
नवी दिल्लीः रशिया-युक्रेन युद्धाच्या ( War) पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Foreign Minister S. Jaishankar) यांनी कठोर शब्दात रशियाला सुनावले असल्याने त्यांत्या या वक्तव्याची सध्या जगभरात चर्चा होत आहे. रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) या युद्धाबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट आणि टोकदार भूमिका घेत ते म्हणाले की, पाश्चिमात्य देशांकडून शस्त्रांचा पुरवठा होत नसल्याने भारत शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यासाठी रशियावर अवलंबून आहे. मात्र हे सांगताना त्यांनी हेही सांगितले की, पाश्चात्य देश पाहत आहेत की आमच्या शेजारी लष्करी हुकूमशाही देश असतानाही त्याला आम्ही मित्रसारखं वागवत आहोत.
सोमवारी युक्रेनवरील रशियन हल्ल्याबद्दल बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी कठोर शब्दात त्यांना सुनावले.
यावेळी ते म्हणाले की, पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे आणि नागरिकांचा जीव घेणे जगाच्या पातळीवर कोणालाही मान्य नाही.
रशिया-युक्रेन संघर्ष असला तरी त्याच्यावर तोडगा निघू शकतो. तो तोडगा संवादाच्या आणि सामोपचाराच्या साहाय्याने सोडवता येतो असंही त्यांनी सांगितले.
त्यामुळे या दोन्हा देशातील असलेला संघर्ष कोणालाही फायदेशीर नाही आणि त्यातून कोणालाच मदतही मिळू शकत नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अशी भूमिका घेतल्याने त्यांचे कौतूक होत आहे.
यापूर्वी ही त्यांनी रशियाकडून करण्यात येत असलेल्या तेल आयातीच्या प्रश्नावर बोलताना सांगितले होते की, आपल्या देशात दरडोई उत्पन्न 2 हजार डॉलर आहे.
मात्र इथे लोक महागाईला तोंड देऊन तेल विकत घेऊ शकत नाहीत. त्याबरोबरच आमच्या देशातील लोकांना महागाईचा सामना करावा लागू नये म्हणून जगातील कोणत्याही राष्ट्राबरोबर आम्ही भारतीयांसाठी व्यवहार करायला तयार आहोत आणि ती आमची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.