भारताच्या हाती लागला तो ‘खजिना’; चीनचा तीळपापड, दोन जिल्ह्यात सरकार ॲक्टिव्ह मोडवर

Rare Earth Minerals : इलेक्ट्रिक वाहनं, विंड टर्बाईन, स्मार्टफोन आणि लष्करी उपकरणासाठी सर्वाधिक वापर होणारे खनिजं चीनमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतात. अनेक देश चीनवर अवलंबून आहेत. पण भारतातील या जिल्ह्यात या धातुंचा खजिना सापडला आहे. त्याची अंदाजित किंमत 10 कोटी रुपये इतकी आहे.

भारताच्या हाती लागला तो खजिना; चीनचा तीळपापड, दोन जिल्ह्यात सरकार ॲक्टिव्ह मोडवर
भारताच्या हाती मोठा खजिना
Image Credit source: टीव्ही 9 नेटवर्क
| Updated on: Jul 17, 2025 | 1:48 PM

Rare Earth Minerals in Rajasthan : इलेक्ट्रिक वाहनं, विंड टर्बाईन, स्मार्टफोन आणि लष्करी उपकरणासाठी काही गौण खनिजे अत्यावश्यक आहेत. अमेरिकेत त्यांचा साठा सापडल्यानंतर भारतातही काही जिल्ह्यात ही खनिजं सापडली आहेत. अशी खनिजं चीनमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतात. अनेक देश चीनवर अवलंबून आहेत. आता भारतातील राजस्थानमधील दोन जिल्ह्यात या धातुंचा खजिना सापडला आहे. त्याची अंदाजित किंमत 10 कोटी रुपये इतकी आहे.

या दोन जिल्ह्यात खजिना

राजस्थानमधील बालोतरा आणि जालोर जिल्ह्यात दुर्मिळ खनिजे (Rare Earth Minerals) सापडली आहेत. ही खनिजे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आहे. ही खनिजं काढण्यासाठी लवकरच लिलाव प्रक्रिया सुरू होईल. हा खजिना भारताला जागतिक बाजारात नावारुपाला आणणारा आहे. चीनने या खनिजांची निर्यात थांबवली आहे. त्याचा ऑटोमोबाईल क्षेत्रासह तंत्रज्ञान क्षेत्रावर मोठा परिणाम झाला होता. आता राजस्थानमध्ये दुर्मिळ खनिजे सापडल्याने चीनला मिरच्या झोंबल्या आहेत. त्याचा भारतीय तंत्रज्ञान क्षेत्र, संरक्षण क्षेत्राला फायदा होईल.

लवकरच लिलाव प्रक्रिया

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण संस्था, जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया (GSI) आणि अणू खनिज संचालनालयाने (AMD) राजस्थानमधील बालोतरा आणि जालोर जिल्ह्यात या दुर्मिळ खनिजांचा शोध लागला आहे. या जिल्ह्यातील अनेक ठिकाणांचे सर्वेक्षण झाले आहे. भाटी खेडा क्षेत्रातील सर्वेक्षणाचे काम लवकरच संपेल. त्याची किंमत जवळपास 10 कोटी रुपये इतकी आहे. या लिलाव प्रक्रियेत खासगी आणि सरकारी कंपन्या सहभागी होतील.

या साईटच्या उत्खननासंबंधीची पर्यावरणीय मंजुरी लवकरच मिळण्याची शक्यता आहे. भाटी खेडा हे वन्यजीव, अभयारण्य वा इतर नैसर्गिक पट्ट्यात येत नसल्याने येथे उत्खनन करण्यास अडचण येणार नाही. याठिकाणी बास्टनासाइट, ब्रिथोलाइट आणि जेनोटाइम सारखी खनिजं आहेत. कार्बोनेटाइट आणि माइक्रोग्रेनाइट टेकड्यांमध्ये हा खजिना सापडला आहे. जगात या दुर्मिळ खजिनांचा सर्वाधिक साठा चीनकडे आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीनुसार 92 टक्के खजिन्यावर चीनची मालकी आहे. आता चीनच्या या दादागिरीला भारताकडून मोठे आव्हान उभे ठाकले आहे.