उत्तरेतल्या महत्वाच्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, भाजपचा 1502 जागांवर विजय

उत्तरेतल्या महत्वाच्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर आहे. आतापर्यंत जे कल हाती आलेत त्यानुसार, भाजपने 1502 जागांवर विजय मिळवला आहे.

उत्तरेतल्या महत्वाच्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, भाजपचा 1502 जागांवर विजय
Local Body Election
| Updated on: Sep 14, 2026 | 11:10 AM

कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर देशातील राजकीय हवा बदलल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीडीपीचे आकडे सांगितले, त्यावरूनही बरीच उलट-सुलट चर्चा झाली. देशाच्या प्रगतीला ब्रेक लागल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. अशा स्थितीत राजस्थानात नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. राजस्थानात महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद निवडणूक निकालाच्या आकड्यांवर नजर मारली तर काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर दिसत आहे. राजस्थान हे उत्तर भारतातील एक महत्वाचं आणि मोठं राज्य आहे.

राजस्थानात महापालिका, नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. 10 महापालिकांपैकी काँग्रेस तीन आणि भाजप एका महापालिकेत आघाडीवर आहे. राजस्थानात 47 नगर परिषदा आणि 252 नगरपालिकांसाठीही मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीचे जे निकाल आहेत, त्यानुसार 20 नगर परिषदांमध्ये भाजपं आणि 17 मध्ये काँग्रेस पुढे आहे. 10 नगर परिषदांमध्ये अपक्ष आघाडीवर आहेत. जयपूर महापालिकेतील 150 वॉर्डसाठी मतमोजणी सुरु आहे. भाजपने 11 जागा जिंकल्या असून काँग्रेस 6 आणि अपक्षाने एकाठिकाणी बाजी मारली आहे.

मतदान कधी झालेलं?

यावेळी राजस्थानातील एकूण 10 महापालिका, 252 नगरपालिकांसह 309 नगर परिषदा आणि 10 हजारपेक्षा अधिक वॉर्डमध्ये निवडणुका झाल्या होत्या. दोन टप्प्यात एकूण 10167 वार्डमध्ये मतदान झालं. 77 वॉर्डमध्ये बिनविरोध निवडणूक झाली. आज 38889 उमेदवारांच्या हस्ते जय-पराजयाचा निर्णय होईल. 9 आणि 11 सप्टेंबरला मतदान झालेलं. पहिल्या टप्प्यात 162 नगरपालिका आणि दुसऱ्या टप्प्यात 147 नगरपालिकांसाठी मतदान झालेलं.

आतापर्यंत किती जागांवर भाजप-काँग्रेसने विजय मिळवलाय?

राजस्थानात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 3657 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात 1502 जागांवर भाजपं, 1397 जागांवर काँग्रेस आणि 725 जागांवर अपक्ष उमेदवार जिंकले आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us