AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन वाझे, परमबीर सिंग छोटी माणसं, त्यांच्या मागचे हात शोधा, देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत मागणी

सचिन वाझे किंवा परमवीर सिंग हि छोटी माणसं आहेत. त्यांच्या मागचे हात शोधा, अशी मागणी फडणवीस यांनी राजधानी दिल्लीत केलीय. तसच मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही NIAने आपल्याकडे वर्ग करुन घेण्याची मागणी फडणवीसांनी केली आहे.

सचिन वाझे, परमबीर सिंग छोटी माणसं, त्यांच्या मागचे हात शोधा, देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत मागणी
Ddevendra Fadnavis
| Updated on: Mar 17, 2021 | 6:40 PM
Share

नवी दिल्ली : सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी केल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर अजून एक गंभीर आरोप केलाय.  सचिन वाझे किंवा परमवीर सिंग हि छोटी माणसं आहेत. त्यांच्या मागचे हात शोधा, अशी मागणी फडणवीस यांनी राजधानी दिल्लीत केलीय. तसच मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही NIAने आपल्याकडे वर्ग करुन घेण्याची मागणी फडणवीसांनी केली आहे. (Devendra Fadnavis has leveled serious allegations against the Thackeray government over the Sachin Waze case)

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

‘ही केस सीआययूकडे येण्याचं कारण नव्हतं. बादशाह रॅपर, रितीक रोशन केस असो, सर्व हायप्रोफाईल केसेस सीआययूकडेच जात होत्या. सीपीनंतर कोणाचा वट किंवा कद होता तो सचिन वाझेंचा होता. मुख्यमंत्र्यांच्या जवळ, गृहमंत्र्यांच्या जवळ, किंवा शिवसेना नेत्यांच्या जवळ दिसत. सचिन वाझे यांना वसुली अधिकाऱ्याच्या रुपात बसवण्यात आलं. मुंबईत डान्सबार सुरु ठेवण्यात सूट, आणि सर्वाचे इन्चार्ज सचिन वाझे होते”, असा गंभीर आरोप फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

“ही जी घटना घडली, मनसुख हिरेन प्रकरण भयानक आहे. वाझे त्यांना पहिल्यापासून ओळखत होते. स्कॉर्पिओ त्यांनी हिरेन यांच्याकडून घेतली पण पैसे दिले नाहीत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यात ती गाडी त्यांच्याकडे होती. हिरेन यांनी वाझेंकडे पैसे मागितले होते. पैसे द्या नाही तर गाडी परत द्या, असं सांगितलं होतं. काही दिवस गाडी वापरुन वाझेंनी ती परत केली”.

‘गाडी चोरी गेली नाही तर वाझेंनीच लावायाला सांगितली’

“स्कॉर्पिओ गाडी चोरी झाली असती तर काहीतरी टेम्परिंग वगैरे झालं असतं. म्हणजे मनसुख यांना हे सांगितलं गेलं होतं की, गाडी तिथे लाव आणि चावी आणून दे. ही चावी सचिन वाझेंनी घेतली. त्यांना सांगितलं, उद्या जाऊन तुम्ही गाडी चोरी झाल्याची तक्रार दाखल करा, त्यानुसार कुर्ला पोलिसात तक्रार दाखल केली. तिथल्या ड्युटी ऑफिसरला सचिन वाझेंनी फोन करुन गुन्हा दाखल करायला लावला. जाणीवपूर्वक तीन दिवस सचिन वाझेच तपास करत होते. मनसुख यांना वाझेंनीच सांगितलं, अन्य तपास यंत्रणा चौकशी करु शकतात. त्यामुळे मनसुख यांना सांगितलं वकिलामार्फत पत्र लिहून मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पाठवलं. त्यात वाझेंनी स्वत:चंही नाव लिहिलं’ असंही फडणवीस यांनी म्हटलंय.

‘अर्धा तासामुळे घोळ झाला!’

“ज्या दिवशी मनसुख यांना रात्री फोन आला, गावडेंनी तुम्हाला बोलावलं आहे. हा तोच एरिया होता जिथे सचिन वाझेंवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह मिळाला. आमचा हाच दावा आहे की, वाझेंना तिथेच मारुन, मृतदेह खाडीत फेकला. त्यांचा अंदाज चुकला. त्यांना वाटलं लोटाईड आहे. पण अर्धा तासाचा फरक पडला. हायटाईडमुळे त्यांचा मृतदेह बाहेर आला. अन्यथा तो बाहेर आला नसता”.

‘माझा दावा आहे की, पोलिसांकडे भरपूर पुरावे’

“पोस्टमॉर्टममध्ये बर्याच गोष्टी आहेत. इतके रुमाल तोंडात कसे होते, त्यांना बांधलं होतं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या फुप्फुसात पाणी असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र रिपोर्टमध्ये ते नाहीच. पाण्यात बुडून मृत्यू झाला असता तर फुप्फुसात पाणी असतं, ते न मिळाल्यामुळे ही हत्याच आहे हे अधोरेखित होतं. एटीएसने जी कारवाई करायला हवी, ती होताना दिसत नाही. माझ्यासारख्या व्यक्तीला इतके पुरावे मिळत असतील, तर माझा दावा आहे पोलिसांकडे यापेक्षा जास्त पुरावे असतील”.

‘मनसुख हिरेन प्रकरण NIAने वर्ग करुन घ्यावं’

“एटीएस आणि NIA कडे टेप आहेत, त्यामध्ये वाझेने त्यांना काय काय म्हटलंय ते स्पष्ट आहे,. एटीएसकडून सुरुवातीला अॅक्शन दिसली, पण आता काहीच दिसत नाही. एटीएसने आधी अटक करुन त्यांना एनआयएकडे ताब्यात द्यायला हवं होतं. कारण ही दोन्ही एकमेकांशी संलग्न प्रकरणं आहेत. त्यामुळे एटीएसकडे जे प्रकरण आहे ते एनआयएने टेकओव्हर करावं. माझा एटीएसवर अविश्वास आहे असं नाही, मात्र त्यांच्याकडून आवश्यक कारवाई होत नाही. त्यांच्यावर दबाव असावा”.

‘वाझेला सरकारमधील कुणारे आशीर्वाद?’

“एकटे सचिन वाझे इतकं मोठं कुंभाड रचू शकत नाहीत. त्यांच्यामागे कोण कोण आहेत हे बाहेर आलं पाहिजे. हे पोलीसांचं अपयश नाही तर सरकारचं अपयश आहे. सरकारने अशा व्यक्तीला इतक्या महत्त्वाच्या जागेवर बसवलं, त्यावरुन स्पष्ट होतंय की सरकारची मजबुरी होती. मुख्यमंत्र्यांनी हा तर ओसामा बिन लादेन आहे का असा प्रश्न विचारुन पाठिशी घातलं. या प्रकरणाच्या मुळाशी जायलाच हवं. सरकारने वाझेंना या पदावर का आणलं, त्याचा संबंध काय हे तपास यंत्रणांना शोधावंच लागेल, अशी आमची मागणी आहे”.

संंबधित बातम्या :

Mumbai New Police Commissioner : अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

Param Bir Singh : हे ठाकरे सरकारचे पाप, मुंबई पोलिसांची इतकी बदनामी कधीच झाली नाही, भाजपचा हल्लाबोल

Devendra Fadnavis has leveled serious allegations against the Thackeray government over the Sachin Waze case

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.