मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्याच शैक्षणिक पदवीवर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या पदवीबाबत प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित होत आहेत. निशंक हे आपल्या नावापुढे डॉक्टर ही पदवी लावतात. श्रीलंकेतील एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने दोन डॉक्टरेट पदवी घेतल्या आहेत. पण निशंक यांनी घेतलेली पदवी बोगस विद्यापीठातील असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे निशंक यांच्या पदवीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहेत. रमेश पोखरियाल …

मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्याच शैक्षणिक पदवीवर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या पदवीबाबत प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित होत आहेत. निशंक हे आपल्या नावापुढे डॉक्टर ही पदवी लावतात. श्रीलंकेतील एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने दोन डॉक्टरेट पदवी घेतल्या आहेत. पण निशंक यांनी घेतलेली पदवी बोगस विद्यापीठातील असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे निशंक यांच्या पदवीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहेत.

रमेश पोखरियाल निशंक यांनी 90 च्या दशकात कोलंबोच्या ओपन इंटरनॅशनल विद्यापीठातून Doctor of Literature डॉक्टर ऑफ लिटरीचर (डीलीट) पदवी घेतली होती. त्यानंतर काही वर्षांनी विज्ञान विषयात दुसरी पदवी घेतली.

मात्र निशंक यांनी पदवी घेतलेले विद्यापीठ बोगस असल्याचा खुलासा झाला आहे. श्रीलंकेत ओपन इंटरनॅशनल नावाचे कोणतेही आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय विद्यापीठ अस्तित्वातच नाही. श्रीलंकेतील विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) द्वारे याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

गेल्यावर्षी एका सामाजिक कार्यकर्त्याने निशंक यांच्याबाबत माहिती अधिकार कायद्यान्वे माहिती मागवली होती. त्यावेळी निशंक यांनी स्वतबाबत अर्धीच माहिती दिली होती. विशेष म्हणजे त्यांच्या जन्म तारखेतही घोळ असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांनी आपल्या बायोडेटामध्ये 15 ऑगस्ट 1959  अशी जन्मतारीख लिहली आहे. तर त्यांच्या पासपोर्टमध्ये 15 जुलै 1959 अशी जन्मतारीख आहे. यामुळे त्यांची नक्की जन्मतारीख कुठली यावरुनही साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

दोन जन्मतारखांचा फायदा घेतला नाही

“हिंदू धर्मानुसार तयार करण्यात आलेल्या जन्मपत्रिकेत माझी जन्मतारीख एक आहे. तर शाळेत दाखल करण्यासाठी माझी जन्मतारीख वेगळी आहे. यामुळे माझ्या दोन जन्मतारीख आहेत. यावर मी कधीही जास्त लक्ष दिलं नाही. तसेच वेगवेगळ्या जन्मतारखेचा मी कधीही गैरफायदा घेतलेला नाही,” असं उत्तर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलं आहे.

तसेच बोगस पदवीबाबात उत्तर देताना, डेहरादूनच्या ग्राफिक विद्यापीठ, श्रीलंकेतील कोलंबो विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठातून मी पीएचडी आणि डीलीटची पदवी घेतली आहे. या पदव्या लपवण्यासाठी नाही तर सर्वांना दाखवण्यासाठी आहेत. त्यामुळे याबद्दल कोण काय बोलतं यावर मी जास्त लक्ष देत नाही. असंही निशंक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान निशंक यांनी 2012 विधानसभा निवडणुक, 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी शपथपत्रात डॉक्टर नावाचा उल्लेख केला नव्हता. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शपथपत्र जमा करताना, त्यांनी आपल्या नावापुढे डॉक्टर नावाचा उल्लेख केला होता आणि त्यानंतर त्यांच्या पदवीचा वाद सुरु झाला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *