पुरावा असेल तर ‘त्या’ नेत्याचं नाव घ्या, हवेत तीर मारू नका; राऊतांचं फडणवीसांना आव्हान

| Updated on: Mar 17, 2021 | 7:57 PM

सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्यासाठी शिवसेनेने माझ्यावर दबाव आणला होता. (sanjay raut slams devendra fadnavis over sachin vaze issue)

पुरावा असेल तर त्या नेत्याचं नाव घ्या, हवेत तीर मारू नका; राऊतांचं फडणवीसांना आव्हान
Sanjay Raut
Follow us on

नवी दिल्ली: सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्यासाठी शिवसेनेने माझ्यावर दबाव आणला होता. शिवसेनेचे काही नेतेही मला भेटले होते, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. पुरावे असेल तर नाव घेऊन बोलावं. त्या नेत्यांची नावं घ्या. उगाच हवेत तीर मारू नका, असं आव्हानच संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिलं आहे. (sanjay raut slams devendra fadnavis over sachin vaze issue)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत देवेंद्र फडणवीस यांचे आरोप खोडून काढले. नावं घेऊन बोला. तुमच्याकडे पुरावा असेल, काही माहिती असेल तर ती द्या. हवेत तीर मारू नका. थेट बोला, असं आव्हानच राऊत यांनी फडणवीसांना दिलं.

होय, त्या रुटीन बदल्या नाहीत

आज काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या दबावातून करण्यात आल्या असं विरोधी पक्षाला वाटत असेल तर ते खोटं आहे. ठाकरे सरकारवर कोणताही दबाव नाही. ही आमची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे बदल्या करण्यात आल्या. मात्र, या रुटीन बदल्या नाहीत. ज्या प्रकारचं वातावरण तयार झालं आहे आणि मीडियात रोज काही ना काही येत आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यावर शंका आहे. त्यांची चौकशी होईपर्यंत बदल्या कराव्यात असं मुख्यमंत्र्यांना वाटलं म्हणून त्यांनी या बदल्या केल्या, असं ते म्हणाले.

फडणवीस कुणाला फेव्हर करत आहेत?

वाझेंना निलंबित करण्यात आलं होतं तरीही त्यांना पोलीस दलात का घेण्यात आलं असं फडणवीस विचारत आहेत. ठिक आहे. ते माजी मुख्यमंत्री होते. वाझेंना कशाबद्दल निलंबित करण्यात आलं हे त्यांना माहीत आहे. एका अतिरेक्याची चौकशी करत असताना तो प्रकार घडला आणि त्यातून त्यांना निलंबित करण्यात आलं. हे फडणवीसांना माहीत नाही का? आज ते कुणाच्या फेव्हरमध्ये बोलत आहेत? त्यावेळच्या तपास अधिकाऱ्याच्या बाजूने फडणवीस बोलणार नाही का? असा सवालही त्यांनी केला.

हमाम मे सब नंगे

वाझे हे वसुली अधिकारी होते असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावरही राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणत्या राज्यात कोण वसूली करतं हे सर्वांना माहीत आहे. त्या ठिकाणी वसूली इंचार्ज कोण होतं हे सुद्धा सर्वांना माहीत आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोलू नये. हमाम में सब नंगे है, असं राऊत म्हणाले. (sanjay raut slams devendra fadnavis over sachin vaze issue)

माजी मुख्यमंत्र्यांने पोलिसांचं खच्चीकरण करू नये

महाराष्ट्राचं डीएने वेगळं आहे. हे फडणवीसांनाही माहीत आहे. एका माजी मुख्यमंत्र्याने मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करणं योग्य नाही, फडणवीसांनी ते करू नये, असंही ते म्हणाले. एनआयए आणि एटीएस या दोन्ही प्रकरणाचा तपास करत आहे. त्यात सर्व काही बाहेर येईल. सर्व वहीखाता बाहेर येईल. त्यानंतर बोलूच असं सांगताना फडणवीस आजच्या पत्रकार परिषदेत सत्यापासून फारकत घेऊन बोलत होते, अशी टीकाही त्यांनी केली. (sanjay raut slams devendra fadnavis over sachin vaze issue)

 

संबंधित बातम्या:

सचिन वाझे, परमबीर सिंग छोटी माणसं, त्यांच्या मागचे हात शोधा, देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत मागणी

अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

2018 ला माझ्यावर दबाव होता, सचिन वाझेंसाठी उद्धव ठाकरेंनी माझ्याकडे माणसं पाठवली : देवेंद्र फडणवीस

(sanjay raut slams devendra fadnavis over sachin vaze issue)