आता पुतिन थेट मैदानात, रशियाकडून ट्रम्प यांची झोप उडवणार वक्तव्य, जगभरात खळबळ
रशियाकडून मोठं विधान करण्यात आलं आहे, त्यामुळे आता युरोपियन राष्ट्र, अमेरिका आणि रशियामधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. रशियाच्या विधानानंतर आता डोनाल्ड ट्रम्प काय प्रतिक्रिया देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच व्हेनेझुएलावर हल्ला केला होता, अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला करून व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली. अमेरिकेच्या या कारवाईने जगभरात खळबळ उडाली होती. अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्याचा चीन आणि रशियाकडून निषेध करण्यात आला होता. निकोस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ततडीने सोडून दयावे, अशी मागणी चीनने केली होती. तसेच अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप देखील चीनकडून करण्यात आला होता. तर रशियानं देखील अमेरिकेच्या या कारवाईचा निषेध केला होता, अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर व्हेनेझुएलाच्या समुद्र हाद्दीमध्ये असलेले रशियाचे ऑईल टँक देखील ताब्यात घेतले होते. त्यामुळे रशिया आणि अमेरिका पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं.
दरम्यान व्हेनेझुएलावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आता अमेरिकेनं आपला मोर्चा हा ग्रीनलँडकडे वळवला आहे. ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यासाठी आता अमेरिका साम, दाम दंड निती अशा सर्वच मार्गाचा अवलंब करताना दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड खरेदी करण्याची देखील तयारी दर्शवली होती. मात्र ग्रीनलँडमधील नागरिकांकडून डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड विरोध होत आहे, तसेच डेन्मार्कने देखील याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या आठ देशांवर अमेरिकेनं दहा टक्के टॅरिफ लावला आहे.
आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रशियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडून देणारं विधान करण्यात आलं आहे. रशियाच्या या विधानामुळे युरोपियन राष्ट्र, रशिया आणि अमेरिकेमधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. रशिया देखील अमेरिकेप्रमानेच ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याच्या तयारीत आहे, याच पार्श्वभूमीवर रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं मोठं विधान केलं आहे, ग्रीनलँड हा डेन्मार्कचा अधिकृत भाग नसल्याचं रशियानं म्हटलं आहे. त्यामुळे आता युरोपियन राष्ट्र आणि रशियामध्ये देखील तणाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेप्रमाणेच रशियाचा देखील ग्रीनलँडला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
