CBSE परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत नाहीच, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

| Updated on: Dec 22, 2020 | 5:54 PM

CBSE बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत होणार नसल्याची घोषणा रमेश पोखरियाल यांनी केली. ( Ramesh Pokhriyal )

CBSE परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत नाहीच, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा
रमेश पोखरियाल निशंक
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक देशातील शिक्षकांशी संवाद साधत आहेत. सीबीएसई परीक्षा 2021 आणि जेईई मेन परीक्षांविषयीच्या अडचणींबाबत संवाद साधत आहेत. 10 वी आणि 12 वीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत होणार नसल्याची घोषणा रमेश पोखरियाल यांनी केली. आतापर्यंत 4 लाख 80 हजार शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाबाबत प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती पोखरियाल यांनी दिली. (Ramesh Pokhriyal said no CBSE board exam till February 2021)

सीबीएसीई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीनंतर

परीक्षा रद्द करणे आणि विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करणं हा विद्यार्थ्यांना भविष्यात अडचणीचे आणणार ठरेल. नोकरी आणि प्रवेश मिळवताना पुढील काळात अडचणी निर्माण होऊ शकताता. त्यामुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द न करता पुढे ढकलल्या जातील. साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षा फेब्रुवारीनंतर होतील, असं रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले.

क्लासेस ऑनलाईन मग परीक्षा का नको?

रमेश पोखरियाल निशंक यांनी काही विद्यार्थ्यांना अजून समान संधी मिळत नाही. सध्या आपण ऑनलाईन क्लासेस घेत आहोत. मात्र, सध्याच्या परीक्षेत ऑनलाईन परीक्षा घेणे अशक्य आहे, असं केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सांगतिले. क्लासेस ऑनलाईन होत आहेत तर परीक्षा ऑनलाईन का व्हायला नकोत असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. Ramesh Pokhriyal said no CBSE board exam till February 2021)

30 टक्के अभ्यासक्रम कमी केला

सीबीएसई परीक्षांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे, अशी माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. जेईई मेन 2021 परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांसमोर अधिक पर्याय उपलब्ध असतील, असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 90 प्रश्नांच्या दोन विभागातील फक्त 75 प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.

केंद्र सरकारने लागू केलेले नवे शैक्षणिक धोरण लागू करताना शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे, असंही पोखरियाल म्हणाले. व्यावसायिक शिक्षण आणि आंतरवासियता 6 वीच्या वर्गापासून सुरु करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितले.

शिक्षक कोरोना वॉरिअर्स

कोरोना विषाणूमुळे अनेक देशांनी संपूर्ण शैक्षणिक वर्ष रद्द केले. मात्र, आपल्या देशातील शिक्षकांनी सातत्यानं काम केले. त्यांनी कोरोना काळात एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. शिक्षकांनी कोरोना योद्ध्यांसारखे काम करुन 33 कोटी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले, असं पोखरियाल म्हणाले.

संबंधित बातम्या:

JEE आणि NEET परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सल्ला

मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्याच शैक्षणिक पदवीवर प्रश्नचिन्ह

(Ramesh Pokhriyal said no CBSE board exam till February 2021)