महादेव मुंडेप्रकरणात पोलिसांवर वाल्मिक कराडचा दबाव? ज्ञानेश्वरी मुंडेंचा तो गंभीर आरोप काय? पोलिसांना दिला अल्टिमेटम
Dnyaneshwari Munde ultimatum : वाल्मिक कराडच नाही तर बीड पोलिसांचा पाय सुद्धा खोलात गेला आहे. बीडमध्ये कायदा सुव्यवस्था खरंच आहे का असा सवाल गेल्या काही वर्षांतील विविध गुन्हेगारी घटनांवरून विचारल्या जात आहे. त्यात ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलिसांवर मोठा आरोप केला आहे.

बीडमधील आकाचे काळे कारनामे पुन्हा एकदा समोर आले आहेत. वाल्मिक कराडच नाही तर बीड पोलिसांचा पाय सुद्धा खोलात गेला आहे. बीडमध्ये कायदा सुव्यवस्था खरंच आहे का असा सवाल गेल्या काही वर्षांतील विविध गुन्हेगारी घटनांवरून विचारल्या जात आहे. त्यात ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलिसांवर मोठा आरोप केला आहे. याप्रकरणातील पोलिसांच्या तपासावर सकाळीच भाजप आमदार सुरेश धस आक्रमक झाले आहेत. त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ज्ञानेश्वरी मुंडे यांचा पोलिसांना अल्टिमेटम
महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे काल आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी विष प्राशन केलं. त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक सकारात्मक आहेत ते मला प्रत्येकवेळी न्याय देतो असं सांगतात मात्र फिक्स वेळ सांगत नाहीत. मी आणखी एक महिन्याचा वेळ देते एक महिन्यानंतर मी जीवन संपवणारच असं अल्टीमेटम त्यांनी पोलिसांना दिलं आहे.
वाल्मिकचा पोलिसांवर दबाव?
तर मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी याप्रकरणी तपासाला गती का मिळत नाही, याविषयीचा मोठा दावा केला आहे. धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मीक कराडने फोन करून तपास थांबवल्याचा आरोप केला. याबाबत वाल्मीक कराडची पोलीस अधीक्षकांनी चौकशी करावी अशी देखील मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे.
नाहीतर आत्मदहन करणार
ज्ञानेश्वरी मुंडे या आक्रमक दिसल्या. पोलीस अधिक्षकांची सुरुवातीपासून सकारात्मक भूमिका आहे. एसपी साहेबांवर विश्वास आहे. मला माझ्या मुलांसाठी न्याय पाहिजे, माझ्या लेकरांच्या मनातून मला काढायचंय की माझ्या पप्पाच्या मारेकऱ्याला मारायचंय. माझ्या लेकरांना मला चांगल्या वळणावरती घालायचंय असं बदल्याच्या भावनेत नाही. जितेंद्र आव्हाड आणि सुप्रियाताईंनी फोन केला आपण न्याय घेऊ असं म्हणाले. मी एक महिना थांबणार आहे.. अजून मी एसपी ऑफिस समोर येऊन आत्मदहन करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.
मी एसपी साहेबांना म्हटलं आहे तपास एलसीबीकडे द्या, मात्र तुम्हीही स्वतः लक्ष घाला. पोलिसांकडे चकरा मारणं मला आता असाहाय झालं आहे. मीच राहिले नाही तर तुम्हाला न्याय कोण मागणार? म्हणून मी काल टोकाचं पाऊल उचललं आणि विष घेतलं. मी एसआयटी, सीआयडी ची मागणी केली तेव्हा पण काहीच नाही. तेव्हाच आम्हाला कळून आलं की पोलिसांना आरोपी माहीत आहेत, असा गंभीर आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला.
हे प्रकरण अत्यंत गंभीर
ज्ञानेश्वरी मुंडे यांचं प्रकरण गंभीर आहे, असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. बाळा बांगर याने पोलिसांकडे निवेदन दिलं आहे. तत्कालीन एसपींना बाळा बांगर याने वाल्मिक कराड मुलीला काय बोलत होता हे सांगितलं. वाल्मिक कराडचा मकोका रद्द होणार होता. देशमुख परिवाराच्या विरोधामुळे मकोका मागे गेला. महादेव मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा प्लॉटवरून वाद झाला. मी महादेव मुंडे याला चांगला ओळखत होतो, कराडला वाटलं हा हा जास्त शाहणा आहे. वाल्मिक कराडने बाळा बांगरवर 7 केसेस टाकल्या. अश्या किती ज्ञानेश्वरी मुंडे बीड मध्ये कुंकू पुसून बसल्या आहेत, असा सवाल आव्हाड यांनी केला. या विधवांचे श्राप अत्यंत वाईट आहेत, असे ते म्हणाले.
