झुरळं फार जास्त खंबीर निघाली.. संजय राऊत यांची सरकारवर थेट टीका..

सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू आहे. त्यांनी उपोषण मागे घेण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. जंतरमंतरवर मोठ्या संख्येने लोक जमत आहेत. यादरम्यानच शिवसेना ठाकरे गटाचे नेतेसंजय राऊत यांनी मोठी टीका केंद्र सरकावर केली. हे सरकार लोकशाहीवादी नसल्याचे म्हटले.

झुरळं फार जास्त खंबीर निघाली.. संजय राऊत यांची सरकारवर थेट टीका..
Sonam Wangchuk Jantar Mantar Protest on Sanjay Raut
| Updated on: Jul 20, 2026 | 11:10 AM

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले की, सरकार मुलांना घाबलंय. सरकारला वाटले की, वांगचुक काय आहे किंवा अभिजीत दिपके काय आहे. यांना आम्ही किड्या मुंग्यांसारखे चिरडून टाकू. पण ही जी झुरळं आहेत, ही झुरळं फार जास्त खंबीर निघाली आहेत. संपूर्ण देशातून झुरळं बाहेर पडली आहेत. झुरळांना पाठिंबा मिळत आहे. हे सरकार लोकशाहीवादी अजिबात नाही. लोकशाहीवादी असतं तर या झुरळांना घाबरून मोर्चाची परवानगी नाकारली नसती. सोनम वांगचुक यांना जोर जबरदस्तीने पांढरे कपडे लावून उचलून रूग्णालयात नेले नसते. सरकार या आंदोलनाला आणि आंदोलकांना सामोरे गेलं असतं. त्यांचा विषय समजून घेतला असता आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन या देशाच्या युवा पिढीचे समाधान केले असते.

पण या सरकारने तरूणांच्या बाबतीत कठोर भूमिका घेतली, हे संतापजनक आहे. हजारो लाखो तरूण जंतरमंतरला जमले आहेत, सरकारविरोधात घोषणा देत आहेत. सरकारच्या हातात असतं तर त्यांनी या हजारो तरूणांच्या मागे ईडी लावली असती. मी तर असे आवाहन केले की, संसदेवर मोर्चा नेता येत नसेल तर या मोर्चाचा मार्ग ईडी हेडकॉर्टरच्या दिशेने न्यावा.

पुढे संजय राऊत म्हणाले की, या देशाच्या बर्बादीमध्ये या सरकारचा सर्वात मोठा हात आहे. देशविरोधी कारवायांमध्ये ईडी सहभागी आहे. त्यामुळे संसदेबरोबर या गुलाम झालेल्या ज्या संस्था आहेत, मग ते सुप्रीम कोर्ट असेल किंवा ईडी असेल त्यांच्या दिशेने सुद्धा हा मोर्चा नेला पाहिजे. सुप्रीम कोर्ट जर गुलाम नसते तर राष्ट्रहिताचे निर्णय दिले असते. संविधानानुसार या देशाचे निर्णय झाले असते.

या देशातील प्रत्येक संविधानिक संस्था मोदी आणि शाहांची गुलाम आहे. यासोबतच घरगडी म्हणून काम करते. त्यात काही लपून राहिले नाही. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांना उपचारासाठी रूग्णालयात घेऊन जा हे सांगू शकतात तर सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे लोक तर मग ते सरकारलाही निर्देश देऊ शकतात. या मुलांचे म्हणणे ऐकून घ्या आणि समाधान करा.

Follow Us