माझे भाऊ जरांगे घरी आले तर मी स्वागत करेल, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान, थेट..
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईला येण्यावर ठाम आहेत. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात जरांगे मुंबईला येत असल्याने पोलिसांवरील ताण वाढणार आहे. नुकताच अमृता फडणवीस यांनी जरांगे यांच्यावर मोठे भाष्य केले.

राज्यात गणेशोत्सवाला सुरूवात झाली. राज्यात मोठा उत्साह बघायला मिळतोय. मात्र, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उद्या म्हणजे 15 सप्टेंबरला मुंबईसाठी निघणार असल्याचे जाहीर केले. तीन मुक्काम करून जरांगे 19 तारखेपासून आझाद मैदानात उपोषणाला सुरूवात करतील. आझाद मैदानात उपोषणासाठी पाच हजार लोकांसह परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी ही परवानगी नाकारली. तरीही मुंबईला येण्यावर जरांगे ठाम आहेत. गेल्या वर्षी उपोषणासाठी परवानगी देण्यात आली. पण यावेळी का नाही? असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला. फक्त हेच नाही तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप करताना मनोज जरांगे पाटील दिसले. मराठ्यांची खिंड आता मी एकटा लढवत असल्याचे जरांगे यांनी म्हटले.
मनोज जरांगे पाटील यांना अमृता फडणवीस यांनी भाऊ म्हणून आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गणरायाचे आगमन झाले. यादरम्यानच बोलताना अमृता फडणवीस यांनी म्हटले की, शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावं. जे पण घरी आले… माझे भाऊ जरांगे पण घरी आले तरीही मी त्यांचे स्वागतच करेल. बहीण म्हणून त्यांचे मी स्वागत घरी करेल.
आज आनंदाचा दिवस आहे. बाप्पांचे आगमन झाले. खूप जल्लोष लोकांमध्ये आहे. बाप्पांकडे इतकेच मागितले की, सर्वांचे मंगल होवो, सर्वांचे चांगले होवो.. सर्वांचे विघ्न दूर व्हावे. दरवेळी कधीही पूजन केले तेव्हाही बळीराजा मनात असतोच. त्यांची संकटे दूर व्होवो. सरकार त्यांच्यासाठी जे करू शकते ते दुष्काळ परिस्थिती आहे. सरकारला पण निवेदन करेल की, त्यांनी शेतकऱ्यांसाठी मनोत प्रेम ठेऊन कार्य करावे.
ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्व गणेश भक्तांना इतकेच सांगेल की, बाप्पााकडे स्वत:साठी मागाच पण आपल्या राज्यातील आणि देशातील लोकांसाठी पण मागा. कारण कोणी एक माणूस पुढे जाऊ शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून अमृता फडणवीस मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलताना दिसत आहेत.
