चीनचे भारतापुढे लोटांगण, अखेर ती गोष्ट करावीच लागली मान्य, सीमेवर..
भारत आणि चीनचे संबंध मागील काही वर्षाच्या विचार केला असता सुधारताना दिसत आहेत. त्यातच चीनचे अध्यक्ष शी.जिनपिंग भारत दाैऱ्यावर आले. त्यातच चीन आता कुठेतरी भारतासमोर झुकताना दिसत आहे.

भारत आणि चीन यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. गलवान घाटीतील संघर्षानंतर संबंध अधिक तणावात होते. भारतावर अमेरिकेने मोठा टॅरिफ लावल्यानंतर चीन भारताच्या मदतीला आला. भारताच्या बाजूने चीन उभा होता. भारताने ब्रिक्स परिषदेचे आयोजन केले. या परिषदेला जवळपास सदस्य देशांनी हजेरी लावली. बांगलादेशने या परिषदेकडे पाठ फिरवली. चीनचे अध्यक्ष शी.जिनपिंग या परिषदेला उपस्थित राहणार की नाही, असा सवाल उपस्थित केला जात होता. शी.जिनपिंग भारतात पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी.जिनपिंग यांच्यात व्दिपक्षीय चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून सीमेवर ताकद वाढवताना दिसत आहे. हेच नाही तर पायाभूत सुविधा चीन सीमेवर अधिक उभारताना दिसतोय.
यासोबतच भारताच्या हद्दीत चीन घुसत असल्याचेही सांगितले जातंय. सीमेवर तणाव असून सीमेजवळील गाव दहशतीखाली आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी.जिनपिंग यांच्यात व्दिपक्षीय चर्चा ब्रिक्स परिषदेत झाली. यावेळी भारताने सीमेवरील सैन्य कमी करण्याबाबत चर्चा चीनसोबत केली होती. त्यावर चीनने सकारात्मक प्रतिसाद दिला.
भारताने चीनला स्पष्ट सांगितले की, जोपर्यंत सीमेवर शांतता होणार नाही, तोपर्यंत द्विपक्षीय संबंध पुढे शक्य नाहीत. दोन्ही देशांमधील सीमावर्ती तणाव कमी करण्याची प्रक्रिया पुढे सरकली आहे. ऑगस्ट 2025 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन भेटीला गेले होते. यावेळी दोन्ही देशात सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही देशांनीही सीमेवरील शांतता यावर भाष्य केले.
चीनमधील तियानजिन येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान तिथे पोहोचले होते. या भेटीदरम्यान भारत-चीन संबंधांना पुढे नेण्याबाबतच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. यावेळी भारताने सीमेवरील वाढती सैन्य संख्या यावर भाष्य केले. त्यानंतर चीनने मोठा निर्णय घेत सैनिकांची संख्या कमी केली. भारतासमोर अखेर चीनने लोडांगण घेताना दिसतंय. भारत आणि चीनचे संबंध सात वर्षाचा विचार करता आता सुधारताना दिसत आहेत.
