अयोध्येत बाबरीचं पतन होत असताना सध्याचे हिंदू वोट बँकवाले पळून गेलेले, संजय राऊत यांनी भाजपला फटकारलं

विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला प्रमुख नेत्यांमध्ये शरद पवार, फारुख अब्दुल्ला इतर नेते होते आणि शिवसेनेच्या वतीनं मी तिथं उपस्थित होतो. त्या बैठकीला उपस्थित राहण्याविषयी उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं, असं संजय राऊत म्हणाले.

अयोध्येत बाबरीचं पतन होत असताना सध्याचे हिंदू वोट बँकवाले पळून गेलेले, संजय राऊत यांनी भाजपला फटकारलं
संजय राऊत
| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 9:53 AM

नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांची बैठक, ममता बॅनर्जी, यूपीए आणि हिंदुत्त्व या मुद्यांवर भाष्य केलं. विरोधी पक्षांच्या बैठकीत  शरद पवार(Sharad Pawar) यांनी भविष्यात लवकर बैठक व्हावी, अशी सूचना मांडली. फार वेळ न लावता भविष्यात लवकर बैठक घ्यावी, अशी भूमिका नेत्यांनी मांडली, असं संजय राऊत म्हणाले. पंतप्रधानांच्या तीर्थयात्रा  ठीक आहेत, पण देशाची जनता महागाईच्या मुद्यावर होरपळून निघाली आहे, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली. तर, अयोध्येत बाबरीचं पतन होत असताना सध्याचे हिंदू वोट बँकवाले (Hindu Vote Bank) पळून गेले. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख त्यावेळी ठामपणे उभे राहिले. बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान आहे, असं संजय राऊत म्हणाले. आमचं हिंदुत्व शेपूट घालणारे आणि पळपुटं नाही, असं संजय राऊत यानी सांगितलं.

आमचं हिंदुत्त्व पळपुटं नाही

चंद्रकांत पाटील काय म्हणतात यावर भूमिका ठरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, असं संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेते आहेत. प्रमोद महाजन यांचं ऑन रेकॉर्ड वक्तव्य आहे. महाराष्ट्रात मराठीच्या मुद्यावर मत द्यायला सांगितलं. त्याप्रमाणं हिंदू म्हणून निवडणूक लढवू, असं म्हणाले होते. त्यानंतर पार्ले येथील निवडणुकीत शिवसेनेनं मतदान मागितलं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या दोन आमदारांचं निलंबन झालं होतं. बाळासाहेब ठाकरेंना हिंदूना हिंदू म्हणून मतदान करायला लावलं. या देशात हिंदूची वोट बँक आहे हा विचार बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला. अयोध्येत बाबरीचं पतन होत असताना सध्याचे हिंदू वोट बँकवाले पळून गेले. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख त्यावेळी ठामपणे उभे राहिले. बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान आहे, असं संजय राऊत म्हणाले. आमचं हिंदुत्व शेपूट घालणारे आणि पळपुटं नाही, असं संजय राऊत यानी सांगितलं. आमचं हिंदुत्व लोकांना अन्न वस्त्र निवारा मिळावा यासंदर्भात जोडलेलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या आदेशानं बैठकीला हजर

पाच राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. गोवा, उत्तराखंड असेल. यामध्ये विरोधी पक्ष कोणती भूमिका बजावू शकतात, यावर प्राथमिक चर्चा झाली. बैठकीला प्रमुख नेत्यांमध्ये शरद पवार, फारुख अब्दुल्ला इतर नेते आणि शिवसेनेच्या वतीनं मी तिथं उपस्थित होतो. त्या बैठकीला उपस्थित राहण्याविषयी उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. शरद पवार यांनी भविष्यात लवकर बैठक व्हावी, अशी सूचना मांडली. फार वेळ न लावता भविष्यात लवकर बैठक घ्यावी, अशी भूमिका नेत्यांनी मांडली, असं संजय राऊत म्हणाले.

विरोधी पक्षांनी एकत्र यावं ही भूमिका आहे. भाजपशी ममता बॅनर्जी लढत आहेत, आम्ही देखील लढत आहे. टार्गेट एक  असेल तर , मतभेदाचं कारण काय आहे. तुम्ही वेगळे लढावं, आम्ही वेगळं लढावं, अशी गरज काय आहे, असं संजय राऊत म्हणाले. ममता बॅनर्जी यांची समजूत काढली जाणार का विचारलं असता यासंदर्भात मी काय बोलू, असं संजय राऊत म्हणाले. शरद पवार आणि फारुख अब्दुल्ला हे ज्येष्ठ नेते आहेत ते चर्चा करतील, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात मिनी यूपीए आहे. राज्यस्तरावर मिनी यूपीएचं मॉडेल असून  त्याचा आदर्श इतरांनी घेतला आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

पंतप्रधानांच्या तीर्थयात्रा ठीक पण जनता महागाईनं होरपळली

राज्यसभेत आम्हाला बोलू देत नाहीत. पण लोकसभेत महागाईवर प्रश्न विचारले जातील, असं संजय राऊत म्हणाले. पंतप्रधानांच्या तीर्थयात्रा  ठीक आहेत, पण देशाची जनता महागाईच्या मुद्यावर होरपळून निघाली आहे. या प्रश्नी संसदेत वादळी चर्चा होईल, असं संजय राऊत म्हणाले. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी यावर नरेंद्र मोदी बोलताना दिसत नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.

इतर बातम्या:

दिल्लीत आज पुन्हा सोनिया, पवार, राऊतांची बैठक, इतर मोदीविरोधकही एकवटणार, नेमका अजेंडा काय?

UPA Meeting : ममता बॅनर्जी यांची समजूत काढली जाणार, जबाबदारी शरद पवारांकडे?