अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची खोचक टीका

संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या तब्येतीवर व 'लाखोंच्या मोर्चाला ८ हजार' म्हणण्यावर खोचक टीका केली. त्यांची नजर कमजोर झाल्याचा दावा करत, त्यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवावेत असे राऊत म्हणाले. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सीमा खन्ना यांच्यावरही त्यांनी 'माफिया' व 'लेडी डॉन' असे गंभीर आरोप करत, अमित शाह २०२९ पर्यंत गृहमंत्री राहणार नाहीत असे भाकीत केले.

अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची खोचक टीका
Sanjay Raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2026 | 10:41 AM

अमित शाह यांची प्रकृती बरी नाही. त्यांच्या तब्येती बाबतच्या बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. त्यांनी तब्येतीच काळजी घेतली पाहिजे. त्यांना लाखोंचा मोर्चा केवळ 8 हजाराचा दिसत आहे. त्यांची नजर कमजोर झाली आहे. त्यांचे आरोग्य तपासण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने समिती स्थापन केली पाहिजे. किती खोटं बोलतो हा माणूस? असा हल्ला चढवतानाच अमित शाह यांचे डोळे नेत्रदानानंतर म्युझियममध्ये ठेवले पाहिजे. या डोळ्यांना लाखोंचा मोर्चा फक्त 8 हजारांचा दिसला म्हणून लोकांना कळेल, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केली आहे.

अमित शाह बऱ्याच काळाने प्रकट झाले. इतके दिवस ते भूमिगत होते. या देशात आंदोलनं सुरू आहेत. दिल्लीत मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे, त्याविरोधातील आंदोलन सुरू आहे. देशाच्या राजधानीत आणि राज्याराज्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर, आक्रोशावर ज्यांनी तोंड बंद ठेवलं होतं, ते अमित शाह प्रकट झाले. आणि म्हणाले की, सोमवारच्या मोर्च्यात फक्त 8 हजार लोक होते. दीड किलोमीटरच्या क्षेत्रात त्यांना फक्त 8 हजार लोकं दिसली. गृहमंत्र्यांची नजर कमजोर झाली आहे, याचं वाईट वाटतं. त्यांची प्रकृती बरी नाही. ते मानसिक दडपणाखाली आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Loading...

तुमच्या घराचा परिसर प्रतिबंधित का केला?

डिप्रेशन आणि निराशेने त्यांना ग्रासले आहे. लाखोंचा मोर्चा होता. फक्त 8 हजार डोकी कोणी मोजली? त्यांना 8 हजार लोकं दिसतात. त्यांच्या डोळ्याची नजर कमी झाली आहे. त्यांनी डोळ्याचा चष्मा तपासावा. देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी तात्काळ त्यांच्याकडे वैद्यकीय पथक पाठवावं. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करावी, ही सरकारला विनंती आहे. अमित शाहांनी जबाबदारीने बोलावं. 8 हजाराचा मोर्चा होता तर अडीच लाख पोलीस का उतरले रस्त्यावर? तुम्हाला मोर्चाची भीती का वाटते? तुमच्या घराचा परिसर प्रतिबंधित का केला होता? 8 हजाराच्या मोर्चासाठी? लोक रस्त्यावर उतरत आहे, निवडणूक आयोगाविरोधात बंड आहे, असंही राऊत म्हणाले.

अमित शाह गृहमंत्रीपदी राहणार नाही

अमित शाह म्हणतात 2029मध्ये भाजप विजयी होईल. त्यांच्या तोंडून ज्ञानेश कुमार बोलत आहेत. ही त्यांची भाषा आहे. 12 कोटी लोकांचे नाव वगळलेला ज्ञानेश कुमार, ईव्हीएम घोटाळ्यातील ज्ञानेश कुमार आणि सीमा खन्ना हेच अमित शाह यांच्या तोंडातून बोलत आहेत, असं सांगतानाच 2029 पर्यंत अमित शाह गृहमंत्री राहणार नाहीत. हे मी वारंवार सांगतोय. मोदी पंतप्रधान राहत नाही. हे त्यांनाही माहीत आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्या छाताडावर लाखो लोक दिल्लीत येतील हे त्यांना कधीच वाटलं नव्हतं. जंतरमंतर का बंद केलं? तुम्हाला भीती नाही तर जंतरमंतरला टाळं का लावलं? त्याचं उत्तर अमित शाह आणि त्यांच्या लोकांनी द्यावं, असं आव्हानच त्यांनी दिलं.

सीमा खन्ना लेडी डॉन

घुसखोरांची नावे वगळायला विरोधक विरोध करत आहेत, असं अमित शाह म्हणतात. मग मी घुसखोर आहे का? माजी निवडणूक आयुक्त कुरैशी यांचं नाव वगळलं ते घुसखोर आहेत का? माजी सैनिकांना वगळलं. ते घुसखोर आहेत का? याचं उत्तर अमित शाह यांनी द्यावं. ज्ञानेश कुमार माफिया आहे आणि सीमा खन्ना निवडणूक आयोगाची लेडी डॉन आहे. त्यामुळेच त्यांना संरक्षण देण्यासाठी कायदा केला होता. हा कायदा म्हणजे त्यांच्या भ्रष्टाचाराला संरक्षण आहे. जे भाजपला मतदान करत नाही. ते घुसखोर आहेत ही अमित शाह यांची व्याख्या आहे, अशी टीका त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us