AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत नियमांचं उल्लंघन करुन लग्नसोहळा, बीएमसीची धडक कारवाई, 50 हजारांच्या दंडासह गुन्हा दाखल

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'डी' विभाग कार्यक्षेत्रातील बाबुलनाथ मंदिराजवळील संस्कृती हॉलमध्ये कोविड प्रतिबंध विषयक नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा आयोजित करण्यात आला.

मुंबईत नियमांचं उल्लंघन करुन लग्नसोहळा, बीएमसीची धडक कारवाई, 50 हजारांच्या दंडासह गुन्हा दाखल
| Updated on: Apr 30, 2021 | 8:27 PM
Share

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यक्षेत्रातील बाबुलनाथ मंदिराजवळील संस्कृती हॉलमध्ये कोविड प्रतिबंध विषयक नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेने (BMC) संबंधित सभागृहावर 50 हजार दंड आकारलाय. तसेच सभागृह लग्न सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संबंधितांवर गावदेवी पोलिस ठाण्यात एफ. आय. आर. दाखल केलाय. ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी याबाबत ही माहिती दिली (BMC action against marriage near babulnath temple with 150 people FIR registered).

बाबुलनाथ मंदिराजवळील दादीसेठ मार्गालगत असणाऱ्या ‘संस्कृती हॉल’मध्ये नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. याची माहिती महापालिकेच्या विभाग कार्यालयाला प्राप्त झाली. ही माहिती प्राप्त होताच विभाग कार्यालयाच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी तिथे विवाह कार्यक्रम सुरू असल्याचं आणि सुमारे 150 व्यक्ती विवाह सोहळ्याला उपस्थित असल्याचं आढळून आलं. या ठिकाणी उपस्थित व्यक्तींमध्ये नियमानुसार आवश्यक असणारे शारीरिक अंतर देखील राखण्यात आले नसल्याचं समोर आलं.

अशाप्रकारचा हा लग्नसोहळा महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन असल्याने या हॉलवर आणि विवाह सोहळ्याच्या आयोजकांवर तात्काळ कारवाई केली. या कारवाईमध्ये प्रामुख्याने संबंधित हॉल चालकांवर तात्काळ 50 रुपये हजार दंड ठोठावण्यात आला. तसेच हॉल चालक व संबंधित लग्न सोहळ्याचे आयोजक यांच्याविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात एफ.आय.आर. दाखल केला.

हेही वाचा :

धोका वाढला! राज्यात कोरोनानं 895 जणांचा मृत्यू, आज 66,358 नवे रुग्ण सापडले

डबल मास्क आणि फेस शिल्ड वापरा, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश

Mumbai Corona : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, कोरोना रुग्णांमध्ये घट सुरुच, नव्या रुग्णांचा आकडा 4 हजाराच्या खाली

व्हिडीओ पाहा :

BMC action against marriage near babulnath temple with 150 people FIR registered

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.