नवऱ्यापासून मन भरलं, प्रियकराकडे गेली, त्यानेही संतुष्ट केलं नाही, आता तिसऱ्याची इच्छा, नंतर जे झालं…

राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील छापरिया गावात एका महिलेने तिच्या 21 महिन्याच्या मुलाचा गळा दाबून खून केला. आशा नावाची ही महिला तिसऱ्या लग्नासाठी मुलाची हत्या करून पळून गेली. पोलिसांनी तिला अटक केली असून तिने तिच्या दोन्ही माजी नवऱ्यांना आणि मुलाला सोडून तिसऱ्या व्यक्तीसह राहायचे असल्याने हे कृत्य केले असल्याचे कबूल केले आहे.

नवऱ्यापासून मन भरलं, प्रियकराकडे गेली, त्यानेही संतुष्ट केलं नाही, आता तिसऱ्याची इच्छा, नंतर जे झालं...
crime
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 07, 2025 | 6:13 PM

राजस्थानमध्ये हादरवून सोडणारा एक प्रकार समोर आला आहे. बांसवाडामध्ये एक महिला इतकी वासनेच्या आहारी गेली होती की तिला तिच्या 21 महिन्याच्या मुलावरही तरस आला नाही. तिने तिसऱ्या लग्नासाठी आपल्याच काळजाच्या तुकड्याची क्रूरपणे हत्या केली. त्याचा गळा दाबून मारलं. मुलाला ठार केल्यानंतर ती फरार झाली. पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमला पाठवलं. त्यानंतर 24 तासाच्या आत या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर जे सत्य समोर आलं त्याने सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली.

छापरिया गावातील ही घटना आहे. आशा असं या आरोपी महिलेचं नाव आहे. तिचं चार वर्षापूर्वी लग्न झालं होतं. पण ती एकच वर्ष तिच्या नवऱ्यासोबत राहिली. त्यानंतर ती नवऱ्यापासून वेगळी झाली आणि एका तरुणासोबत राहू लागली. तिने या तरुणासोबत नातरा विवाह (लग्न न करता नवरा-बायकोसारखं राहणं) केला होता. या तरुणासोबत ती तीन वर्, राहिली. या काळात तिला मुलही झालं. मूल 21 महिन्याचं होईपर्यंत ती त्याच्यासोबत राहत होती.

तिसऱ्या लग्नासाठी कांड

मीडिया रिपोर्टनुसार, या तरुणासोबत राहून मन भरल्यानंतर तिला तिसरा नातरा विवाह करायचा होता. ज्या तिसऱ्या व्यक्तीवर तिचा जीव जडला होता. तो तिला स्वीकारायला तयार होता. पण तिच्या मुलाला स्वीकारायला तयार नव्हता. पण वासनेच्या आहारी गेलेल्या आशाने तिसऱ्या व्यक्तीसोबत राहण्यासाठी पोटच्या गोळ्याचा गळा दाबून त्याला ठार केले. त्यानंतर ती पळून गेली. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. तिचं नाव आशा ऊर्फ आशा कुमारी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या महिलेला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तिने सर्व सत्य सांगितलं. मला माझ्या आधीच्या दोन्ही नवऱ्यांसोबत राहायचं नव्हतं. तसेच मुलासोबतही राहायचं नव्हतं. त्यामुळेच मी हे कृत्य केलं, असं तिने सांगितलं.

दुसऱ्या नवऱ्याची तक्रार

आशाचा दुसरा नवरा सुरवानिया येथील आहे. दिलीप पारगी असं त्याचं नाव. दिलीपनेच या प्रकरणाची माहिती पोलिसांना देऊन आशाच्या विरोधात तक्रार केली. माझी बायको अचानक मला सोडून गेली. ती छापरिया येथे राहणाऱ्या वडिलांच्या घरी गेले. जाताना माझा मुलगा आयुषचा गळा दाबून गेली, असं त्याने तक्रारीत म्हटलं होतं. त्याची तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. ही महिला वासनांध झाली होती. त्यामुळे तिला आपलं मूल ओझं वाटू लागलं होतं. म्हणूनच तिने त्याचा खून केल्याचं पोलिसांनी सांगितलं.