रामनवमीनिमित्त रामलल्लांचा ‘सूर्य तिलक’; पंतप्रधान मोदींनी घेतलं दर्शन

रामनवमीनिमित्त आज शुक्रवारी अयोध्येमधील श्रीरामांच्या मंदिरात 'सूर्य तिलक' सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सोहळ्यासाठी ऑनलाइन उपस्थित होते.

रामनवमीनिमित्त रामलल्लांचा सूर्य तिलक; पंतप्रधान मोदींनी घेतलं दर्शन
Prime Minister Narendra Modi
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 27, 2026 | 5:26 PM

रामनवमीनिमित्त आज शुक्रवारी अयोध्येमधील श्रीरामांच्या मंदिरात ‘सूर्य तिलक’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सोहळ्यासाठी ऑनलाइन उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्हीच्या माध्यमातून या सोहळ्याला उपस्थित राहत रामलल्लांचं दर्शन घेतलं. आज अयोध्यमध्ये मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी होत आहे. रामनवमीच्या दिवशी श्रीरामांचं दर्शन व्हावं यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक अयोध्या येथे आले आहेत. यावर्षीचा रामनवमीचा सोहाळा हा खास आहे. कारण यावेळी रामलल्लांचा ‘सूर्य तिलक’ करण्यात आला. दुपारी बारा वाजता श्रीरामांच्या मंदिरात ‘सूर्य तिलक’ सोहळा पार पडला.

श्रीरामांच्या कपाळावर 4 मिनिटं सूर्याची किरणं

श्रीरामांच्या मंदिरात ‘सूर्य तिलक’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा पहाण्यासाठी देशभरातून लाखो भाविक अयोध्येमध्ये आले आहेत. ‘सूर्य तिलक’ सोहळ्याच्यावेळी गर्भगृहातील रामलल्लांच्या कपाळावर चार मिनिटं सूर्याची किरणं पडल्याची पहायला मिळाले. या ‘सूर्य तिलक’ सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ऑनलाईन उपस्थित होते. ‘सूर्य तिलक’ सोहळ्याच्यावेळी पंतप्रधान मोदींनी हात जोडून रामलल्लांचं दर्शन घेतलं.

श्रीरामांचा ‘सूर्य तिलक’ योग्य पद्धतीने व्हावा यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते, त्यासाठी अनेक अभियंते काम करत होते. समोर आलेल्या माहितीनुसार श्रीरामांना योग्य पद्धतीने ‘सूर्य तिलक’ व्हावा यासाठी रामनवमीपूर्वी याची दोन ते तीन वेळेस ट्रायल देखील घेण्यात आली. त्यानंतर आता आज रामनवमीच्या दिवशी सूर्याची किरणं थेट प्रभू श्रीरामांच्या कपाळावर पडली आहेत. सूर्य तिलकाचं मोठं धार्मिक महत्त्व आहे. कारण प्रभू श्रीराम हे सूर्यवंशी होते, सूर्य हे श्रीरामांचे कुल देवता होते. दरम्यान त्यापूर्वी गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी देशाला रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

अयोध्यमध्ये रामनवमीचा उत्साह  

अयोध्यमध्ये रामनवमीचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे. लाखो भाविक श्रीरांमांच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. भक्तीमय वातावरणात भाविक रामांचं दर्शन घेत असल्याचं पहायला मिळत आहे.

 

Follow Us