राम मंदिर भाजपचा चुनावी जुमला : उद्धव ठाकरे

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

अयोध्या (उत्तर प्रदेश) : निवडणूक आल्यानंतरच काहीजण रामाचं नाव घेतात. निवडणुकीत राम राम करतात आणि नंतर मग आराम करतात, असा शाब्दिक हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. तसेच, अच्छे दिन, 15 लाखांसारखाच ‘राम मंदिर’ हा सुद्धा भाजपचा चुनावी जुमला आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे हे कालपासून अयोध्यायात्रेवर आहेत. राम […]

राम मंदिर भाजपचा चुनावी जुमला : उद्धव ठाकरे
Follow us

अयोध्या (उत्तर प्रदेश) : निवडणूक आल्यानंतरच काहीजण रामाचं नाव घेतात. निवडणुकीत राम राम करतात आणि नंतर मग आराम करतात, असा शाब्दिक हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. तसेच, अच्छे दिन, 15 लाखांसारखाच ‘राम मंदिर’ हा सुद्धा भाजपचा चुनावी जुमला आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे हे कालपासून अयोध्यायात्रेवर आहेत. राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांची फौज घेऊन अयोध्येत दाखल झाले आहेत. काल उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रसिद्ध शरयू नदीवर महाआरती झाली. त्यानंतर आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

अयोध्येत येण्यामागे छुपा अजेंडा नाही : उद्धव ठाकरे

“अयोध्येत येण्यामागे माझा कोणताही छुपा अजेंडा नाही. मी देशासह जगभरातील रामभक्तांच्या भावना व्यक्त करायला इथवर आलो आहे. दिवस, महिने, वर्षे लोटले गेल, मात्र राम मंदिर बांधलं गेलं नाही, ही दु:खाची गोष्ट आहे.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“रामलल्लाचं दर्शन घेताना एका गोष्टीचं खूप वाईट वाटलं की, मला कळलं नाही, मी रामलल्लाचं दर्शन करायला आलोय की तुरुंगात आलोय”, असे सांगताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “रामाचा वनवास संपला पाहिजे. त्यासाठी राम मंदिराची निर्मिती झालीच पाहिजे.”

“निवडणुकीत सगळेच राम राम करतात. मात्र निवडणुका संपल्यानंतर आराम करतात. आताचं सरकार मजबूत आहे, त्यामुळे आता राम मंदिर बनवणार नसाल, तर सरकार बनणार नाही. मात्र राम मंदिर नक्की बनेल.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अच्छे दिन, 15 लाखांसारखंच राम मंदिर हा चुनावी जुमला आहे, असं सांगा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. शिवाय, कायदा करा, अध्यादेश काढा किंवा वाट्टेल ते करा, पण राम मंदिर बांधा, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली. तसेच, कोर्टाच्या हातात असेल तर राम मंदिराचं आश्वासन कशाला? असा सवालही त्यांनी भाजपला विचारला.

“माझ्या भावना या समस्त देशातील हिंदूंसारख्याच आहेत. हिंदूंच्या या भावना कधीच दुखावल्या जाऊ नयेत. राम मंदिर लवकरात लवकर बांधले गेले पाहिजे.” अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

– अयोध्येवासियांचे मनापासून आभार – उद्धव ठाकरे

– अयोध्या यात्रेमागे कोणताही छुपा अजेंडा नाही – उद्धव ठाकरे

– निवडणूक आल्यानंतरच काहीजण रामाचं नाव घेतात – उद्धव ठाकरे

– बाळासाहेबांनी हिंदूंमध्ये पहिल्यांदा आत्मविश्वास निर्माण केला – उद्धव ठाकरे

– राम मंदिर लवकरात लवकर बनवा, हिंदूंच्या भावनांशी खेळू नका – उद्धव ठाकरे

– राम मंदिरासाठी अध्यादेश आणा आणि मंदिर बांधा – उद्धव ठाकरे

– हिंदू मार खाणार नाही आणि गप्पही बसणार नाही – उद्धव ठाकरे

– राम मंदिर हा चुनावी जुमला होता हे सांगा, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

– राम मंदिर झालं नाही, तर सरकार बनणार नाही – उद्धव ठाकरे

– प्रचाराच्या वेळी राम राम केला जातो आणि निवडणुकीनंतर आराम केला जातो – उद्धव ठाकरे

– अच्छे दिन, 15 लाखांप्रमाणेच राम मंदिर हा जुमला होता, हे सांगा, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

– कायदा करा, अध्यादेश काढा किंवा वाट्टेल ते करा, पण राम मंदिर बांधा – उद्धव ठाकरे

– मुंबईतील उत्तर भारतीयांमध्ये भीतीचं वातावरण नाही – उद्धव ठाकरे

– माझ्यापेक्षा उत्तर भारतीय चांगलं मराठी बोलतात – उद्धव ठाकरे

– रामाचं दर्शन घेताना वाटले, मी तुरुंगात आहे का? असं रामाला वाटेल, रामाचा वनवास संपला पाहिजे – उद्धव ठाकरे

– रामाचं दर्शन घेताना वाटले, मी तुरुंगात आहे का? असं रामाला वाटेल, रामाचा वनवास संपला पाहिजे – उद्धव ठाकरे

– माझी अयोध्यायात्रा यशस्वी झाली, देशातील लोकांच्या भावना सांगायला इथवर आलो होतो – उद्धव ठाकरे – राम मंदिर बांधता येत नसेल, तर तसे स्पष्ट सांगा – उद्धव ठाकरे

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI