AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत आज पुन्हा सोनिया, पवार, राऊतांची बैठक, इतर मोदीविरोधकही एकवटणार, नेमका अजेंडा काय?

अलीकडेच पवारांच्या भाषणाच्या पुस्तकाला भगवं कव्हर आहे हे सांगायला राऊत विसरले नव्हते. काँग्रेस विचाराचं 'हिंदूकरण' होतानाही देश पहातोय. तो त्यांना मोदीविरोधी आघाडी उभी करताना किती हुकमी ठरणार हे पहाणं औत्सुक्याचं आहे.

दिल्लीत आज पुन्हा सोनिया, पवार, राऊतांची बैठक, इतर मोदीविरोधकही एकवटणार, नेमका अजेंडा काय?
सोनिया गांधी, शरद पवार, संजय राऊत यांच्यात आज पुन्हा बैठक
| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 7:52 AM
Share

भारतासह महाराष्ट्रही गारठतोय. उत्तरेत वारे बदललेत आणि त्यानं वातावरणही बदलून गेलंय. ह्याच बदलात दिल्लीचं राजकारण मात्र उबदार होताना दिसतंय. ह्या बदलाच्या पाठीमागे पुन्हा एकदा मराठी नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांची आज पुन्हा राजधानी दिल्लीत बैठक होतेय. (Opposition meet today) विशेष म्हणजे कालही याच नेत्यांमध्ये बैठक झाली होती. आजचा बैठकीचा सलग दुसरा दिवस आहे. त्यामुळे विरोधकांची मोदीविरोधी आघाडी आगामी काळात उदयाला आली तर तिची बिजं ही कालच्या आणि आजच्या बैठकीत पहायला मिळतील. कालच्या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना नेत्यांशिवाय नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दूल्ला, द्रमूक नेते टी.आर.बालू यांची उपस्थिती होती. राहुल गांधीही बैठकीत होते. पुढच्या काही काळात यात आणखी नेते यात एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. संजय राऊत यांनी कालच्या बैठकीनंतर आज पुन्हा भेटू, शरद पवारही असतील असं म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आजची बैठक होतेय.

बैठकीचा अजेंडा काय? सोनिया-पवार-राऊत भेटतायत (Sonia, Pawar, Raut Meet) म्हणजे अजेंडा राजकीय असणार यात शंका नाही. पण नेमका कोणता अजेंडा आहे याचं उत्तर संजय राऊत यांनीच दिलंय. ते म्हणाले, प्रत्येक राज्यात विरोधकांची एकजूट हाच आमचा मुख्य अजेंडा आहे. ही पहिलीच भेट होती. उद्या (म्हणजे आज) पुन्हा भेटू, शरद पवारही असतील. अजेंड्यासंबंधात राऊतांची ही प्रतिक्रिया बोलकी आहे. पण नेत्यांच्या प्रत्यक्ष चर्चेत काय मुद्दे होते याचीही चर्चा होतेय. तर त्यात भाजप बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करतोय. दुसऱ्या, तिसऱ्या आघाडीचा पर्याय कालबाह्य आहे. त्यात भाजपकडे मजबूत बहुमत आहे तर विरोधकांमध्ये एकीचा अभाव दिसतो. भाजपविरोधक जोपर्यंत एकवटत नाहीत तोपर्यंत बदल होणार नाही. त्यामुळेच त्या त्या राज्यात भाजपविरोधकांनी आपआपसातले मतभेद विसरुन एकत्र यावं असा विचार ह्या बैठकीत मांडण्यात आला. (Aghadi against Modi) राष्ट्रीय पातळीवर भाजपला एकच सक्षम पर्याय उभा करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. त्याच्याच पुढची चर्चा आज होतेय.

