
Republic Day 2026 : देशभरात प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण देशात यावेळी 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जीआल. याच दिवशी भारतीय संविधान लागू झाले होते. म्हणजे एका अर्थी 26 जानेवारी 1950 रोजीपासून देशात सार्वभौव, लोकशाही गणराज्य राष्ट्राची स्थापना झाली होती. दरम्यान यावेळचा प्रजासत्ताक दिवस खूपच विशेष असणार आहे. या दिवशी नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर भारतीय हवाई दल वेगवेगळ्या हवाई कसरती दाखवणार असून ऑपरेशन सिंदूरच्या थिमवर या कसरती असणार आहेत. या कसरतींमध्ये भारताच्या हवाई दलात असलेली राफेल, सुखोई-30 मिग-29 यासारखी लढाऊ विमाने सहभागी होतील.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य अशा परेडचे आयोजन करण्यात आले आहे. या परेडमध्ये भारताची सांस्कृतिक विविधता, सैन्याची शक्ती, वैज्ञानिक प्रगती, भारताची आत्मनिर्भर भारत मोहीन यांची झलक पाहायला मिळणार आहे. देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे नेतृत्त्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मी या करतील. ही संपूर्ण परेड दिल्लीच्या कर्तव्य पथावर होईल. सकाळी साडे नऊ वाजता या परेडला सुरुवात होईल. सामान्यांना ही परेड पाहण्यासाठी कर्तव्य पथाचे दरवाजे सकाळी साडे सात वाजता खुले होतील.
भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी वायुसेना आपली ताकद दाखवणार आहे. या दिवशी वायूदल वेगवेगळ्या हवाई कसरती सादर करेल. विशेष म्हणजे यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या थिमवर आधारित काही कसरती असणार आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या काही लढाऊ विमानांचाही यात सहभाग असेल. यातून संपूर्ण जगला भारतीय हवाई दलाची शक्ती, हवाई दलाचे तंत्रज्ञान आणि क्षमता दिसणार आहे. हवाई दलाच्या कसरतीदरम्यान राफेल, सुखोई-30, मिग-29, जॅग्वार ही लढाऊ विमाने सहभागी होतील.
दरम्यान, भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपीय आयोगाचे अध्यक्ष उर्सुला वॉव डेर लेयेन हे प्रमुख अतिथी असतील.