पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर! मुस्लिमबहुल भागात कमळ फुलणार? भाजपने विरोधकांना कसं पछाडलं?
पश्चिम बंगालच्या पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. मुस्लिमबहुल भागात कमळ फुलण्याची शक्यता आहे.

Rejinagar By-Election Result 2026: पश्चिम बंगालच्या दोन जागांवर पोटनिवडणूक होत आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर बाजी मारली होती. त्यानंतर त्यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ सोडला होता. नंदीग्राम मतदारसंघ हा एकेकाळी ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानला जायचा. या व्यतिरिक्त हुमायू कबीर यांनी विधानसभेच्या निवडणूकीत दोन जागांवर बाजी मारली होती. त्यानंतर त्यांनी रेजीनगरमधून राजीनामा दिला होता. रेजीनगर मुस्लिमबहुल मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघात भाजप व्यतिरिक्त काँग्रेस, ममता बॅनर्जी यांची टीएमसी, डाव्या पक्षांनी मुस्लिम उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. या मतदारसंघातील मतमोजणीचे सुरूवातीचे कल हाती आले आहेत. या ठिकाणी भाजपचा उमेदवार आघाडीवर असल्याचे समोर आलं आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, चार फेऱ्या झाल्यानंतर भाजप (BJP) उमेदवार शाखाराव सरकार 23 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर कबीर याचे पूत्र गुलाम नबी आझाद यांना आतापर्यंत 12707 मते मिळाले आहेत. ते दुसऱ्या क्रमाकांवर आहेत. या मतदारसंघात काँग्रेस आणि ममता बॅनर्जी गट पिछाडीवर आहे.
पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाल्यास बंगालच्या राजकारणात मोठा संदेश जाण्याची शक्यता आहे. तर ममता बॅनर्जी गटासाठी देखील मोठी परीक्षा असणार आहे. यंदा ममता बॅनर्जी यांना पक्षाचं नवीन नाव आणि चिन्हासोबत मैदानात उतरावं लागलं. या मतदारसंघात भाजपचा विजय झाला, तर जनतेत वेगळा संदेश जाण्याची शक्यता आहे. भाजप पक्षाकडे पारंपरिक मतदारांसहित मुस्लिम मतदार देखील आकर्षित होऊ लागला आहे, असा संदेश देशात जाईल. काही दिवसापूर्वी, आम्ही बळजबरीने श्रीरामचा नारा देण्यास सांगत नाही, असं विधान शुभेंदू अधिकारी यांनी केलं होतं. भाजप प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी म्हटलं होतं की, आताचा काळ हा राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा नाही. तर विकासाची भाषा करण्याचा विषय आहे. राजकीय विश्लेषकाच्या माहितीनुसार, या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे जनमत म्हणून पाहू नये. यातून फक्त निवडणुकीच्या ट्रेंडचा प्राथमिक अंदाज मिळू शकतो. परंतु खरा अंदाज हा सरकारच्या कामगिरीतून दिसून येईल.