंय. रुग्णांनी रुग्णालयात येण्याऐवजी बीएमसीचे कर्मचारीच नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी आणि उपचार करत आहेत.

वार्ड वॉर रूमचा प्रभावी वापर, खासगी रुग्णालयांचाही उपयोग

कोरोना नियंत्रणासाठी बीएमसीने ‘वार्ड वॉर रूम’ तयार केली. याच्या माध्यमातून 10,000 रुग्णांचं व्यवस्थापन केलं जात आहे. कोविड जंबो सेंटरच्या माध्यमातून मुंबईत 9 हजार बेड तयार आहेत. यात 60 टक्के बेड्स ऑक्सीजन सुविधायुक्त आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेडही ताब्यात घेण्यात आलेत. येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या उपचाराचे दर सरकारी दराप्रमाणे आहेत. या सर्व बेड्सचं व्यवस्थापन वॉर रूममधून केलं जातंय.

मुंबई मॉडेलमधील प्रमुख गोष्टी:

? ‘चेज द व्हायरस’ अंतर्गत घरोघर जाऊन चाचणी ? जंबो कोविड सेंटर्समध्ये 9,000 बेड्स, 5400 बेड ऑक्‍सीजन युक्‍त ? खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड बीएमसीच्या नियंत्रणात ? बीएमसीच्या सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन प्लँटची निर्मिती ? वेळेवर सेंट्रलाईज ऑक्सीजन सप्लायची व्यवस्था ? कोविड व्हॅक्सिनेशनवर भर, मिशन झिरोची अंमलबजावणी

काय आहे मुंबई मॉडल?

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. यावेळी मुंबई महापालिकेने तातडीने ऑक्सिजनचं नियोजन केलं. पालिकेने ऑक्सिजन पुरवठा सिस्टिम वाढवली. 28 हजार बेड पैकी 12 ते 13 हजार बेडवर ऑक्सिजन सप्लाय करणअयाची व्यवस्था केली. त्यानंतर पालिकेने ऑक्सिजन सिलिंडरही बदलण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला पालिका साधारण ऑक्सिजन सिलिंडरवर अवलंबून होती. नंतर पालिकेने जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा वार केला. साधारण ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा या सिलिंडरची क्षमता दहा टक्के अधिक असते. त्याचबरोबर पालिकेने 13 हजार किलो लीटरची मेडिकल ऑक्सिजन टँक तयार केली. त्यामुळे रुग्णालये रिफिल मोडवरून स्टोरेज सप्लाय मोडवर आले, असं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं.

हेही वाचा :

Mumbai Corona Cases | मुंबईतील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार; दिलासादायक माहिती समोर

मुंबईत नियमांचं उल्लंघन करुन लग्नसोहळा, बीएमसीची धडक कारवाई, 50 हजारांच्या दंडासह गुन्हा दाखल

धोका वाढला! राज्यात कोरोनानं 895 जणांचा मृत्यू, आज 66,358 नवे रुग्ण सापडले

व्हिडीओ पाहा :

Mumbai BMC Coronavirus Control Model Control room Chaise the virus

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.