Nirmala Sitharaman :अर्थसंकल्प 2022: अर्थव्यवस्थेला ‘पॅकेज’चा बूस्टर डोस; केंद्रीय अर्थमंत्र्यांचं दिल्लीत विचारमंथन

Nirmala Sitharaman :अर्थसंकल्प 2022: अर्थव्यवस्थेला ‘पॅकेज’चा बूस्टर डोस; केंद्रीय अर्थमंत्र्यांचं दिल्लीत विचारमंथन
निर्मला सितारमन

कृषी व खाद्य प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी सरकार महत्वपूर्ण धोरणांची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. अर्थमंत्री कृषी क्षेत्राच्या प्रतिनिधींकडून अर्थसंकल्पाबाबत असलेल्या अपेक्षा जाणून घेणार आहे

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Dec 15, 2021 | 7:17 AM

नवी दिल्ली: केंद्र सरकारने आगामी अर्थसंकल्पाच्या तयारीला सुरुवात केली आहे. राजधानी दिल्लीत पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman)यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्प संबंधित विविध गटांच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (बुधवारी) कृषी आणि खाद्य प्रक्रिया उद्योगातील प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत अर्थमंत्री चर्चा करणार आहेत.

अपेक्षा कृषीक्षेत्राच्या:

कोविड महामारीमुळे अन्य क्षेत्रांसोबतच कृषी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे कृषी व खाद्य प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी सरकार महत्वपूर्ण धोरणांची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. अर्थमंत्री कृषी क्षेत्राच्या प्रतिनिधींकडून अर्थसंकल्पाबाबत असलेल्या अपेक्षा जाणून घेणार आहे. विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, कृषी विषयक आस्थापनांचे सदस्य ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभागी होणार आहेत. अर्थसंकल्पात कृषीचा हिस्सा वाढविणे, रोजगार निर्मितीला चालना, खाद्य प्रक्रिया उद्योगांना अनुदानाचं पाठबळ हे मुद्दे बैठकीच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आर्थिक वृद्दी दर 10 टक्क्यांहून अधिक असण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने मौद्रिक धोरणामुळे सकल घरेलु उत्पाद (जीडीपी) वाढीचा दर 9.5 असण्याची शक्यता वर्तविली आहे.

अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस

कोविड प्रकोपामुळे उद्योगजगताची चाकं मंदावली होती. आगामी अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारकडून योजनांची घोषणा केली जाणार आहे. मात्र, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रार्दूभाव विचारात घेता अर्थसंकल्पात कोविड निर्मूलन मोहिमेच्या गतीशीलतेवर भर दिला जाणार आहे. कोविड निर्मूलनासोबत सरकार पायाभूत सुविधांच्या बळकटीवर जोर देण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सर्वंकष पॅकेजच्या घोषणेचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी वर्तविला आहे.

इतर बातम्या: 

 

एसबीआयच्या ‘या’ दोन करंट अकाऊंटवर मिळतात चांगल्या सुविधा; व्यवसायिकांसाठी ऑफर्सची खैरात

नवीन वर्ष, ख्रिसमसला मिळणाऱ्या भेटवस्तूंवर टॅक्स लागतो? जाणून घ्या काय सांगतो कायदा

Finance minister Nirmala Sitharaman will hold Pre budget consultations with stakeholders Agri and Food sectors

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें