रीलस्टार महिलेची चाकूने भोसकून हत्या, मनोरंजन सृष्टी हादरली

uttar pradesh shocking : रीलस्टार निशा चौहानच्या हत्येने खळबळ उडाली आहे. तिच्या हत्येने मनोरंजन सृष्टी देखील हादरली आहे.

रीलस्टार महिलेची चाकूने भोसकून हत्या, मनोरंजन सृष्टी हादरली
| Updated on: Jul 04, 2026 | 9:16 AM

उत्तर प्रदेशातील मेरठच्या सरूरपूरमधून मनोरंजन सृष्टीला हादरवणारी घटना घडली आहे. सरूरपूरमध्ये 45 वर्षीय रीलस्टार निशा चौहानची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निशाची हत्या तिच्या पतीने केल्याचेही उघड झालं आहे. जमीन नावावर करण्यावरून झालेल्या वादातून निशाची हत्या झाली. या वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेला निशाचा मुलगा देखील जखमी झाला आहे. निशाची हत्या केल्यानंतर तिच्या पतीनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

निशा चौहान ही सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड सक्रिय असायची. तिला इन्स्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स होते. त्याचबरोबर शहरात तिचे ब्यूटी पार्लर देखील होते. तिचा नवरा प्रदीपने शुक्रवारी सकाळी तिच्यावर चाकूहल्ला केला. आईला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून मुलगा आरडाओरड करू लागला. त्यानंतर घटनास्थळी शेजारीपाजारी जमा झाले. तोपर्यंत निशाचा मृत्यू झाला होता. शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

निशाची हत्या केल्यानंतर आरोपी प्रदीपने स्वत:च्या अंगावर चाकूने अनेक वार केले. शेजारी घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी प्रदीप देखील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. पोलिसांनी तातडीने प्रदीपला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे रीलस्टार निशाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवलाय. निशाच्या हत्येनंतर तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तत्पूर्वी, घटनेची माहिती मिळताच सीओ सरधना आशुतोष कुमार आणि पोलीस स्टेशन प्रभारी गौरव सिंह हे घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासहित इतर पोलीस कर्मचारी देखील पोहोचले.  पोलीस आता तिच्या घराशेजारी राहणाऱ्या लोकांची चौकशी करत आहे. तसेच घराच्या आजूबाजूला लागलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली जात आहे. प्राथमिक तपासातच दोघांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद झाल्याची माहिती हाती आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. रीलस्टार (Reelstar) म्हणून नावारुपास आलेल्या निशाच्या हत्येने मनोरंजन सृष्टीत खळबळ माजली आहे.

Follow Us