बायकोचं शीर धडावेगळं करणाऱ्याचं थेट एन्काऊंटर, पोलिसांनी चालत्या व्हॅनमध्येच…रामानुज कसा संपला?

मानुज गोस्वामीने पोलिसांच्या चालत्या व्हॅनमधून थेट उडी घेतली. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याची पोलीस कोठडी संपली होती. त्यामुळे त्याला सोमवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार होते.

बायकोचं शीर धडावेगळं करणाऱ्याचं थेट एन्काऊंटर, पोलिसांनी चालत्या व्हॅनमध्येच...रामानुज कसा संपला?
ramanuj goswami wife death assam story
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 14, 2026 | 3:48 PM

अनैतिक संबंधाच्या संशयातून आसाममधील गुवाहाटीत भयानक हत्याकांड घडलं. रामानुज गोस्वामी नावाच्या तरुणाने आपल्या पत्नीचा निर्घृण खून करून तिचं शीर धडावेगळं केलं. सोबतच पत्नीचं शीर खराब होऊ नये म्हणून त्यानं ते फ्रीजमध्ये ठेवलं. ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे बायकोचा जीव घेऊन रामानुज नावाचा नराधम थेट पोलीस ठाण्यात गेला होता. त्याने आपला गुन्हा कबूल केला होता. मी माझ्या पत्नीचं शीर धडावेगळं केलंय. मला त्याचा अजिबात पश्चात्ताप नाही, असं त्यानं उघड बोलून दाखवलं होतं. दरम्यान, आता याच रामानुज गोस्वामीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या व्हॅनमधून पडल्याने त्याचा आश्चर्यकारक पद्धतीने मृत्यू झालाय. पोलिसांनी त्याचं एन्काऊंटर केल्याचाही दावा केला जातोय.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार रामानुज गोस्वामीने पोलिसांच्या चालत्या व्हॅनमधून थेट उडी घेतली. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याची पोलीस कोठडी संपली होती. त्यामुळे त्याला सोमवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार होते. त्याआधी त्याला गुवाहाटी येथील शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी आणले जात होते. परंतु रुग्णालयात जाण्याआधीच त्याने गाडीतून उडी घेतली.

पत्नीचा खून नेमका कसा केला?

रामानुजचे रियासोबत गेल्या वर्षी लग्न झाले होते. या एका वर्षाच्या काळात त्याचे रियासोबत वेगवेगळ्या कारणांमुळे भांडणं व्हायची. अशाच एका भांडणामध्ये त्याने 3 सप्टेंबर रोजी रियाचा थेट खून करून टाकला. हत्या करून तो अगोदर फरार झाला. त्याने पत्नीचे शीर धडावेगळे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. घर बंद करून तो पळून गेला होता. नंतर शेजाऱ्यांना रामानुजच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर दरवाजा खोलण्यात आला. त्यानंतर घराच्या फरशीवर रियाचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती.

मी तुरुंगातून बाहेर येईन तेव्हा…

दरम्यान, मला रियाचा खून केल्याचा अजिबात पश्चात्ताप नाही, असं रामानुज याने सांगितलं होतं. तसेच मी तुरुंगातून बाहेर येईन तेव्हा रियाचे ज्याच्यासोबत प्रेमसंबंध होते, त्यालाही मारून टाकणार आहे, अशी उघड धमकी त्याने दिली होती. आता याच रामानुजचा मृत्यू झालाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us