ममता आणि इतरांचं काय? मोदीविरोधी आघाडी उभी करताना विरोधकांमध्ये एकीचा अभाव दिसतो हे पुन्हा पुन्हा दिसून आलं आहे. त्यात टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी अलिकडेच मुंबईचा दौरा केला. ह्या दौऱ्यात त्यांनी शरद पवार यांच्यासोबत बैठक केली. राऊत, आदित्य ठाकरेंनाही त्या बोलल्या. त्यांनी जे दोन -तीन सार्वजनिक कार्यक्रम केले, त्यात राहुल गांधींच्या किंवा काँग्रेस नेतृत्वावर टीका करण्याची संधी सोडली नाही. सहा महिने तुम्ही विदेशात राहणार तर मग राजकारण कसं करणार असं वक्तव्य करत त्यांनी राहुल गांधींवर प्रश्नचिन्हं निर्माण केलं होतं. यूपीए आहेच कुठं हे पवारांच्या समक्ष पत्रकारांसमोर बोलायला ममता मागे राहिल्या नाहीत. त्यामुळेच फक्त ममताच नाही तर अखिलेश यादव, मायावती, दक्षिण, ईशान्यतील राज्य इथल्या नेत्यांनाही एकत्र करणे वाटतं तेवढं सोप्पं नाही. त्यामुळेच कालच्या आणि आजच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचं दिसतंय.

शिवसेनेचं सारथ्य शिवसेनेनं विशेषत: संजय राऊत यांनी आधी राज्यात भाजपपासून फारकत घेत आघाडी सरकार बनवण्यात जी भूमिका घेतली आणि आता ते देशपातळीवर जी भूमिका मांडतायत, त्यानं भाजप नेत्यांना डोकेदुखी वाटत असणार. शिवसेनेला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर बरं झालं असाही विचार येत असेल.  कारण शिवसेनेनं भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं आणि स्वत: कडे पाच वर्षे मुख्यमंत्रीपद घेतलं. हाच प्रयोग पवार आणि राऊत काँग्रेसला सोबत घेऊन देशपातळीवर राबवण्याच्या विचारात असल्याचं जाणकारांना वाटतं. त्यासाठी संजय राऊत दिल्लीत इतक्या सहजपणे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधींना भेटतायत की एवढं तर काँग्रेस नेत्यांनाही शक्य नाही अशी प्रतिक्रिया दिल्लीत आहेत. बरं राऊत फक्त काँग्रेस हायकमांडलाच भेटतायत असं नाही तर इतर काँग्रेस नेत्यांमध्येही सहज मिसळताना दिसतायत.

विचार काय असेल?

भाजपच्या हिंदुत्वाच्या (BJP Hindutva) नाण्यासमोर गेल्या दोन्ही निवडणुकीत विरोधकांची वाताहत झाली. त्याला कशी टक्कर द्यायची याचं उत्तर शोधताना काँग्रेस नेते चाचपडताना दिसतायत. पण राहुल गांधीनी राजस्थानमध्ये दोन दिवसांपूर्वी जे वक्तव्य केलं, हिंदूंचं राज्य आणा, हिंदूत्ववाद्यांचं नाही ते बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचताना दिसतंय. शिवसेनेनं याच हिंदूत्वाच्या लाईनवर महाराष्ट्रात उभारी घेतली. भाजपचं हिंदूत्व आणि शिवसेनेचं हिंदूत्व एकच आहे असं समजण्याची गल्लत दिल्ली किंवा हिंदी भाषिक करतात. त्यामुळेच शिवसेनेच्या हिंदूत्वाचा (Shivsena Hindutva) डोस घेऊन काँग्रेस मोदी हिंदुत्वाला रोखणार का अशीही चर्चा आता होताना दिसतेय. अलीकडेच पवारांच्या भाषणाच्या पुस्तकाला भगवं कव्हर आहे हे सांगायला राऊत विसरले नव्हते. काँग्रेस विचाराचं ‘हिंदूकरण’ होतानाही देश पहातोय. तो त्यांना मोदीविरोधी आघाडी उभी करताना किती हुकमी ठरणार हे पहाणं औत्सुक्याचं आहे.

हे सुद्धा वाचा:

Vastu Tips : या 4 गोष्टी चुकूनही पर्समध्ये ठेवू नका, आर्थिक नुकसान झालेच म्हणून समजा

Auranagabad: वृद्ध आई-वडिलांना घेऊन खेड्यात रहायचं कसं? जिल्हा परिषद शिक्षकांचा संतप्त सवाल

Nirmala Sitharaman :अर्थसंकल्प 2022: अर्थव्यवस्थेला ‘पॅकेज’चा बूस्टर डोस; केंद्रीय अर्थमंत्र्यांचं दिल्लीत विचारमंथन

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.