AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरन्यायाधीश गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न, ‘त्या’ वकिलावर सर्वात मोठी कारवाई, काय घेतला निर्णय?

एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता या वकिलावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सरन्यायाधीश गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न, 'त्या' वकिलावर सर्वात मोठी कारवाई, काय घेतला निर्णय?
CJI Bhushan Gavai
| Updated on: Oct 06, 2025 | 10:43 PM
Share

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. राकेश किशोर असे या वकिलाचे नाव आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखलं. त्यानंतर वकिलाला कोर्टाबाहेर काढण्यात आले. यावेळी या वकिलाने ‘सनातनचा अपमान सहन करणार नाही’ असा आरडाओरडा केला. या घटनेनंतर आता बार कौन्सिल ऑफ इंडियाने या वकिलाविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आरोपी वकील राकेश किशोर यांचा परवाना रद्द

सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्यामुळे बार कौन्सिल ऑफ इंडियाने अधिवक्ता राकेश किशोर यांचे लायसन्स रद्द केले आहे. त्यामुळे राकेश किशोर यांना कोणतेही न्यायालय, न्यायाधिकरण किंवा न्यायाधिकरणासमोर वकिली करता येणार नाही. याचा अर्थ राकेश पुन्हा कधीही वकिली करू शकणार नाहीत. या एक कृत्याचा त्यांना मोठा फटका बसला आहे.

शिस्त भंगाची कारवाई होण्याची शक्यता

सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलावर आता शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. आज सकाळी अटक केल्यानंतर पोलिसांनी राकेश किशोर यांना लगेच सोडून दिले. आता बार कौन्सिल ऑफ इंडियाने या प्रकरणाची दखल घेत राकेश किशोर यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाणार असल्याची माहिती दिली. त्यांना 15 दिवसांच्या आत कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल, ज्यामध्ये त्यांना कारवाई का करू नये हे स्पष्ट करावे लागणार आहे. त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर कौन्सिल ऑफ इंडिया निर्णय जाहीर करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सरन्यायाधीशांना फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी म्हटले की, ‘भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्याशी मी बोललो. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाने देशातील प्रत्येक नागरिक संतापला आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. ही घटना निषेधार्ह आहे. अशा परिस्थितीला तोंड देताना न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेल्या शांततेचे मी कौतुक करतो. त्यांचे कृत्य न्यायमूर्तींच्या मूल्यांप्रती आणि आपल्या संविधानाच्या आत्म्याला बळकटी देण्याप्रती त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...